आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 12, 2011

वाढदिवस

स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर चैत्र शुक्लपक्ष रामनवमी मंगळवार.
मंगळवार १२ एप्रिल(४) २०११ तारखेला.

चंपाबाई राधाबाई (वहिनी) पणजी देशपांडे यांचा वाढदिवस आहे.१०० रावा !

नमस्कार

पणतु दीप आकाश देशपांडे यांना कडेवर घेऊन काढलेले छायाचित्र

DSCF1498  DSCF1489

DSCF1495

पणजी पणतु दीप

सार्थ श्रीरामरक्षा

भर्जनं भवबिजानामर्जनं सुखसंपदाम् |
तर्जनं यमदूतानां रामरामेति गर्जनम् ॥३६॥

रामो राजमणि: सदा विजयते
रामं रमेशं भजे ।
रामेणाभिहता निशाचरचमू
रामाय तस्मै नम: ।
रामान्नास्ति परायणंपरतरं
रामस्य दासो s स्म्यहं ।
रामे चित्तलय: सदा भवतु मे
भो राम मामुध्दर ॥ ३७ ॥

रामरामेति रामेति रमे रामे मनोरमे |
सहस्त्रनाम तस्तुल्यं रामनाम वरानने ||३८||

इतिश्रीबुधकौशिकविरचित
श्रीरामरक्षास्तोत्रं संपूर्णं |

॥ श्रीसितारामाचन्द्रार्पणमस्तु ॥

३६) राम, राम, अशी रामनामाची गर्जना ही संसाराची बीजे भर्जन करणारी (भाजून टाकणारी), दूतांना तर्जन (भय) करणारी अशी आहे.

३७) राजश्रेष्ठ ‘राम’ नेहमी विजय पावतो. त्या रमापती (सितापती) ‘रामास’ मी भजतो. ‘रामाने’ राक्षसांची सेना मारली, त्या ‘रामाला’ माझा नमस्कार असो. मला ‘रामाहून’ दुसरा कोणी श्रेष्ठ वाटत नाही. मी ‘रामाचा’ दास आहे. माझ्या चित्ताचा लय नेहमी ‘रामाच्या ठायी’ होवो. हे ‘रामा’, माझा तू उध्दार कर !

३८) शिव पार्वतीला सांगतात – हे सुवदने, राम, राम, राम, राम, अशा नामोच्चाराने मी मनाला आनंद देणाऱ्या श्रीरामाच्या ठायी रममाण होतो. श्रीरामाचे नाव हे (विष्णुच्या) सहस्त्रनामाशी बरोबरी करणारे आहे.

याप्रमाणे बुधकौशिक ऋषींनी रचिलेले
श्रीरामरक्षास्तोत्र समाप्त झाले.
ते श्रीसीता-रामाचंद्राच्या चरणी अर्पण असो !

|| श्री राम जय राम जयजय राम ||

%d bloggers like this: