आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 11, 2011

सार्थ श्रीरामरक्षा

दक्षिणे लक्ष्मणो यस्य
वामे तु जनकात्मजा |
पुरतो मारुतिर्यस्य
तं वन्दे रघुनन्दनम् ॥३१॥

लोकाभिरामं रणर धीरं
राजीवनेत्रं रघुवंशनाथम् |
कारुण्यरुपं करुणाकरं तं
श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्दे ||३२ ||

मनोगवं मारुततुल्यवेगं ।
जितेद्रियं भुध्दिमतां वरिष्ठ म् ।
वातात्मजं वानरयूथमुख्यं ।
श्रीरामदूतं शरणं प्रपद्दे ॥ ३३॥

कूजन्तं रामरामेति मधुरं मधुराक्षरम्
आरुह्य कविताशाखां
वन्दे वाल्मीकिकोकिलम्॥ ३४॥

आपदामहर्तारं दातारं सर्वसंपदाम् |
लोकाभिरामं श्रीरामं
भूयो भूयो नमाम्यहम् ॥३५॥

३१) ज्याच्या उजव्या बाजूला लक्ष्मण आहे आणि डाव्या बाजूला जनकतनया सीतादेवी आहे व ज्याच्यापुढे मारुति उभा आहे, त्या रघुनंदनाला मी वंदन करतो.

३२) लोकांना आनंद देणारा, रणांगणांत धैर्य धरणारा, कमलाप्रमाणे नेत्र असलेला, रघुवंशाचा अधिपती व दयेची मूर्ति असा जो करुणासागर श्रीरामचंद्र त्याला मी शरण आलो आहे.

३३) मारुतिस्तुति – मनाप्रमाणे वेगाने गमन करणारा, वाऱ्याप्रमाणे वेगवान् आपली इंद्रिये जिंकून स्वाधीन ठेवणारा, बुध्दिमंतांत श्रेष्ठ आणि वानरसमुदायाचा मुख्य अशा वायुपुत्र श्रीरामदूत हनुमंताला मी शरण आलो आहे.

३४) वाल्मीकिवंदन – कवितेच्या फांदीवर बसून, “राम रामा” आशा गोड गोड अक्षरांचे मधुर गुंजन करणाऱ्या वाल्मीकिरुपी कोकिळाला मी वंदन करतो

३५) रामवंदन – आपत्तींचा नाश करणारा, सर्व संपत्ति देणारा, व लोकांना आनंद देणारा, असा जो श्रीराम त्याला मी पुन: पुन: नमस्कार करतो.

|| श्री राम जय राम जयजय राम ||

%d bloggers like this: