आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 24, 2011

अमृतांजली

अमृतांजली –
श्री कार नव्या कवितेचा किति समर्थ ही शब्द श्री
कुलस्वामिनी शोभे कविता ईश्वराची थोर वि
सुरेखपणात बिजली गमे कीर्तीमध्ये ती वर्धि ष्णु
मात्रासुधेची पाजते जिवनगान्या दे अर्थ न वा
ग्रहागोल मंडूनी धावते निमिवात ही उजळीत म
ज गतास अवघ्या मंत्रुनी देतसे नव संजीव न
हो तोच निखिल मंगल नवनाव्याकृति उजळी मु शि
अवनितली क्षणशूण्यता मावळी उमलो स्व र
भिसता कधी नव्हतीच क्रांतीस हाकारिता वा
नंदतात विहरंताना लख्ख चांदण्याचे हे घ ड
दर एक वाट चालताना कवि कळणे हे सार्थ क
नमनात शतदा लीन मी स्वरदायि राहो भास्कर

-तात्या आता होउ दे पुन: कविता रानि झुलू दे गज
या काव्यप्रांगणी पुना: पुन: हुकारुदे कुसुमाग्रज

२६ .२ .१९८७ श्री

कविवर्य कुसुमाग्रज यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांना पाठवलेली कविता –

(श्रीकांत चिवटे)

DSCF1531

ही कविता डॉ प्राध्यापक S.K. Desaai यांना दाखविली त्यांनी एक ओळ लिहिण्यास सांगितले सुरुवातीला च श्री लिहुन दोन्ही बाजुने सुरुवात केली आहे.
एकीकडे अभिनंदन आहे व एकीकडे विष्णुवामन शिरवाडकर आहे.
ही कविता पेपर मासिक पुस्तक कोठेही छापून आलेली नाही

ही कविता संगणक वर लिहिण्यास अवघड आहे. मी स्वत: संगणक वर लिहिली आहे.

%d bloggers like this: