ॐ
आराम: कल्पव्टक्षाणां विराम:
सकलापदामं | अभिरामस्त्रिलोकानां
राम: श्रीमानं स न: प्रभु: ॥१६॥
तरुणौ रुपसंपनौ सुकुमारौ
महाबलो | पुण्डरीकविशालाक्षौ
चिरकृष्णाजिनाम्बरौ ॥१७ ॥
फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ
ब्रह्मचारिणौ | पुत्रौ दशरथस्यैतौ
भ्रातरौ रामलक्ष्मणौ ॥ १८ ॥
शरण्यौ सर्वत्त्वानां श्रेष्ठौ
सर्वधनुष्मताम् |रक्ष: कुलनिहन्तारौ
त्रायेतां नो रघुत्तमौ ||१९||
आत्तसज्यधनुषाविषुस्पृशावक्षया
शुगणीषसड्गिनौ | रक्षणाय —
मम रामलक्ष्मणावग्रत:
पथि सदैव गच्छताम् ॥ २० ॥
ॐ
१६) रामस्तुति – श्रीराम हा कल्पवृक्षांचा जणू सुंदर बगीचाच आहे; सर्व आपत्ती घालविणारा व त्रैलोक्यांत मनोहर असा तो श्रीमान् राम आमचा प्रभु आहे.
१७-१८ -१९) वयाने तरुण, रूपवान् सुकुमार, अतिशय बलवान्, कमलपत्राप्रमाणे परिधान करणारे, कंदमूलफले भक्षण करणारे,जितेंद्रिय, तवस्वी, ब्रह्मचारी, सर्व प्राण्यांचे रक्षण करणारे, सर्व धनुर्धारांमध्ये श्रेष्ठ, राक्षसांच्या कुलाचा संहार करणारे व रघुकुलांतील प्रमुख असे दशरथाचे पुत्र, राम-लक्ष्मण हे दोघे बंधू आमचे रक्षण करोत.
२०) सज्ज धनुष्ये धारण करणारे बाणांना हस्तस्पर्श करणारे, व अक्षय्य बाणांचे भाते बाळगणारे राम- लक्ष्मण माझ्या रक्षणाकरितां मार्गामध्ये नेहमी पुढे चालोत.
|| श्री राम जय राम जयजय राम ||
प्रतिक्रिया व्यक्त करा