आपले स्वागत आहे!

Archive for मार्च 21, 2011

तुकारामबीज

शके १९३२ विकृतिनामसंवत्सर  उत्तरायण  शिशिरऋतु फाल्गुन कृष्णपक्ष व्दितीया तुकारामबीज २१ .३ .२०११ ला आहे त्यानिमीत्त तुकाराम यांचे अभंग लिहिले आहेतं.

११६७. तूं माझी माउली तूं माझी सावली | पाहातों वाटुली पांडुरंगे ||१||
तूं मज एकुला वडील धाकुला | तूं मज आपुला सोयरा जीव ||२||
तुका म्हणे जीव तुजपाशीं असे | तुझियानें ओस सर्व दिशा ||३||

१४९९. आनंदाचे डोहीं आनंदतरंग | आनदंचि अंग आनंदाचें ||१||
काय सांगों झालें कांहींचियाबाई | पुढें चाली नाहीं आवडीनें ||२||
गर्भाचे आवडी मातेचा डोहळा | तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे ||३||
तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा | अनुभव सरसा मुखा आला ||४||

Hindu Jnaneshvar and Tukaram smaller

Tukaram

%d bloggers like this: