आपले स्वागत आहे!

Archive for जून 13, 2011

मुंबई महालक्ष्मी मंदिर

महालक्ष्मी मंदिर : महालक्ष्मी मंदिर मुंबईकरांचे श्रध्दास्थान आहे.वरळीपासून पुढे हाजी अलीमार्गे गेल्यास हे मंदिर लागते. टेकडीच्या उतारावर समुद्रकिनाऱ्या हे मंदिर आहे.

दुर्गेचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती अशा तीन देवींच्या मूर्ती या मंदिरात आहेत. मंदिरातील महालक्ष्मीची देवी वाघ आणि महिसासुरावर आरूढ झालेली आहे.

साधारणत: दोनशे वर्षापेक्षा जास्त जुन्या असलेल्या या मंदिरातील मूर्ती वरळी समुद्रातून काढण्यात आल्याचे सांगितले जाते. प्रसस्त सभामंडप, पाणपोई आदी सुविधा या मंदिरात आहेत. मंदिरातील प्रसन्न वातावरण आणि समुद्रावरुन येणारा अल्हाददायक वारा यामुळे पायऱ्या चढून मंदिरात आल्यावर थकवा जाणवत नाही.

नवरात्रोत्सवात येथे नऊ दिवस मोठा उत्सव असतो. लाखो भावीक या काळात दर्शन घेतात.

मी हे मुंबई येथील महालक्ष्मी मंदिर पाहीलेल आहे.

DSCF1695  DSCF1698

%d bloggers like this: