आपले स्वागत आहे!

Archive for जून 6, 2011

‘परवचा’

५५. परवचा

शाबास सुनबाई
अंगण कसं अरुवार सारवलंस
धुळवट हिरवगार केलंस
चार ठिपके काढ रंगीळी
अगं काढ इथे तिथे
बाळ दुडदुडत गेलंय ना
त्याच्या आगे मागे
जोड ठिपके रेषेनं
वळ थोडी एकादं फूल काढ
रांगोळीत पेर हळद कुंकू
कशाला हे जुने थेर ?
अग…धुळीला जिंकायच
सरळ…वाकडे जायचं
माहेर सारवायचं
तरी हसायचं
हाच तर संसार
ठिपके बरेच
एक समर्थ अनुस्वार

श्रीकांत चिवटे

वसुधालय पुस्तक मधील त्यांची ही कविता आहे.

%d bloggers like this: