आपले स्वागत आहे!

Archive for जून 7, 2011

गोविंदराव टेंबे

गोविंदराव टेंबे : त्यांचा जन्म ५ जून (६) १८८१ रोजी झाला. रसिकाग्रणी गोविंदरावांनी आपल्या पेटीवादनातून गायकीचा भास निर्माण केला.स्वरांचे नर्तन आणि बोल काढण्यात त्यांचा हातखंडा होता. महाराष्ट्रात पेटीवादनाला वेगळे आकर्षक रूप देण्यात गोविंदरांवाचा सिंहाचा वाटा होता.

गंधर्व नाटक मंडळीच्या पहिल्या कचापासून ते पटवर्धन तुळशीदासांपर्यंतच्या नाटकात आणि अयोध्येचा राजा व मायाम मछिंद्र सिनेमात ते गायलेसुध्दा. विद्दाहरण, मानापमान या नाटकातील पदांना त्यांनी चाली लावल्या. अनेक चित्रपट पदे, संवादही लिहिले.

अल्लादियाखांचे चरित्र, कल्पना संगीत ही पुस्तके लिहिली. ‘माझा संगीत व्यांसग व माझा जीवनविहार’ या पुस्तकांव्दारे आपला जीवनपट रसिकांसमोर उलागडून दाखविला.

DSCF1685

%d bloggers like this: