आपले स्वागत आहे!

Archive for मार्च 20, 2011

चंद्र आज पृथ्वीच्या सर्वात जवळ

चंद्र आहे साक्षीला ..!

चंद्र आज पृथ्वीच्या सर्वात जवळ

मुंबई : प्रतिनिधी तुम्हा-आम्हा सर्वांचा चांदोबा शनिवारी पृथ्वीच्या जवळ येणार आहे. गेल्या १८ वर्षांत पहिल्यांदाच हा चांदोबा नेहमीच्या तुलनेत मोठा व तेजस्वी दिसणार आहे. पृथ्वीपासून ३ लाख ५६ हजार  ५७५ कि.मी. अंतरावर येणाऱ्या या ‘सुपरमून’ला पाहण्याची संधी चालून आली आहे. पृथ्वीच्या सर्वात जवळचा हा उपग्रह. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे समुद्रातील भारती-ओहोटीचे चक्र सदैव सुरु असते. आठवड्याभरापूर्वी जपानमधील भूकंप व त्सुनामीचे खापर चंद्रावर फोडण्यात आले. जमिनीतील भूगर्भीय हालचाली व खगोलीय घटनांचा काही संबंध नाही, हे वैज्ञानीकांनी जाहीर केल्यावर चांदोबावरील शंकेचे मळभ दूर झाले. १९ मार्चला फाल्गुन पौर्णिमेला सायंकाळी ६.४७ मिनिटांनी आकाशात चंद्राचे आगमन होईल. खगोल अभ्यासकांनाही सुपरमून पाहण्याची ओढ लागली आहे. ‘पृथ्वीपासून चंद्राचे सरासरी अंतर ३ लाख ८२ हजार ९८० कि.मी. एवढे आहे. पृथ्वीभोवती चंद्राची कक्षा लंबवर्तुळाकार असते. एक फेरी पूर्ण करण्यासाठी २८ दिवसांचा कालावधी लागतो. त्या दिवसात तो कधी दूर, तर कधी लांब असतो. १८ वर्षांनतर शनिवारी चंद्र हा नेहमीपेक्षा पृथ्वीच्या थोडा अधिक जवळ  येणार आहे. पृथ्वीपासून तो ३ लाख ५६ हजार ५७५ कि.मी. अंतरावर असेल. नेहमीपेक्षा २०० ते ३०० कि.मी. ने जवळ असेल. चंद्र प्रचंड मोठा असेल, असे काही नाही. सर्वसाधारण पौर्णिमेला चंद्र अर्धा अंश (वैज्ञानिक भाषेत ३० कोणनीय मिनिटे) दिसतो. यावेळी तो ३३ ते ३४ कोणनीय मिनिटे एवढा दिसेल. असा तेजस्वी चंद्र पाहायलाच हवा’, असे खगोल अॅकॅडमीचे  डायरेक्टर  प्रदीप नायक यांनी ‘पुढारी’ला सांगितले.

ही सर्व माहिती १९.०३.२०११ ला पुढारी अंक मध्ये आली आहे.

चंद्र

चंद्र

चंद्राचं छायाचित्र मी स्वतः घरातील कॅमेरा मध्ये मी छायाचित्र काढला आहे.

%d bloggers like this: