शिरा
ॐ
शिरा : मी आधीच्या ब्लॉग मध्ये गव्हाचा रवा चा शिरा लिहिला आहे.
आता बारीक रवा चा शिरा लिहीत आहे. हा शिरा
श्री सत्यनारायण पूजेला प्रसाद केळ घालून किंवा साधा पण साखरेचा शिरा करतातं.
रवा छान चांगला सादूक तुपात भाजून घ्यावा. प्रथम थोड गरम पाणी घालून हलवावं. रवा असेल तितक्या प्रमाणे निम्मी साखर घालावी. थोड दूध घालावं. छान झाकण ठेवून वाफ आणावी. नंतर बदाम बारीक केकेले व जायफळ पूड घालावी.परत एक वाफ आणावी. केळी घातल्यास वरुन घालावितं. एरवी केशर घालून पण शिरा करतातं.
कोल्हापूर येथे रंगीत शिरा करण्याची रित आहे. देवळातं शिरा देतातं तेंव्हा ईतर घरी पण रंगीतं शिरा करतातं देतातं. मी दोंन्ही शिरा केलेला दाखविला आहे.दाखविले आहेतं.
शेव पण मीच घरी केली आहे.