नमस्कार
ॐ
नमस्कार
नभासी नमन नमो निराकारा
कवळून भाना निसर्ग स्विकारु
नमो चराचरा निसर्ग शहारा
नमून भास्करा ओंजळू
नमन पाषाणा नमो मूर्तिमंता
आकळ तत्त्वता पाझरु
नमो गुरुदेवा नमो मायताता
करुणे नमन ओसंडू
नमो अवध्यांग आपणे नमन
नमन सत्वांश पाजळू
श्रीकांत चिवटे
तुळसपाणी त्यांच्याच पुस्तक मधील ही कविता आहे.