छायाचित्र
ॐ
छायाचित्र
ॐ
ॐ
कैरी चा साखर आंबा: कैरी सालासगट किसून घ्यावी.जेवढा कैरीचा किस असेल तेवढी दुप्पट साखर घ्यावी. साखर व कैरीचा किस एकत्र करावं करावे. छान हलवत शिजवित राहवं रहावे.
थोडस पातळ रस राहिल ईतक शिजवावं शिजवावे.
कैरी व साखर आंबट गोड चव नक्कीचं चांगली लागते. पोळी बरोबर खाण्यास पोट भरतं.
डबा किंवा प्रवासातं छोट्या बाटलीत कैरीचा साखर अंबा नेता येतो. काचेच्या बरणीत भरपूर दिवस कैरीचा साखर अंबा चांगला टिकतो राहतो.
सालासगट किसलेला कैरीचा साखर आंबा
ॐ
असेच पांढरा दुधी भोपळा किसुन दुध साखर एकत्र करुन पण दुधी हलवा तयार करता येतो.
उपास सोडतांना गोड खावं !
गाजर हलवा : गाजर कीसून घ्यावेत घ्यावीत साखर दुध किसलेली गाजर एकत्र करुन छान शिजवावं कुकर मध्ये ठेवु नये दुध गाजराच्या किसाच्या दुप्पट दुध घ्यावं साखर गाजराच्या किसाच्या निम्मी घ्यावी.एकत्र थोड शिजवितांना गाजराच्या किसा मध्ये दुध राहील असं सर्व शिजविलेल गाजराचं एकत्र शिजविलेल हलवा तयार करावा. वाटल्यास बारीक केकेले केलेलं गाजर हलवा मध्ये घालावे.घालावं. वेलची पुड घातली तरी चालते. हरकतं नाही. मुळातच नुसता साखर दुध गाजर किसलेलें शिजविलेले चांगल लागतं पोळी बरोबर गोड खाण्यास चांगलाचं लागतो.
ॐ
श्रीशालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर उत्तरायण ग्रीष्मऋतु ज्येष्ठ शुक्लपक्ष १५ बुधवार वटपोर्णिमा वृषभपूजन नक्षत्र ज्येष्ठा २५|०५ १५ जून(६) बुधवार २०११ वटपोर्णिमा ज्येष्ठ पोर्णिमा वडपोर्णिमा वडाच्या झाडाची पूजा करतात. पोर्णिमा असली की चंद्र ग्रहण असते ह्यावर्षी खग्रास चंद्रग्रहण आहे. वडाच्या पानांची वाडाच्या झाडाची पूजा करतात.गुरुजी व सवाष्ण सुवासिनींना आंबे वाण करतात. कांही ठिकाणी बैलाची पूजा ज्येष्ठ पोर्णिमा लाचं करतात.
ॐ
मी संगणक शिकायला सुरुवात केली पुस्तक मधील पण लिखाण निट येत नसतं.नव्हतं. एक एक शब्द मी ओळीत लिहायला शिकले.
उदा :सतार सतार सतार सतार सतार
जासवंद जासवंद जासवंद जासवंद जासवंद
तुळस तुळस तुळस तुळस तुळस
दुर्वा दुर्वा दुर्वा दुर्वा दुर्वा
फोन फोन फोन फोन फोन
मराठी पुस्तक पाहून शब्द स्पेलींग करायला शिकले. श्र्लोक लिहिले. आता मला सर्व चांगल मराठी स्पेलींग करता येतात यावयाला लागले आहेत. त्यामुळे माझ लिखान पटकन लवकर तयार होत आहे. लिखान करण्यास ही चांगल वाटत आहे. मी आधी इंग्रजी पुस्तक संगणक मध्ये लिहिण्यास सुरुवात केली आहे. नंतर शब्द तयार करुन हळुहळू मराठी करायला शिकले आहे. आता मला पूर्ण मराठी संगणक मध्ये लिहिता येईल अशी खात्री वाटली ! नंतर मी ब्लॉग लिहिण्यास सुरुवात केली आहे. आता माझे ब्लॉग २२७ झाले आहेत .मला खूप हलकं समाधान मस्त वाटतं आहे हे नक्कीचं.
मी स्वतः वाचन व लिखाण केल्याच मला स्वतःला छान व चांगलं वाटत आहे.
ॐ
महालक्ष्मी मंदिर : महालक्ष्मी मंदिर मुंबईकरांचे श्रध्दास्थान आहे.वरळीपासून पुढे हाजी अलीमार्गे गेल्यास हे मंदिर लागते. टेकडीच्या उतारावर समुद्रकिनाऱ्या हे मंदिर आहे.
दुर्गेचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती अशा तीन देवींच्या मूर्ती या मंदिरात आहेत. मंदिरातील महालक्ष्मीची देवी वाघ आणि महिसासुरावर आरूढ झालेली आहे.
साधारणत: दोनशे वर्षापेक्षा जास्त जुन्या असलेल्या या मंदिरातील मूर्ती वरळी समुद्रातून काढण्यात आल्याचे सांगितले जाते. प्रसस्त सभामंडप, पाणपोई आदी सुविधा या मंदिरात आहेत. मंदिरातील प्रसन्न वातावरण आणि समुद्रावरुन येणारा अल्हाददायक वारा यामुळे पायऱ्या चढून मंदिरात आल्यावर थकवा जाणवत नाही.
नवरात्रोत्सवात येथे नऊ दिवस मोठा उत्सव असतो. लाखो भावीक या काळात दर्शन घेतात.
मी हे मुंबई येथील महालक्ष्मी मंदिर पाहीलेल आहे.
ॐ
कोल्हापूर : तब्बल वर्षानंतर विमानसेवा कोल्हापूर ते मुंबई पुन्हा सुरु झाली आहे. आठवड्यातून चार दिवस असणारी ही विमानसेवा आहे.
विमानातालावारुणा २७ प्रवाशांना घेऊन शुक्रवार पासून १० .जून २०११ कोल्हापूर ते मुंबई ला प्रारंभ सुरुवात झाली.
मुंबईहून दहा १० वाजता ‘टेक ऑफ’ होणार असून कोल्हापूर सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी लीदिम्गा होणार आहे.११.३५ ला मुंबईसाठी ‘टेक ऑफ आणि मुंबईत १२.३५ ला लँडींग होणार आहे. वर्षभर धावपट्टी खराब असल्याच्या कारणावरुन वर्षभर विमान सेवा बंद होती.ती आता पूर्ववत सुरु झाली आहे.
कोल्हापूर हून मुंबई कडे विमानाने झेप घेतली. झेप घेणाऱ्या विमानाचे छायाचित्र.
ॐ
” ….. बीज पेरणे आणि अंकुराने फूल धारण करणे ही मनाला जितकी प्रसन्न करणारी गोष्ट आहे तसाचं नव्या घराच …… चारी दिशा एकत्र करणे म्हणजे घर.
चारी दिशातला आनंद , उल्हास आणि आशा आकांक्षा एकत्र आणणाऱ्या भिंती म्हणजे घर –
घरावर सूर्यप्रकाशाची सांवली आणि चंद्रप्रकाशाचे ‘उन्ह ‘ असते. घरात माणसे आनन्दाने राहतात,
घराभोवतीने कळ्यांची फुले होतात.मोगरी,चमेली चाफा यांना तर दर दिवशी नवनवीन स्वप्ने पडत असतात.
घरांत एक ‘अबोली’ स्वामिनी असते तशी घराबाहेर परासाशी कर्दळी अबोली असते …
चराचराचे मानवाशी आणि मानवाचें अनन्ताशी नाते जोडणारा दुवा म्हणजे घर ….. ”
श्रीकांत चिवटे
२६. १२. ६८
माझ्या सौ नणंद नंदुताई यांच्या वास्तू साठी हे लिखाण ह्यांनी केले आहे.
कोणाचाही वास्तूला सहज शोभून दिसणार आहे.
ॐ
राजाराम कॉलेज : कोल्हापूर संस्थानच्या शाहू महाराजांनी १८८३ मध्ये म्हणजे स्थापना केली. शाहू महाराजांसारखे द्रष्ट्रा राजा त्यांनी संस्थानच्या प्रजेची आर्थिक प्रगती आणि मानसिक उन्नती व्हावयाची असेल तर ती फक्त शिक्षणातून होऊ शकते.म्हणून त्यांनी नानापरीने प्रजेला उच्च शिक्षण देण्यासाठी उत्तेजन दिले.आर्थिक मदत केली. शिक्षणासाठी हवा तेवढा आर्थिक निधी उपलब्ध करून दिला.प्रजेला गुनात्तेवर आधारित शिक्षण द्दायचं होतं.
त्यासाठी त्यांनी गुनवाण प्राध्यापकांचा भारतभर शोध घेतला.आख्या देशात जे निष्णात प्राध्यापक होते त्यांना महाराजांनी सन्मानानं आमंत्रेत केलं प्रांत, जात पात धर्म यांचा विचार त्यांनी केला नाही. प्राध्यापकांसाठी त्याच्या पात्रतेप्रमाणे पगार दिले.
आता नवीन राजाराम कॉलेज शिवाजी विद्दापीठ येथे निघाले आहे. नवीन राजाराम कॉलेज येथे आमची मूले शिकली आहेत.
ॐ
गोविंदराव टेंबे : त्यांचा जन्म ५ जून (६) १८८१ रोजी झाला. रसिकाग्रणी गोविंदरावांनी आपल्या पेटीवादनातून गायकीचा भास निर्माण केला.स्वरांचे नर्तन आणि बोल काढण्यात त्यांचा हातखंडा होता. महाराष्ट्रात पेटीवादनाला वेगळे आकर्षक रूप देण्यात गोविंदरांवाचा सिंहाचा वाटा होता.
गंधर्व नाटक मंडळीच्या पहिल्या कचापासून ते पटवर्धन तुळशीदासांपर्यंतच्या नाटकात आणि अयोध्येचा राजा व मायाम मछिंद्र सिनेमात ते गायलेसुध्दा. विद्दाहरण, मानापमान या नाटकातील पदांना त्यांनी चाली लावल्या. अनेक चित्रपट पदे, संवादही लिहिले.
अल्लादियाखांचे चरित्र, कल्पना संगीत ही पुस्तके लिहिली. ‘माझा संगीत व्यांसग व माझा जीवनविहार’ या पुस्तकांव्दारे आपला जीवनपट रसिकांसमोर उलागडून दाखविला.
ॐ
५५. परवचा
शाबास सुनबाई
अंगण कसं अरुवार सारवलंस
धुळवट हिरवगार केलंस
चार ठिपके काढ रंगीळी
अगं काढ इथे तिथे
बाळ दुडदुडत गेलंय ना
त्याच्या आगे मागे
जोड ठिपके रेषेनं
वळ थोडी एकादं फूल काढ
रांगोळीत पेर हळद कुंकू
कशाला हे जुने थेर ?
अग…धुळीला जिंकायच
सरळ…वाकडे जायचं
माहेर सारवायचं
तरी हसायचं
हाच तर संसार
ठिपके बरेच
एक समर्थ अनुस्वार
श्रीकांत चिवटे
वसुधालय पुस्तक मधील त्यांची ही कविता आहे.
ॐ
धांदल प्रवेशाची : बारावी परीक्षेचे निकाल लागले जाहीर झाले. आता दहावीच्या परीक्षेचे निकाल लागतील. या दोन्ही कारकीर्दीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असतात.हे निकाल लागले की पुढील अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी धावपळ सुरु होते.कारकिर्दीच्या अनेक नवनवीन वाटा निर्माण होऊ लागल्या आहेत
त्यामुळे कोणता अभ्यासक्रम सुरु करावा हा विद्दार्थाला प्रश्र्न असतो. कोणता अभ्यासक्रम आपल्यासाठी सोयीस्कर आहे हे ठरवावे. एकदा घेतलेल्या निर्णयात बदल करु नये. अशी सवय लागाली की कोणत्याचं क्षेत्रात स्थिर राहणे शक्य असते.
कांही वेळेला काहींचा आत्मविश्वाश डळमळीत होतो आणी ते अभ्यासक्रम अर्धवट सोडून गावी परततात. आयुष्याचे नुकसान ही होण्याची शक्यता असते.
पालकांनी मुलांना धीर व खंबीर पाठबळ देणे आवश्यक असतें.
आंब्याचा रसाचा शिजविलेला गोळा !
ॐ
इराणी हॉटेल मुंबईचे सांस्कृतिक भूषण : कल्पक, उद्दोजक पारशी धनिकांनी शिक्षित इराणी लोकांना आपल्या उद्दोगधंद्दांतून,आस्थापनांतून सामावून घेतले. अनेकांना हॉटेल धंदा उभारण्यास मदत केली. १९ व्या शतकाच्या अखेरपर्यंत मुंबईत भरपूर मोकळ्या जागा उपलब्ध होत्या. इराण्यांनी १८५० पासूनच कोपऱ्यावरच्या या मोक्याच्या जागा आपल्या हॉटेल धंद्दासाठी व्यापण्यास सुरुवात केली आणि हळुहळू इराणी हॉटेल मुंबईच्या संस्कृतीचा भाग होता गेली.
मध्यमवर्गीय घरात शालेय वयातील मुलांना महिन्याच्या खर्चासाठी फक्त सणासुदीला, वाढदिवसाला दोन – चार आणे देतं असतं.
त्या काळात नाक्यावरचा इराणी म्हणजे पंधरा पैशांत एका कप चहा वर परत पंख्याचा वारा व वाचायला ताजे वर्तमानपत्र फुकट. लोक यांच्या हॉटेलमध्ये चक्क ‘शब्दरंजन’ कोडी सोडवत बसतं.
ऐतिहासिक, सामाजिक आणि आर्थिक दृष्टीने इराणी हॉटेल हा एक अभ्यासाचा विषय आहे.
त्याकाळी ट्राम होत्या. मी ट्राम मध्ये बसले आहे. त्यावेळेला बग्गी पण होती. मी बग्गीत बसले आहे.
ॐ
रांगोळी ने नी श्र्लोक लिहीले आहेतं ! मी स्वतः रांगोळीने श्र्लोक लिहिले आहेत. छायाचित्र पण मी स्वतः काढले आहेत.
ॐ
श्रीशालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर ३० बुधवार दर्श भावुका अमावास्या, शनैशचर जयंती
बुधवार १ जून (६) २०११ तारीख ला दर्श भावुका अमावास्या, शनैश्चर जयंती आहे. आरती लिहिली आहे.
ॐ
श्रीशनिदेवाची आरती
जय जय श्रीशनिदेवा | पद्मकर शिंरीं ठेवा ||आरती ओंवाळितो |मनोभावें करुनी सेवा ||धृ.||
सुर्यसुता शनिमुर्ति तुझी अगाध कीर्ति || एक मुखें काय वर्णू | शेषा न चाले स्फूर्ती ||जय.||१||
नवग्रहामाजीं श्रेष्ठ | पराक्रम थोर तुझा || ज्यावरी तूं कृपा करीसी | होय रंकाचा राजा ||जय.||२||
विक्रमासारिखा हो | शककर्ता पुण्यराशी || गर्व धरितां शिक्षा केली | बहु छळियलें त्यासी ||जय.||३||
शंकराच्या वरदानें | गर्ग रावणें केला || साडेसाती येतां त्यासी | समूळ नाशासी नेला ||जय.||४||
प्रत्यक्ष गिरुनाथा | चमत्कार दावियला || नेउनि शूळापाशीं | पुन्हां सन्मान केला ||जय.||५||
ऐसे गुण किती गाऊं | धनी न पुरे गाता || कृपा करी दीनावरी | महाराजा| समर्था ||जय.||६||
दोन्ही कर जोडुनीयां रुक्मा लीन सदा पायीं || प्रसाद हाचि मागें उदयकाळ सौख्यदावी ||
जय जय श्रीशनिदेवा | पद्मकर शिरीं ठेवा. ||७||