आपले स्वागत आहे!

Archive for मार्च 12, 2011

श्रावण घेवडा ची भाजी

श्रावण घेवडा ची भाजी : मार्च मध्ये पण श्रावण घेवडा फनसबी पण म्हणतात चांगली मिळते. मटार पण हिरवा गार मिळतो भाजी बाजारातं.मटारचे सोलून घ्यावा. श्रावण घेवडा चिरुण घ्यावा. आम्ही पूर्वी शिरा काढून हातानेचं लहान लहान तुकडे करतां असतं. गवार पण अशीच निवडतं असतं.

श्रावण घेवडा व मटार एकत्र कुकर मध्ये थोड पाणी घालून दोन शिट्या द्याव्यातं पचण्यास हलक असतं फार कच्च खाल्ल की आतड्यांना ताण पडतो. लहान मोठे व्यक्तींना पण त्रास होतो. शिट्या दिल्या नंतर कुकर मध्ये भाजी मध्ये तीखट मीठ हळद हिंग दाण्याचा कूट घालावा. वरुण लोखंडी कढईतं तेल मोहरी ची फोडणी करुन भाजी मध्ये घालावी परतं सर्व भाजी एकत्र करुन गरम करावी. छान बाऊल मध्ये भाजी पोळी बरोबर खाण्यास द्यावी. चव पण येते व पोट पण चांगलच चं भरतं. माझ्याकडे लोखंडी कढई आहे.

साखर किंवा गुळ घालू नये भाजीची चवं चांगली लागते.

श्रावण घेवडा ची भाजी         लोखंडी कढई

श्रावण घेवडा ची भाजी                                             लोखंडी कढई

%d bloggers like this: