आपले स्वागत आहे!

Archive for जून 1, 2011

शनैश्चर जयंती

श्रीशालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर ३० बुधवार दर्श भावुका  अमावास्या, शनैशचर  जयंती

बुधवार  १ जून (६) २०११ तारीख ला दर्श भावुका अमावास्या, शनैश्चर  जयंती आहे. आरती लिहिली आहे.

श्रीशनिदेवाची आरती

जय जय श्रीशनिदेवा | पद्मकर शिंरीं ठेवा ||आरती ओंवाळितो |मनोभावें करुनी सेवा ||धृ.||

सुर्यसुता शनिमुर्ति तुझी अगाध कीर्ति || एक मुखें काय वर्णू | शेषा न चाले स्फूर्ती ||जय.||१||

नवग्रहामाजीं श्रेष्ठ | पराक्रम थोर तुझा || ज्यावरी तूं कृपा करीसी | होय रंकाचा राजा ||जय.||२||

विक्रमासारिखा हो | शककर्ता पुण्यराशी || गर्व धरितां शिक्षा केली | बहु छळियलें त्यासी ||जय.||३||

शंकराच्या वरदानें | गर्ग रावणें केला || साडेसाती येतां त्यासी | समूळ नाशासी नेला ||जय.||४||

प्रत्यक्ष गिरुनाथा | चमत्कार दावियला || नेउनि शूळापाशीं | पुन्हां सन्मान केला ||जय.||५||

ऐसे गुण किती गाऊं | धनी न पुरे गाता || कृपा करी दीनावरी | महाराजा| समर्था ||जय.||६||

दोन्ही कर जोडुनीयां रुक्मा लीन सदा पायीं || प्रसाद हाचि मागें उदयकाळ सौख्यदावी ||

जय जय श्रीशनिदेवा | पद्मकर शिरीं ठेवा. ||७||

%d bloggers like this: