सार्थ श्रीरामरक्षा
ॐ
संनध्द: कवची खड्गी चापबाणधरो
युवा | गच्छन मनोरथो s स्माकं राम:
पातु सलक्ष्मण: ॥२१॥
रामो दाशरथि: शूरो
लक्ष्मणानुचरो बली |
काकुत्स्थ: पुरुष: पूर्ण:
कौसल्येयो रघूत्तम: ॥२२॥
वेदान्तवेद्दो यज्ञेश: पुराणपुरुषोत्तम:
जानकीवल्लभ: श्रीमानप्रमेयपराक्रम: ॥ २३ ॥
इत्येतानि जपन् नित्यं
मभ्दत्त्क: श्रध्दयान्वित: |
अश्र्वमेधाधिकं पुण्यं
संप्रान्प्रोति न संशय: ॥ २४ ॥
रामं दुर्वालश्यामं
पद्मामक्षं पैतवाससं
स्तुवन्ति नामभिर्दिव्येर
न ते संसारिणो नर: ॥ २५ ॥
ॐ
२१) निरंतर सज्ज असलेला, अंगात कवच (चिलखत) घातलेला, हाती खड्ग आणि धनुष्यबाण धारण करणारा, आमचा मूर्तिमंत मनोरथच की काय असा, लक्ष्मणासह गमन करणारा तरुण राम आमचे रक्षण करो.
२२ – २३ – २४) आनंद देणारा, दररथाचा पुत्र, शूर लक्ष्मण ज्याचा सेवक आहे असा, बलवान, ककुत्स्थकुलोत्पन्न, महापुरुष, पुर्नब्रह्म, कौसल्यातनय, रघूत्तम, वेदांतशास्त्राने, ज्ञेय, यज्ञांचा स्वामी, पुराणपुरुषोत्तम, जानकिचा प्रिय, वैभव संपन्न, अतुल पराक्रमी, अशा या नावांचा श्रध्दापूर्वक नेहमी जप करणाऱ्या माझ्या भक्ताला अश्र्वमेध यज्ञाच्या पुण्याहून अधिक पुण्य लाभते, यात संशय नाही. (असे शंकराचे अभिवचन आहे) .
२५) दुर्वेच्या पानाप्रमाणे श्यामवर्णाचा, कमलनेत्र आणि पितांबर परिधान करणारा अशा रामाची या दिव्य नावांनी जे मनुष्य स्तुति करितात, ते जन्ममरणाच्या संसारातून सुटतात.
|| श्री राम जय राम जयजय राम ||