आपले स्वागत आहे!

Archive for ऑगस्ट 26, 2011

‘तुळसीची आरती’


‘तुळसीची आरती’
जयदेवी जयदेवी जय तुळसीमाते |
दर्शनानें तुझ्या मन:शांती होते ||धृ ||
प्रात:काळी उठूनी ललना पूजा करीती |
पाणी घालूनी चरणी मस्तक ठेविती |
हळदी कुंकू लावूनी हस्तक जोडीती |
फुलें वाहुनी तुज दीप ओवाळीती ||१||
आरती गाऊनी दुग्ध वाचीती |
चरणी तुझ्या अखंड सौभानैवेद्द अर्पिती |
मनोभावे वंदुनी प्रदक्षिणा घालिती |
नित्यनेमे ‘तुळसी महात्म्य’ ग्य मागती ||२||
विष्णु अन् कृष्ण त्यांची आवडती |
विवाहोत्तर तुझ्या लग्ना आरम्भ होती |
शुभाशुभ कार्याला तुला स्मरिती |
मुक्तासाठी अंती मुखी घालिती ||३||
तुळसी, सुरसा, गौरी तुजला म्हणती |
सुलभा, सरला तुझी नांवे किती ?|
कृष्ण अन् श्र्वेत द्वय भेद हे अस्ति |
पर्ण,बीज,पंचाग ओषाधात घेती ||४||
कटूतीक्तोष्ण गुण तुज अंगी असती |
सेवनाने तुझा कफवात जाती |
मुत्ररक्त रोग दूर ते पळती |
श्र्वास -कास, शूल तुला घाबरीती ||५||
वास्ताव्यानें तुझा कृमी नष्ट होती |
रोगनाशास्तव कुष्ठी तुज भक्षिती |
‘तुळसीमाळा’ घालूनी गळा जप जपिती |
आयुर्वेदात तुझे महत्व हे किती ? ||६||
———————-O ———————————–
सौ मेधा देशपांडे .
——————
१६.९.९१

प्राची भगिनी मंडळ च्या काव्य गायनातील प्रथम पारितोषिक मिळाले आहे.
माझी तुळसी ची आरती आयुर्वेदीक आहे.

DSCF0733

%d bloggers like this: