गणपती
ॐ
गणपती वर क्लिक करा आणि मग गणपतीच्या डोळ्यात पहा !
संगणकारणे बनविलेली गणपतीची प्रतिमा ईंटरणेट मध्ये सापडली आहे.
डोळे छान कोणाशी बोलतांना दिसतात. आवडणारचं ! गणपती व गणपती चे डोळे बघायला !
ॐ
गणपती वर क्लिक करा आणि मग गणपतीच्या डोळ्यात पहा !
संगणकारणे बनविलेली गणपतीची प्रतिमा ईंटरणेट मध्ये सापडली आहे.
डोळे छान कोणाशी बोलतांना दिसतात. आवडणारचं ! गणपती व गणपती चे डोळे बघायला !
ॐ
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने सलग दुसऱ्या वर्षी ‘आयपीएल’चे अजिंक्यपद पटकावले. २०५ धावा चोपल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला ८ बाद १४७ धावावर रोखून ५८ धावानी विजय मिळवला.
ॐ
२९ .५ .२०११ तारीख ला ! श्री वीद्दाधर चिवटे व सौ नीता विद्दाधर चिवटे यांचा लग्नाचा वाढदिवस आहे.
तसेचं आनंद बेदरकर याचा मुंजीचा २९ .५ .२०११ ला मुंजीचा वाढदिवस आहे ! घरोबा असलेला माझा छोटा भाऊ आहे. त्याची मुंज २९. ५ .१९६६ साली झाली आहे !
ॐ
सात खंड : जगात सात खंड आहेत. आशिया, आफ्रिका, यरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, आणि आर्क्टिक, या खंडांना ही नावे कशी पडली, हे जाणून घेणे मनोरंजक आहे.
आशिया हे नाव असेरियन,म्हणजे आसू म्हणजे उगवता सूर्य किंवा पूर्व यावरुन पडले असावे. रोमन सम्राटांनी आपल्या साम्राज्यातील पूर्वकडील भागाना हे नाव दिले होते. तेच नाव या खंडाला पडले.
आर्फिका हे नाव बर्बेर जमातीच्या आदिवासिंचे नाव आहे. रोननांनी त्यांच्या साम्राज्यातील एका प्राम्ताचे नाव म्हणून ते स्विकारले आणि नंतर ते संपूर्ण खंडालाच देण्यात आले. युरोप हे नाव कशावरुन पडले,हे निश्चित माहीत नाही याचा अर्थ मुख्य भूमी असा असावा.
अमेरिका हे नाव या खंदाचा शोध लावणाऱ्या कोलाम्बासाचा एक सहकारी अमेरिगो वेसापुसी याच्या नावावारुणा पडले आहे.
ऑस्ट्रेलिया हे नाव ऑस्ट्रेलिस या लटीन शब्दावरुन पडले आहे.ऑस्ट्रेलीस म्हणजे दक्षिण.
अंटार्क्टिका हा शब्द ग्रीक आर्क्टिक या शब्दाच्या विरोधी म्हणून वापरला आहे.
आर्क्टिक या ग्रीक शब्दाचा अर्थ अस्वल भाग ग्रेट बिअर नक्षत्र समूहाच्या खाली येतो. म्हणून त्याला आर्क्टिक हे नाव देण्यात आले.
ही सर्व माहिती पुढारी २६ मे २०११ तारीख पान ८ गुरुवार मध्ये आहे. मी स्वत: वाचून लिहीत असते अवघड असल्यास प्रणव सांगतो.
ॐ
पूर्वी घरातचं कुंडीतं लावलेली फूल तुळस इतर लावलेली रोपं झाड आजही अशी पाहण्यास चांगली छान वाटतात ! आता जून ७.६.२०११ उत्तरायण ग्रीष्मऋतु जेष्ठ शुल्कपक्ष आश्लेषा नक्षत्र सुरु होईल ! सर्वजन नवीन रोप कुंडीतं लावतील ! शेतकरी नवीन बी रोपण करुन धान्य तयार करतील !
५ जून ला रोप लावतात ! जागतिक पर्यावरण दिन ! World Environment Day ! जागतिक पर्यावरण दिन हा जगभर ५ जून रोजी पाळला जाणारा दिवस आहे. २१ तारखेला दक्षिणारांभ सुरु होतं असतो. व दिवस रात्र सारखं असतं नंतर दिवस लहान होतं असतो व रात्र हळू हळू मोठी होतं असते. २० जून २१ जून २२ जून असे तीन दिवस असतातं. नंतर दक्षीणायन सुरु होतं असते. पूर्वी लावलेले कुंडीतील रोप फूल तुळस पाहण्यास आज ही छान वाटतं !
ॐ
उकलसंच
एक न् एक दोन
पण दोन न् दोन तीन
व्यवहारात असते बरे
गणित हीन दीन
तीन पंचे पंधरा
हे जरी ठीक
दोन दुणे होतात वीस
पुन्हा एकदा शीक
गणित सोपे गणित अवघड
असे कसे होते
याचे कारण एकच
शून्य हातचे राहते
शून्य पूर्ण सोडू नका
म्हणा
सुखा गुणिन
विसा वसा काम करीन
मग विसावीन !
८ || तुळसपाणी
श्रीकांत चिवटे
तुळसपाणी त्यांच्या च पुस्तक मधील ही त्यांचींच कविता आहे.
ॐ
पर्वतांची निर्मिती : पर्वतांची निर्मिती होण्याच्या प्रक्रियेला ओरोजेनेसिस असे म्हणतात. पृथ्वीच्या कवचात झालेल्या हालचालींमुळे ही प्रक्रिया घडून आली. पृथ्वी वरील पर्वतांच्या तीन प्रकार आहेत,एक ज्वालामुखी तयार झालेले पर्वत, दुसरे फोल्ड पर्वत आणि ब्लॉक पर्वत.
ज्वालामुखीतून तयार झालेले बहुतेक पर्वत हे जिथे दोन भूखंड एकत्र येतात किंवा एकमेकापासून दूर होतात, त्याठिकाणी ज्वालामुखी उद्रेक होऊन तयार होतात.
फोल्ड किंवा घडीचे हे ज्या ठिकाणी भूखंड एकत्र येतात आणि ते खडकांना वरच्या दिशेला ढकलतात, तिथे तयार होतात.
जिथे सागरी भूपृष्ठाचे आवरण कमी घनता असलेल्या भूपृष्ठीय आवरणाशी एकत्रित होते, तेव्हा सागरी भूपृष्ठीय आवरण भूपृष्ठीय आवरणाखाली जाते.त्यामुळे भूपृष्ठीय आवरण वरच्या दिशेला सरकते. उत्तर अमेरिकेतील अपॅलाचियन पर्वत रांगा या अशा तऱ्हेने तयार झाल्या आहेत.
भूपृष्ठीय आवरणाचे दोन भाग जिथे एकमेकांना जोडले जातात,तेथेही असे घडीचे पर्वत उभे राहतात. ज्यावेळी भारत आशिया खंडाशी जोडला गेला त्यावेळी हिमालय पर्वत आकाराला येऊ लागला. भारत आणि आशिया यांच्यादरम्यान असलेल्या सागरी आवरणातील गाळ आणि इतर भाग त्यामुळे उंच झाला. ज्यावेळी एखादा भूखंड दोन देशांच्या मध्ये उंचावला जातो ,त्यावेळी ब्लॉक माऊंटन तयार होतो.
ॐ
फ्रीज : फ्रीज म्हणजे पदार्थ चांगले राहण्याकरता वीज वर चालणारे कपाट ! त्यामध्ये भाज्या शिजविलेले पदार्थ मुंग्या पदार्थांना होऊ नये शेंगदाणे रवा ह्यांना मुंगी होण्याची शक्यता असते त्यासाठी फ्रीज मध्ये ठेवल्यास चांगले बरेचं दिवस असे पदार्थ राहातातं.
रोज शिजविलेले भाजी सांबार आंबटी फ्रीज मध्ये ठेवू नका. ठेवू नये. त्यातील सर्व पाणी कमी होऊन घट्ट होतं. व गार ईतक होतं की परत नेहमी सारखं होण्यास बरेच तास लागतातं.बाहेर निट झाकले की छान राहातातं. लगेच हवे हवं तेंव्हां पटकन खावयाला देता येयातं.आपल्याला पण पाहिजे तेंव्हा पटकन खाता येते दुपारी कांही काता येते.
उरलेले अन्न फार दिवस खाऊ नये खाऊ नका.किंवा त्यात मसाला पीठ घालून तळून काडू नये नका. पाहुणे आले की ते पण कांही बरोबर पदार्थ आणतातं
शीळ वाटल्यास गाई म्हशी शेळी ह्यांना खराब होण्याआधी खाण्यास ध्यावे धावं. कांही ठिकाणी अजूनही गाई ला रोज खाण्यास देण्याची प्रथा आहे. शहरात पण गाई असतातं. आमच्या रोज गाई ला आई (वहिनी) गाई ला खावयाला देतं. असतं ! देवळात गाई असतातं आमच्या कोल्हापूर येथे आमच्या घरा समोरचं गाई म्हशी शेळी रोज येतातं. मी पण रोज नाही पण केंव्हा केंव्हा गाई म्हशी शेळी यांना खाण्यास देतं असते. हरबरा सोललेला फळं यांची सालं एका पाहुणे आले त्यांनी भरपूर पुरण पोळी आणली घरीच ठेवली. मी बरीच गाईला दिली. सणा वाराला कांही गोड केलं पुरण पोळी केली की मी पण गाई ला घास भरविते.
ॐ
पुस्तक व विक्रम : हंगेरी : येथील पुस्तक संग्रहाक जोसेफ तारी यांच्याकडे अनेक प्राचीन दुर्मीळ ग्रंथांचा संग्रह आहे. त्यातील काही ग्रंथ १०० वर्षापेक्षाही जुने आहेत.
याच महाशयांनी आता जगातील सर्वात लहान पुस्तक तयार करण्याचा विक्रम केला.
पुढारी २१ मे २०११ शनिवार १२ पान मधील बातमी आहे.
२२/०५/२०११ रोजी फ्रेंच ओपन सुरु झाली आहे! मेन्स डबल्स मध्ये भूपती व पेस एकत्र खेळत आहेत. त्यांना शुभेच्छा!
ॐ
चष्मा : चष्मा लावण अत्यंत्त गरज आहे. नंबर तपासून डोळे व काना मागे नीट बसायला हवा कानामागे घट्ट झाला तरी डोक व डोळे दुखतातं. चष्मा च्या काचा व फायबर मध्ये नंबर लावून मिळतातं. हल्ली लेन्स नंबर मध्ये मिळतात.
डोळ्याला नंबर नसला तरी उन्हातं जातांना गॉगल किंवा नुसता काचेचा चष्मा वापरण्याची सवय ठेवावी. उन्हाचा त्रास होत नाही. रात्री पण चष्मा वापरण्याची सवय ठेवावी गाड्या कार यांचा बस ईतर रस्ता वरील वाहनांचा त्रास होणार नाही ह्याची खबरदारी घावायाला हवी. तसेच संगणकावर संगणक काम करतांना T.V. बघतांना चष्मा वापरावा अत्यंत गरज आहे.
कांही धान्य निवडतांना जवळचा चष्मा विणकाम करतांना जवळचा चष्मा वापरणे अगदी जरुर आहे. वर्षा तून एकदा डोळे तपासून घेणे आवश्यक आहे अशी जर डोळा याची काळजी घेतली तर कांही त्रास होणार नाही. हे सर्व डोळे निट राहण्याकरता करणे गरजेचे नक्कीच आहे. !
ॐ
स्टँड : आपण स्वंयपाक करतांना ओटा व भांडी याची निट रहावं याची काळजी घ्यावयाला हवी. गरम कुकर एकदम ओटावर ठेवू नये नाही.छोटे स्टँड मिळतात १०/२० रुपया पर्यंत मिळतात. त्याचा वापर करावा. गरम भाजी आंबटी ची पातले वा बटाटा वडे तेलाची कढई लाडू केलेले पातेलं व कढई निर्लेप असो वा तांब असलेले स्टील पातेल असो असे गरम पातेली कुकर स्टँड वर ठेवावेतं. म्हणजे ओटा खराब होता नाही. चकाकी पण ओटा ला राहते. हल्ली संगम रवरी व रगींट हिरवे लाल स्वच्छ काळा दगड असलेले ओटा तयार करतातं तर हया ओटा ची आपण नक्कीचं काळजी घेण्यास हवी !
त्यासाठी गरम कुकर गरम कढई गरम तांब असलेलं स्टील पातेलं स्टँड वापरुन ओटा ची काळजी घ्यावी.
स्वंयपाक ओटा ची काळजी घेण्यास हवी !
मग : आजकाल सर्वजण चहा व कॉफी मगातून प्यायला लागले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या आकाराचे मग मिळतात. कार्टुन च्या आकाराचे मग मिळतात. तसेच आपल्या इंग्रजी (SUN SIGNS – zodiac signs) सन साईन चे मग पण मिळतात. जसे Sagittarius zodiac sign च भविष्य असलेले मग मिळतात. असे मग बोन चायना पासून बनविले जातात. त्याचप्रमाणे लोणच्या च्या बरण्या, चहाची किटली बोन चायना पासून बनवतात.
चहा कॉफी चे मग Brother, Father, Sister, Son, Wife यांना देण्यासाठी तसा messege असलेले मग मिळतात. मग वर फोटो छापून मिळतो.
राशी चे मग
ॐ
आई – १०२
आईसारखे दुसरे दैवत
या जगति मुळी नाही
आई म्हणजे आई ..
दि:कालाच्या उगमापासून
लवति झाडे पाने हलवून
बीजाच्या जणू जन्मापासून
गाई वानराई ..
सागर वेगे किती लहरला
लाटालाटांनी थरथरला
लहरी तून त्या जणूं गुणगुणे ..
‘नमन तुला आई – ‘
हिमालयाची करून लेखणी
निळ्या नभाची शाई
स्वये बैसला जरी गजानन
लिहून संपणे नाही –
१.१०.१९६९
श्री (श्रीकांत चिवटे)
१९ मे तारखेला ह्यांचा वाढदिवस असतो.
माझ्या सौ सासूबाई होत्या होतं !
ॐ
गोड कांड्या : रवा व मैदा सारखा प्रमाणातं घ्यावां .पीठी साखर पाण्यातं थोड्या वेळ भिजत ठेवून त्या साखरचे पाणी व रवा व मैदा तुपाचं कच्च मोहन सर्व एकत्र करावं करावे. अगदी कडक वाटल्यास त्यातं थोडी कणीक घालावी. थोड्या वेळ भिजतं ठेवून पोळपाटावर लाटून पाहिजे हवं तशा आकाराचे भाग करुन सादूक तुपातं पीठाचे केलेले भाग तांबूस तळावेतं.
नुसते वां चहातं बूडवून खाण्यास चांगले लागतातं.
ॐ
१७ .मे (५) तारिख ला माझा ब्लॉग पोस्ट २०० वा भाग आहे !
आपण सर्वांनी ब्लॉग वाचन केले व प्रतिक्रिया मत दिलीतं !
७,८०२ भेटी
अभिनंदन ! अभीनंदन !
त्या बध्दल बद्दल मनापासून धंयवाद ! धन्यवाद !
ॐ
शके १९३३ खरनामसंवत्सर उत्तरायण वसंतऋतु १४ वैशाख शुक्लपक्ष
१६ मे (५)२०११ तारखेला सोमवार ला श्रीनृसिंह जयंती आहे.
श्रीनृसिंहाची आरती
कडकडीला स्तंभ गडगडीलें गगन | अवनी होता आहे कंपायमान |
तडतडलीं नक्षत्रें पडताती जाण अग्ररुपें प्रगट तो सिहवदन ||१||
जय देव जय देव जय नरहरिराया |आरती ओवाळुं महाराजवर्या ||धृ.||
एकवीस स्वर्ग माय डळमळली कैसी | ब्रह्मयाच्या वाटे अभिनव चित्तासि ||
चंद्र -सूर्य दोन्ही लोपति प्रकाशीं |कैलासी शंकर दचके मानसीं ||जय.|| ||२||
थरथरती तया जटा जिव्हा लळलळित |
तीक्ष्ण नखांनीं तो विदारीत || अर्धांगीं कमलजा शिरीं
छाया घरित | माधवदासा स्वामि नरहरि शोभत || जय देव
जय देव जय नाहरिराया | आरती ओवाळूं ||३||
ॐ
संगणकशास्त्रज्ञ ग्रेस मरे हॉपर
सुमारे ८० वर्षांपूर्वी “इंटरनेट’चे अस्तित्व कुणाला माहिती नव्हते. संगणकविज्ञान ही शाखा अगदी नवी होती. संशोधनाची साधने नव्हती. अशा परिस्थितीत संगणकविज्ञान आत्मसात करून “प्रोग्रॅमिंग’मध्ये अजरामर योगदान देणाऱ्या ग्रेस मरे हॉपर या पहिल्या महिला शास्त्रज्ञ! आपल्या असामान्य बुद्धीवैभवाने त्या अमेरिकन नौदलातल्या पहिल्या “नेव्हल ऑफिसर’ ठरल्या.
Rear Admiral Grace Brewster Murray Hopper (born Grace Brewster Murray)(December 9, 1906 – January 1, 1992)
ॐ
चिवडा : पातळ पोहे निट चाळून घ्यावेतं थोडे गरम करुन घ्यावेतं. चांगली तेलाची मोहरीची फोडणी करावी. पोहे त्यात लाल हिरवी मिरची देठा सगट टाकावी. खोबर लांब काप् केलेले डाळ भाजलेले सालासगट किंवा साल काढलेले शेंगदाने घालावेतं .गरम केलेले पोहे फोडणीतं घालावेतं.
हिंग तिखट मीठ हळद थोडा भाजलेले तिळाचा कुट घालावां. म्हणजे सर्व पदार्थ फोडणीतं जळतं नाहीतं. कडीपत्ता कोथिंबीर फोडणीतं घातल्यास वास खमंग राहतो. गार पातळ पोहे चा चिवडा झाल्यावर डब्यातं वा काचेच्या बरणीतं भरावां. केंव्हाही पटकन खावयाला देता येतो.
ॐ
सीतानवमी : चैत्र शुल्कपक्ष महिनात रामनवमी असते तसेच वसंत ऋतु उत्तरायण असते !तसेच वैशाख शुल्कपक्ष महिनात सीतानवमी असते तसेच वसंतऋतु उत्तरायण असते !१२ एप्रिल तारखेला रामनवमी झाली ! व आता १२ मे तारखेला सीतानवमी आली !सीता जनक राजा यांची कन्या ! त्यांना जमीनीत मिळाली ! जनकराजा यांनी सीताचा सांभाळ केला ! श्रीरामा बरोबर संवयर लग्न लावून दिलं. सीता रामाबरोबर १४ वर्ष वनवास केला ! राम सीता यांना लव व कुश मूलं झाली लव व कुश यांचे ऋषी (गुरु ) वाल्मिकी !दशरथ राजा सूर्यवंशी घराणं !
सीता परत जमिनीतच गेली !
रामफळ व सीताफळ चांगली खावयाला मिळतात रामफळ मध्ये बी नसते !
माझ्या आत्याबाई चं नाव सीता होतं व त्यांच्या नवरा म्हणजे माझे मामा यांचे नाव राम होतं !
ॐ
जगदीश खेबुडकर : दिनांक १० मे १९३२ रोजी त्यांचा जन्म झाला. देहाची तिजोरी… सारखे भक्तिगीत ओवी, अभंग बालगीते, प्रणयगीते, लावण्या अशा सर्वच क्षेत्रात आपल्या काव्यलेखनाने मराठी सत्यम् शिवम् सुंदरा… यासारखी अप्रतिम प्रार्थनागीते लिहिली. असंख्य मराठी चित्रगीते लिहिणाऱ्या या कवीने अष्टविनायकाची काव्यात्म महती गायली; पण मराठी रसिकांना खेबुडकर आठवतात ते लावणीकार म्हणूनच. खेबुडकरांच्या लावणीच्या तालावर मराठी चित्रपट सृष्टी अक्षरश: नाचली. राम कदमांचं अप्रतिम संगीत, खेबुडकरांचे लावण्यमयी शब्द यांनी रसिकांना पिंजराबध्द केले.सर्व काव्यप्रकार लीलया हाताळणाऱ्या या जगदीश खेबुडकरांचे निधन ३ मे २०११ रोजी झाले. व
दि.१० मे रोजी त्यांचा वाढदिवस असतो !
रसिकांना भूरळ घालणाऱ्या जगदीश खेबुडकर यांचा १० मे रोजी वाढदिवस असतो.
जगदीश खेबुडकर
ॐ
पोळीचा लाडू : पोळी गार असो वां गरम असो कुस्करुन त्यातं पीठी साखर सादूक तूप घालावं. छान मऊ करावं. चांगला पाहिजे त्या आकाराचा लाडू तयार करावां परत हव असल्यास पिठी साखर मध्ये हळूच हलवावं. पोळी मध्ये पिठी साखर घालून तूप घालून गोल गुंडाळी करावी. म्हणजे क्रीमगोला सारखं लागतं. पूर्वी घरी असचं प्रकार करतं.पोटा साठी पण चागल असतं एवढी साखर तूप कणीक पोटातं जाते. व ताज घराच्या घरी पटकन करता येते.बनविता एतातं.
बाहेर केक बिस्कीट नानखटाई असे पदार्थ मीळतातं पण हे पोळीचा लाडू असे पदार्थ मागे पडले आहेतं. सहसा कोणी करतं पण नाही आणि कोणी खातही नाहीतं ही !
ॐ
खजूर : खजूर मध्ये आयर्न लोह असते. खजूर खाल्यामुळे ताकद व ताजेपणा टवटवीतपणा शरीरात मनात राहतो. खजूर कोनताही हंगामात खाल्यास चालतो. रोज दोन खजूर खाण्यास कांहीच हरकत नाहि. खजूर गरम करुन किंवा तापवून खावू नये. खजूर मिक्सर मधून बारीक मऊ करुन घ्यावा त्यात सादूक तूप घालून एकत्र करुन छोटे छोटे लाडू करावेतं व एक लाडू रोज खावां !
शेंगदाणे भाजून सालासगट किंवा सालकाढून मिक्सर मधून बारीक करावं तसेचं डाळं पण कच्च मिक्सर मधून बारीक करावं ! खजूर दाण्याचाकूट व डाळं बारीक केलेल तूप लावून एकत्र करावं करावे. लाडू तयार करून कांही लाडू तसेच ठेवावेत व कांही लाडू डाळं बारीक केले त्यात लावून ठेवावेतं. असे सर्व खजुराचे लाडू तयार करावेतं. रोज एक खजुराचा लाडू खाल्यास पोट छान भरत व नक्कीच ताजतवानं शरीर व मन राहतं ह्यात शंकाचं नाही! लहान मुलं मध्यम माणसांना व वयस्कर माणसांना पण ह्या खजुरा चां लाडूचा उपयोग होतो!
ॐ
१२.४.२०११
मंगळवार रामनवमी
राधाबाई शताब्दी सोहळा
पोवाडा
ऐका मेधा सांगते तुम्हाला
राधाबाईचा शताब्दी सोहळा SS SS जी जी जी जी SS
सन एकोणीससे अकरा सालात
नागापूरच्या कुलकर्णी घरात
चंपाबाई नावाने आल्या जन्माला SS SS जी जी जी जी SS
दिसण्यात सडसडीत
पाहण्यात तरतरीत
कसा ! ठसठसीत बांधा शोभला SS SS जी जी जी जी SS
अशिक्षित त्यांचे शिक्षण
पण सुशीक्षीताच्या वरताण
कष्टाचा करुन कळस, भाग्य आले उदयाला SS SS जी जी जी जी SS
यशंवताच्या जीवनात आल्या
देशपांड्याचा उध्दार केला
आला भर संपत्तीच्या वैभवाला SS SS जी जी जी जी SS
नाती गोती सांभाळून
संसारी आदर्श ठेवून
परमार्थ करीत राहील्या अखेर अंरवीदांच्या सेवेला SS SS जी जी जी जी SS
गणेशाच्या कृपाप्रसादाने
खंडेरायाच्या आशीर्वादाने
क्षण आला शताब्दी सोहळा भाग्याला SS SS जी जी जी जी SS
सुवासीक फुलांचे मखर
मखमली आसन जरतार
रांगोळ्याच्या आरासाने घर लागले शोभायला SS SS जी जी जी जी SS
सुवर्णालंकार अम्गाखांद्दात शालू शेला श्रीफळ हातात
वेद – मंत्राचा घोष कसा दूमदूमला SS SS जी जी जी जी SS
पंचपक्वाने चांदी ताटात
पांच फळे चंदनी परडीत
गोड गुळाची तुला करुन केली अर्पण गणेशाला SS SS जी जी जी जी SS
शंभर दिव्यांचे देदीप्यमान
लेकी सुना नातींनी केले अवक्षण
राधाबाईंना नमस्कार करुन गुळाचा खडा भरविला SS SS जी जी जी जी SS
राधाबाईंनी आशीर्वाद दिला
प्रेमाने हात फिरविला
गणेशाला म्हणतात कश्या !
पारावर नाही आनंदाला SS SS जी जी जी जी SS
सौ मेधा शरद देशपांडे.
ॐ
रामनवमी
माझे माय बाप
पिता आहे पद्माकर माता मथुरा
१३ वर्षाला केले कन्यादान
यशवंत पति दिला शोधून
सासू सासरे आहे राजघराणं
अगस्ती कुळाची झाली मी दासी
दरबार समाधीचा झाडी
आज आहे राम नवमी
दशरथ नंदन
राम आले जन्माला
आली रामाच्या वला
राम नवमी दिवशी मुलांनी केला
जन्मशताब्दी चा सोहळा
त्यांना आशीर्वाद ध्यावा !
ॐ
राधाबाई माझी आई आहे आई नं हे लिखानं तिची नात श्रुती
श्रुती देशपांडे हिच्या कडून स्वत: तयार केललं काव्य लिहून घेतलं आहे. कविता लिहूनं घेतली आहे.
ॐ
स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर
वैशाख शुक्लपक्ष ३ शुक्रवार अक्षय्य तृतीया
६ .५(मे) २०११ तारखेला आहे. चैत्र मास
महिना मधील शेवट ची तीज तिसरी तीज असते.
ॐ
१२ .४ .२०११
मंगळवार रामनवमी
राधाबाई शताब्दी सोहळा
शुभ ‘शतायु ‘ सोहळा आला माझ्या भाग्याला
राधाबाई ‘शताब्दी’ महोत्सव आम्ही केला |१|
चंपाबाई कुलकर्णी नंतर, राधाबाई देशपांडे झाल्या
‘यशवंतरावां’ सह आणि नंतरही त्यांना संसार सांभाळला |२|
बाळ, शरद आज्ञार्थी लेक राम,एक तर लक्ष्मण एक
सुनीती मेधा सुना सर्व मिळून ठेवतात त्यांची देखरेख |३|
कमल – पुष्पा लेकी महान, एक मोठी एक लहान
श्रीकांतरावां’ सारखे जावाई सासूला देत होते मान |४|
आकाश, पुष्कर, प्रणव नातू तीन श्रुती – विभूती नाती आजीशी लीन
दीपा जय म्हणे पणजी ! यू आर सेंचुरी वीन |५|
चंदनाच्या पाटावर मखमली आसन दिले राधाबाईना बसायला
सुवासीक फुलांचा भरघोस सोडल्या बाजूंना माळा |६|
रंगीबेरंगी रागोंळ्यानीं सभोवति केले मखर छान
चांदीची समई, पणत्या पुरणाच्या दिव्यांनी केले देदीप्यमान |७|
सुवर्णालंकार देऊन, शुभेच्छा सर्वानीं केल्या समर्पण
शालु शेला श्रीफल घेऊन केले त्यांना अवक्षण |८|
राधाबाईच्या वजनाची केली गोड गुळाची तुला
वेद मंत्रांच्या जय घोषात ब्राह्मणांनी आशीर्वाद मंत्र दिला |९|
गोड गुळाच्या तुलेचा,प्रसाद गणेशाला दाखविला
सर्वांनी राधाबाईना एक एक गुळाचा खडा भरविला |१०|
चांदीच्या ताटात पंच पक्वानांचे जेवण झाले
सर्वानीं त्यांना नमस्कार करुन त्यांचे आशीर्वाद घेतले |११|
‘शुतायु’ सोहळ्याचा महोत्सव आनंदात साजरा झाला
असेच ‘शतायु ‘ सोहळ्याचे भाग्य येओ मेधाच्या भाग्याला |१२|
सौ. मेधा शरद देशपांडे
ॐ
चार योगा मधून माणसांना व्यक्ती नां साधना करतां येते.
१ भक्तीयोगा २ कर्मयोगा ३ ज्ञानयोगा ४ क्रीयायोगा असे चार योगामधून साधना व रोजचे व्यवहार करता येतात.
१ भक्तियोगा: मन शांती मीळतं असते. माणसांना !व्यक्ती नां !त्यासाठी कोणत्याही देवाची भक्ती भावे पूजा करून मंत्र म्हणून घरातं पण मनोभावे आराधना केल्यास मनाला नक्कीचं शांत हलकं प्रसन्न वाटणार नक्कीचं केंव्हा केंव्हा त्या देवाची भक्ती करतो त्या देवळातं अधून मधून जाऊन आल्यास देव भेटल्यासाराखं वाटणार डोळ्यातं दिसणार. कांही दिवासां नंतर झोपेतं देव दिसतातं. हे नक्कीचं !
२ कर्मयोगा: सणाला महिनातून एकदा देवळातं किंवा कोणासही मदतं ईच्छेप्रमाणे केल्यास त्याचा पण आपल्या मनाला शांतता वाटणारं. हे नक्कीचं !
३ ज्ञानयोगा: आपल्या जवळ कला पदार्थ अभ्यास शाळकरी मुलांना कांही पैसे न घेता शिकविले तर त्याचं पण आपल्याला शांततां वाटणार. प्रसन्न आपल्याला वाटणार. हे नक्कीचं !
४ क्रियायोगा : आपल्या हातून कला शिकली कांही वाचन केल देवाचं समाजाचं लिहून काढलं एखाध्याला आपला आवडीचा पदार्थ दिला वा वस्तू दिली तर त्याचा ही आपणास संतता वाटणार ! आवडीची फूल आणली विणकाम केले घर निट ठेवले ह्यातही सांततां वाटणार!कोणा व्यक्ती स भेटल्यावर पण शांतता वाटणार नक्कीचं !
असे चार योगा मन शांत साठी आहेत. कोणताही मार्गामुळे शांतता प्रसनता उच्छाह मनातं शरीरातं निर्माण करतं गेल्यास आपल शरीर मन कशाची ही भीती न राहता ताजतवानं राहिलं ह्यात शंकाचं नाही नक्कीचं !
ॐ
पूर्वी ब्लॉग मध्ये घरगुती लाकडाचे सेल्फ याची माहिती लिहिलेली आहे.
आता ईतर लाकूड विषयी माहिती लिहित आहे देतं आहे.
लाकूड : लाकडा पासून छान छान वस्तु बनविल्या जातातं बनवितातं. दिवाण खाण्यात खुर्ची खुर्च्या टेबल व पुस्तक ठेवण्यास छोटे टेबल व कपाट पण बनवितातं. कपडे शोभेच्या वस्तु ठेवण्यास पण लाकडा पासून केलेले कपाट वापरतातं. जेवणासाठी टेबाल खुर्च्या वापरातातं. घरांची दार खिडक्या साठी लाकडापासून तयार केकेले सुरेख डिझाईन असलेले वस्तू वापरातातं. भांडी ठेवण्यासाठी लाकडापासून तयार केलेले कपाट वापरतातं.
मैसूर मध्ये मशीन ने तयार केलेले डीझाईन चे तीन पाई टेबल देखणं विकतं कोठेही मिळतं. तसेच घडीचे उंच उभे देखणे स्टँड मिळतातं. स्टँड वर पण डीझाईन असते. लाकडा पासून कागद पण बनवितातं.
सागवान लाकूड आंबा लाकूड चंदन लाकूड बांबू लाकूड शिसम लाकूड वेताच्या काठ्या असे वेगवेगळे प्रकार लकडा मध्ये असतातं मिळतातं.
ॐ
१ मे(५) तारखेला महाराष्ट्र दिन साजरा करतातं आधी गुजराथ व महाराष्ट्र एकत्र च असायचे. स्वतंत्र महाराष्ट्र होण्याकरता एस. एम. जोशी धोंडो केशव कर्वे व ईतर सर्वांनी खूपचं पुढाकार घेतला आहे त्यावेळेला.
पंतप्रधान जवाहरलाल नेहरू असतांना १ मे १९६० तारखेला महाराष्ट्र स्वतंत्र झाला आहे.
त्या वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कराडचे श्री. यशवंतराव चव्हाण होते.
१ मे(५) २०११ तारखेला
सर्व महाराष्ट्रा ला शुभेच्छा ! व नमस्कार.