आपले स्वागत आहे!

Archive for जुलै, 2011

श्रावण महिना

स्वस्ति शालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर दक्षिणायन वर्षाऋतु श्रावण शुक्लपक्ष नक्षत्र आश्लेषा १ प्रतिपदा रविवार जुलै ३१ २०११ तारीख श्रावण महिना सुरु होत आहे.हया महिनात दरवार ला महत्व आहे. रविवार सूर्य याची पूजा करतात. विडाच्या पानावर सुदर्शनचक्र काढतात. आदित्यराबाईची पूजा करतात. सोमवार महादेव याची पूजा करतात सकाळी ऊपवास करुन संध्याकाळी सुर्यास्तानंतर जेवन करणे ऊपवास सोडतात. महादेव याला बेल व मुग तिळ तांदुळ सातू याची शिवामुठ वाहतात. मंगळवार मंगळागौर करतात.बुधवार बुधब्रहस्पती ची पूजा करतात. गुरुवार ब्रहस्पती याची पूजा करतात. शुक्रवार ज्यूती ची पूजा करतात मुलांना आई ओवाळते. स्ववांष्ण जेवायला बोलावतात. पूरणपोळी करतात. शनिवार शनिची पूजा करतात. मुंजा मुलगा याला जेवायला बोलावतात. तसेच नागपुजा राखीपोर्णीमा कृष्णजन्म पिठोरी अमावास्या मातृदिवस असा सर्व श्रावण महिना सन साजरा करतात.

पूजा करतांना आधी पूजा च साहित्य याची तयारी करतात. हळद कुंकू देठासगट वीडा याची पान सुपारी हळकुंड अख्खे बदाम खारीक गुळ खोबर पंचामृत (दुध मध तुप दही साखर) कापूस वाती व फूलवाती तुपातल्या सहान खोडवर उगाळलेल गंध घंटा दक्षिणा लाल रक्तचंदन वासाच अत्तर तांदुळ ओले हळद कुंकू लावलेले अक्षदा फूल पत्री तुळस दुर्वा नैवेद्द साठी केळं फळ असं आधी पूजा याची तयारी करतात.

DSCF1837  DSCF1839

DSCF1843  DSCF0669

रविवारची आदित्य राणूबाईची सूर्याची पूजा करतात मी केली आहे.

वक्तीमत्व

मी ब्लॉग पोस्ट लिखाण केले आहे. वर्तमानपत्र व साप्ताहिक मासिक व मी काढलेले रांगोळ्या महात्वाचं श्रीयंत्र कागदावरचं रंगीत श्रीयंत्र तसेचं काचेवर मेंदीन काढलेले चित्र. सतार शिकले ह्याची माहिती दिली आहे .पाककृती मी केलेली लिहिली आहे.घरातील पुस्तकं इतारांच घरगुती लिखानं घरगुती ईतर थोर व्यक्ती यांची छायाचित्र तसेच लिखान करताना कांही छायाचित्र लावली आहेतं. घरातील कुंडीतील झाड ईतर फूल व बरेचं छायाचित्र व ईतर माहिती मी पोस्ट मध्ये लिहिली आहे. ह्यामुळे मी केलेलं वाचनं मी केलेलं कलाकोशल्य मी केकेली पाककृती घरातील राहणीमान नातेवाईक समाजातं वावरतांना माझं वक्ती मत्व दिसून येतं. हे सर्व लिहिताना वेळ आहे म्हणून लिहिले आहे असं वाटणारं ! एवढं वाचन कला पाककृती घर सजावटं जवळ असल्यामुळे मला हे सर्व लिखाण करायला मिळालं आहे.ह्याचं मला स्वत: ला खूपचं समाधान अभिमान वाटतं आहे. मी S.S.C.पास झाले आहे. मी मराठी टाईपराईटर वर मराठी टाईप केले आहे. परीक्षा पण दिली आहे. साडी,रुमाल पेंटिंग केले आहे. हे नक्कीचं ! ब्लॉग पोस्ट २४४ झाले आहेतं. व प्रतिक्रिया व भेटी ११०७६ झाले आहेत. आजपर्यंत तारीख २८ जुलै (७) २०११.

दिगन्तर


दिगन्तर
पायातल्या माती सवे
गुण करीत बोललो
मजेमजेतच चाललो

वाटा निराळ्या जाहल्या दिशा कधी ना थांबलो
माथ्यावरी उन्ह झेलता झाडांसवे भांडलो
मजेमजेतच चाललो

झाडे म्हणाली हा शहाणा फुले मलाच हसली
त्या हसण्याने कृध्दसा पक्षांवरी रागावली
मजेमजेतच चाललो

पायांत पाणी थांबले प्रतिबिंब डोळा पाहता
स्वत:स मी वेडावले डोळ्यांत पुरता न्हालो
मजेमजेतच चाललो

चालताना वाट म्हणते माती घेरे जाणूनी
अन् दिशा शोधताना मी दिगंतर जाहलो
मजेमजेतच चाललो

श्रीकांत चिवटे

ह्यांची ही कविता ह्यांचाच “तुळसपाणी” पुस्तकामधील आहे.

संगणक

संगणक करतांना मी संगणक याची काळजी घेते. प्रथम संगणक याचं लाईट चं बटन चालू करते.
संगणक दार उघढून संगणक कुक कुक असा आवाज येतो चित्र येतात E (ई मेल) S (स्काईप) ईतर संगणक मध्ये आल्यावर कनेश्नन कनेंक्ट करते.
पासवर्ड आपोआप येतो नंतर मी E S ईंटरनेट स्काईप ब्लॉग E सर्व बघून गुगल मराठी टाईप करून पेस्ट करुन छायाचित्र घालण्यास शिकले. सेंड करते. माझ्या हॉटमेल मध्ये सेंट मध्ये बघते.
बरोबर आले आहे का?ते. नंतर हॉटमेल वर येते. कनेंश्नन कनेंक्ट कानेंश्नन करते.
संगणक बंद होतो नंतर लाईट संगणक चा बंद करते. संगणक पण बंद करते. चांगली संगणक याची काळजी घेते.

Sony Vaio CR laptop

तुळस

आषाढ महिना चालू आहे. विठोबा विठ्ठल याला तुळस आवडते.आषाढ एकादशी ला विठ्ठल याला तुळशी चा हार घालतात.
तसेच पंढरपूर येथे विठोबा च्या विठ्ठल याच्या दर्शन याला वारी दिंडी बरोबर जातांना बायका पाटावर तुळशी वृंदावन नेतात.
हवा शुध्ध राहण्याकरता व तुळस ऑक्सीजन सोडते त्याचा ऊपयोग वारी दिंडी बरोबर ऊपयोग होतो.
तुळस विठ्ठल व कृष्ण यांना आवडते. आता श्रावण एईल! कृष्णजन्म एईल! एरवी पण अंगणातं कुंडीत तुळस लावतातं.

मी आमच्या घरात कुंडीत तुळस लावलेली आहे. कांही जुनी व नवीन लावलेली आहे.

DSCF0827  DSCF0825

तुळस  DSCF1827

संगणक

मी संगणक शिकताना अशा खुणा शिकले आहे. त्या सर्व खुणा एकत्र करण्याचा प्रयत्न केला होता !

VASUDHA


! [ ] ( ) / ? : ;& % – — 1 \ | , ‘ ‘ 0 ” ” = ` ~ . VASUDHA

:

टाईपराईटर

पूर्वी टाईपराईटर असायाचे मराठी / ईंग्रजी कागद मशीन मध्ये घातलेला दिसत असे ओळ येण्याकरता हाताने मशीन चा दांडा सरकवावयालागत असे परत ओळ लिहून झाल्यावर परत तस करुन कागद मध्ये लिखान होत असे. मी मराठी टाईप केकेले आहे.मला आजही टाईपरायटर आठोवतो ! आवाज पण कागदावर टाईप येत असतं दांडा हलवतांना पण आवाज येत असे.मी काय लिहिले हे मला समजत असे. आता टाईपराईटर मशीन दिसतचं नाही.

पूर्वी फोन काळे गोल बोट गोल मध्ये घालून फोन लावत असे. आता ते फोन पण दिसत नाहीत. संगणक मोबाईल फोन फोन बोलन टाईप करतात.स.म एस पाठवतात गाडी एस .टी. कोठेही बोलू शकतात. परदेशात पण बोलु शकतात. संगणक मध्ये झटपट लिहुन बोलता येते. आता संगणक पेक्षा नवीन संगणक आले आहेत. सुधारणा जरुर व्हावयाला पाहिजे !

पण जुने टाईपराईटर फोन संगणक जुने जपून ठेवने आवश्यक आहे. नवीन पीढीला टाईपराईटर जुने फोन संगणक माहिती व पाहण्यास नक्कीचं आवडणार ! मुझियम ठेवलेले असणार !नक्कीचं !

कालीदास

कालीदास : आषाढ शुक्लपक्ष प्रतिपदा १ हा दिवस कालीदास यांचा मानला जातो. कालीदास यांनी मेघदूत, रघुवंशम्, कुमारसंभवम्, अभिज्ञानशाकुंतलम् ,मालविकाग्नीमित्रम् ही कालीदास यांनी संस्कृत मध्ये लिहिलेली आहेत.नाटके देखील प्रसिध्द आहेत. महाकव्यांचे कर्ता म्हणून कालीदास सुपरिचत आहेत. पाचं शतक ते सहावे शतक या काळात अथवा गुप्त साम्राजाचा काळखंडात कालीदास होऊन गेले असावे असे मानले जाते. साहित्यातील ‘उपमा’ द्यावितर ती कालिदासाने असे विव्दान म्हणतात.

पूर्वी T.V. मध्ये कालीदास यांचा महिमा पाहिला आहे. नागपूर मराठवाडा ढग कशे जातात असे वर्णन पाहिली आहेत लिखानात हवामान निसर्ग यांच वर्णन नकाशा न बघता केलेल आहे. कसा अभ्यास केला असणार !

DSCF1767  DSCF1748

श्रीविठोबाच्या आरती

श्रीविठोबाच्या आरती

युगें अठ्ठावीस विटेवरी उभा वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा | पुंडलीकाचे भेटी परब्रह्म आलें गा | चरणीं वाहे भीमा उध्दरीं जगा ||१|| जय देव जयदेव जय पांडुरंगा | रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावें जीवलगा ||धृ.||तुळसीमाळा गळा कर ठेवुनि कटी |कांसे पितांबर कस्तुरी लल्लाटी || देव सुरवर नित्य येती भेटी | गरुड हनुमंत पुढें उभे राहती ||जय||२|| धन्य वेणूनाद अनुक्षेत्रमाळा | सुवर्णाचीं कमळें वणमाळा गळां || राई रखुमाबाई राणीया सकळा | ओंवाळीती राजा विठोबा सांवळा ||जय.||३|| ओंवाळुं आरत्या कुर्वंड्या येती |चंद्रभागेमाजी सोडूनियां देती | दिंड्या, पताका वैष्णव नाचती | पंढरीचा महिमा वर्णावा किती ||जय.||४|| आषाढी कार्तिकी भक्तजन येती | चंद्रभागेंमाजी स्नानें जे करिती दर्शनहेळामात्रे तयां होय मुक्ती | केशवासी नामदेव भावें ओंवाळीती ||ज्या देवा जय. ||५||

ही आरती नामदेव यांनी लिहिली आहे. केशवावासी नामदेव भावें ओंवाळीती ||

आषाढ महिना चालू आहे.विठ्ठल विठ्ठल हरी नामाचा गजर पूर्ण आषाढ महिनात असतो. आता कृष्णपक्ष दुसरी एकादशी एईल | पंढरपुर गावागावात कोणी घरात विठ्ठल नामाचा भक्ती भावानं पूजा ध्यानं करतात

म्हणून मी ही आरती लिहिली आहे.

DSCF1263  DSCF1752

हा फोटो महाराष्ट्र टाइम्स मधून घेतला आला आहे.

व्यासपोर्णिमा

स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर दक्षिणायन ग्रीष्मऋतु आषाढ शुक्लपक्ष १५ शुक्रवार आषाढ पोर्णिमा गुरुपोर्णिमा व्यासपोर्णिमा झाली आहे. गुरुपोर्णिमा म्हणजे व्यास ऋषी यांनी गणपती ला एकादमात महाभारत सांगितले व गणपती ने एकादमात सर्व महाभारत लिहून काढले.हे तर महत्वाचे आहेच.

पण गुरु म्हणजे शिक्षक व विद्दार्थी जेंव्हा गुरु चा अभ्यास ध्यानात लक्षात ठेवुन आपण काय शिकलो काय विद्दा शिकलो याचं स्मरण ध्यानन लक्षात ठेवण गुरुंना नमस्कार करुन मान देण वंदन करण हे गुरु पोर्णिमा चं महत्व आहे. तसेच ५ सप्टेंबर पण शिक्षक दिन मानतात.

५ सप्टेंबर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ह्यांचा वाढदिवस असतो.

शिक्षकदिन मानतात.व शिक्षक यांना त्यादिवसात पुरस्कार पण देतात.

DSCF1736

सौरव गांगुली

माजी क्रिकेट कॅप्टन सौरव गांगुली याचा आज वाढदिवस आहे. त्याचा जन्म ८ जुलै १९७२ ला झाला. तो कोलकाता (कलकत्ता) वेस्ट बंगाल या शहराचा आहे. त्याला बंगाल टायगर म्हणून ओळखतात. त्याला महाराजा म्हणूनही ओळखतात.

त्याचा करिअर रेकॉर्ड असे आहे.

          Matches    Runs    Bat Avg 100s 50s

ODI 311 11363 41.02 22 72
Test 113 7212 42.17 16 35
IPL 44 1081 28.44 7

 

DSCF1756  DSCF1822

DSCF1825

%d bloggers like this: