आपले स्वागत आहे!

Archive for मार्च 24, 2011

संत एकनाथ

शालिवाहन शक १९३२ विकृतिनाम संवत्सर रंगपंचमी व श्री एकनाथषष्ठी
मार्च २४. ३. २०११ तारखेला आहे.

संत एकनाथ: पैठन हे तालुकाचे गावं . औरंगाबाद पासून ५० किलोमीटर अंतरावर आहे. एसवि सनापूर्वी ४०० च्या बौध्द ग्रंथ, पद्मपुराण, जैन व महानुभाव व इत्यादि ग्रंथांतून पैठणचा इतिहास पाहायला मिळतो. प्रतिष्ठानच्या या पुण्यनगरीतं १४ व्या शतकापासून अनेक ग्रंथकार, कवी, संत धर्मस्थापक होऊन गेले.शककर्ता शालिवाहन राज्याची म्हणूनही पैठणची ओळख आहे. समता एकनाथ महाराजांचे गाव म्हणून आज पैठणची ख्याती सर्वदूर पसरली आहे. पैठणकडे बघितले जाते.

१५२१ फाल्गुन रविवार हा एकनाथांचा निर्वाण दिन. संत एकनाथ महाराजांच्या या निर्वाणदिनी पैठण येथे ‘नाथषष्ठी‘ उत्सवाची मोठी यात्रा भरते. लाखो भावीक पैठणला तीन दिवसांच्या मुक्कामासा येतात.’कालाष्ठमी’ च्या दहीहंडी च्या कार्यक्रमाने या यात्रेची सांगता होते.नाथांची समाधी असलेले मंदिरा बस स्थानकाच्या पश्चीम दिशेला आहे.

या मंदिरात नाथांच्या रांजण अंसून श्रीकृष्णाने श्रीखंड्याच्या रुपाने बारा वर्षे कावडी ने पाणी भरले. नाथषष्ठी च्या दिवशी रांजणाची पूजा होते. नाथ पैठण येथे तीन वास्तुत राहिले. पहिले नागघाट दुसरे घर मुंजास्थान व तिसरे घर राम्जनाजवळील घर होय. देवघरात प्रवेश करताना दोन चौकोनी खांब आहेत. दक्षिणेकडील खांबाला टेकून पुराण संगता व उत्तरेकडील खंबावर ‘उध्दव’ ही अक्षरे आहेत. श्रीखंड्या उध्दव रुपाने प्रगट होऊन नाथांना दर्शन दिल्याचे प्रतीक आहे.

नाथांच्या या नगरीत जायकवाडी धरण व संत ज्ञानेश्वर उद्दानाचा प्रकल्प बघण्यासारखा आहे. शिवाय पैठण प्राचीन नगरीचा परिसरही जुन्या संस्कृतीच्या इतिहास ओळख करुणा देणारा आहे.

मी लहान असतांना व आतां आतां १५ वर्षा पूर्वी पैठण पाहिले आहे.

संत एकनाथ महाराज     पैठणची पैठणी

संत एकनाथ महाराज                               पैठणची पैठणी

%d bloggers like this: