आपले स्वागत आहे!

अल्बर्ट आईनस्टाईन : अणुविज्ञानाचे जनक असणाऱ्या अल्बर्ट आईनस्टाईन यांचा आज जन्मदिन. दि. १४ मार्च १८७९ रोजी दक्षिण जर्मनीतील उल्म शहरात ज्यू कुटुंबात त्यांचा जन्म झाला. सापेक्षतेचा सिद्धांत मांडणाऱ्या E = MC2 या त्यांच्या प्रसिद्ध समीकरणावरच कालांतराने अणूचे विभाजन करण्यात शास्त्रज्ञांना यश आले. १९२१ मध्ये पदार्थविज्ञान शास्त्रातील संशोधनाबद्दल आईनस्टाईन यांना नोबेल पारितोषिक मिळाले. विज्ञान म्हणजे निसर्ग व मानव यांना जोडणारा दुवा असे मानणारा शांततावादी शास्त्रज्ञ म्हणून सारे जग या थोर वैज्ञानिकाला ओळखते. ‘दि मीनिंग ऑफ रिलेटिव्हिटी’, ‘इव्होल्यूशन ऑफ फिजिक्स’ व ‘आउट ऑफ माय लेटर इयर्स’ हे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. अल्बर्ट आईनस्टाईन यांचा आज जन्मदिन.

ही माहिती कोल्हापूर पुढारी मध्ये १४ मार्च २०११ ला आली आहे.

183113322

अल्बर्ट आईनस्टाईन

Comments on: "अल्बर्ट आईनस्टाईन" (1)

यावर आपले मत नोंदवा