आपले स्वागत आहे!

Archive for जून 3, 2011

इराणी हॉटेल

इराणी हॉटेल मुंबईचे सांस्कृतिक भूषण : कल्पक, उद्दोजक पारशी धनिकांनी शिक्षित इराणी लोकांना आपल्या उद्दोगधंद्दांतून,आस्थापनांतून सामावून घेतले. अनेकांना हॉटेल धंदा उभारण्यास मदत केली. १९ व्या शतकाच्या अखेरपर्यंत मुंबईत भरपूर मोकळ्या जागा उपलब्ध होत्या. इराण्यांनी १८५० पासूनच कोपऱ्यावरच्या या मोक्याच्या जागा आपल्या हॉटेल धंद्दासाठी व्यापण्यास सुरुवात केली आणि हळुहळू इराणी हॉटेल मुंबईच्या संस्कृतीचा भाग होता गेली.

मध्यमवर्गीय घरात शालेय वयातील मुलांना महिन्याच्या खर्चासाठी फक्त सणासुदीला, वाढदिवसाला दोन – चार आणे देतं असतं.

त्या काळात नाक्यावरचा इराणी म्हणजे पंधरा पैशांत एका कप चहा वर परत पंख्याचा वारा व वाचायला ताजे वर्तमानपत्र फुकट. लोक यांच्या हॉटेलमध्ये चक्क ‘शब्दरंजन’ कोडी सोडवत बसतं.

ऐतिहासिक, सामाजिक आणि आर्थिक दृष्टीने इराणी हॉटेल हा एक अभ्यासाचा विषय आहे.

त्याकाळी ट्राम होत्या. मी ट्राम मध्ये बसले आहे. त्यावेळेला बग्गी पण होती. मी बग्गीत बसले आहे.

%d bloggers like this: