आपले स्वागत आहे!

Archive for मार्च 25, 2011

खेळ !

खेळ: लहानपणी आजोळी जात असू. ९ सागरगोटे घेऊन एक सागरगोटा ऊंच झेलतं व वर मान करुनचं जसा १ एक व ९ नऊ डाव असेल तसे खालील सागरगोटे गोळा करुन झेललेला सागरगोटा खालील एकत्र करुन झेलतं हंडी पर्यंत येत असतं हंडी पर्यंत कोणी आल की बस आता ईतर जणी ऊठुन जात कोणावरचं कधीच हंडी होत नव्हती. हे बरं !

शाळेतून घरी आल्यावर शेजारची यांच्या बरोबर विट्टी दांडू खेळतं मूल माझ्या पेक्षा मोठ्ठी असायाची. विट्टी दांडूने लांब जाईल तितक चांगल परत दांडू ने विट्टी उडवावयाची ३ तीन वेळा करून गोल पासून विट्टी जितकी लांब गेली तिथ पर्यंत दांडूनेच १ पासून गोल मोजायचे.१५ गोल झाले २० गोल झाले असा डावं खेळत. ए मला आणि एकदा डाव देना मी म्हणत देतं असतं.

शाळेत एक लोखंडी गोळा असे तो रेषेच्या बाहेर गेला की पास असे.माझा थोडाच बाहेर जातं असे व मी पास होत असे. खेळ परीक्षा असे.

स्पध्देत संगीत खुर्ची असे प्रथम मिळे नंतर आऊट. खो S खो खेळ एक या बाजूला दुसरी त्या बाजूलां खो देऊन पळायचं कधी कधी आऊट व्हावयाच.

असे बरेचं खेळ खेळले .

जीवनात पण छान खेळ झाले सर्व यशस्वी झाले.

लग्न मूले सौ सूना देश परदेश वास्तू चार शक्तीपीठ देवी दर्शन संत दर्शन सर्व छान मना सारखं झालं आहे.

ईतक जीवनात मिळणं सोपं नव्ह. नाही.

पैठणी

पैठणी

%d bloggers like this: