आपले स्वागत आहे!

Archive for सप्टेंबर, 2011

पडकोट (परकोट)

पडकोट (परकोट) कालीबुजाच्या बाजूस पन्हाळ्याची बाजू कमजोर आहे. याबाजूसच पन्हाळाचा जोड किल्ला, पावनागड आहे. या पावनागडावरुनही सहजासहजी तोफांचा माराही केला जाऊशकत होता. म्हणून पन्हाळगडाची ही बाजू दुहेरी तटबंदी बांधून सुरक्षित केली आहेत. यासच पराकोट किंवा पडकोट म्हणतात.

एक तटबंदी तोफांच्या किंवा सुरुंगामूळे धासळली, तर शत्रूस किल्ल्यात सरळ प्रवेश न देता थोडे अंतर सोडून असनाऱ्या दुसऱ्या भक्कम तटबंदिशी सामना करावा लागत असे. या तटबंदीतून खाली परकोटात जाण्यासाठी दक्षिण दिशेस एक दरवाजा असून त्याच्या कमानीला दोन नागशिल्पे कोरलेली आहेत. त्यामुळे त्या सरावाजास नागफणी दरवाजा असे म्हटले जाते.

असे अनेक दरवाजे या पराकोटात जाण्यासाठी होते.

दिपांगण

दिपांगण

आभाळ पाहून झाल्यावर
काजव्याच्या थेबांएवढं
आठवावं
देव डोळाभर पाहिल्यावर
टांगत्या घंटे एवढंच मन
साठवावं
सांगण्यासारखं ओंजळभर
असलं तरी निनादावं
अंधारण्यापूर्वी
आडवाटा टाळण्यासाठी
दिशापार होताना
उंबऱ्यात चंद्रासारखा दिवा
मनातल्या ओल्या गाभाऱ्यात
पाझरावा

श्रीकांत चिवटे
ह्यांची ही कविता तूळसपाणी पुस्तक मधील आहे.

नवरात्रारंभ, घटस्थापना, महालक्ष्मी यंत्र

स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर दक्षिणायण शरद ऋतु आश्र्विन शुक्लपक्ष बुधवार २८ सप्टेबंर (९) २०११ तारीख ला नवरात्रारंभ, घटस्थापना सुरु होत आहे.

हा उत्सव विजया दशमी दसरा पर्यंत असतो. दसरा गुरुवार आश्र्विन शुक्लपक्ष १० दशमी ६ अक्टोबर पर्यंत आहे.

समई तेल कापसाची वात नऊ दिवस पुरेल अशी करतात व दिवस रात्र नऊ दिवस समई तेल वात ठेवतात.

कुंडी मध्ये धान्य पेरतात नऊ दिवस साबुदाणा भगर रताळी केळी फळ खातात व उपवास करतात.

देवी दर्शन दसरा पर्यंत करतात दसरा ला शमी दसरा ला देतात. असा नवरात्र उत्सव करतात.

मी महालक्ष्मी यंत्र काढलेले आपणास पाहाण्यास नक्कीच आवडेल.

mahalaxmi yantra  DSCF0468 

DSCF0774  DSCF0773DSCF0772  DSCF0771DSCF0770  DSCF0769DSCF0768  DSCF0767 

मी काढलेले महालक्ष्मी यंत्र

तटबंदी कोठार

ॐ 

तटबंदी कोठार : तटबंदी मध्ये साहित्य साठविण्यासाठी किंवा कैदी ठेवण्यासाठी किंवा पहारेकाऱ्याना राहण्यासाठी खोल्या बांधल्या जात असत. अशा पध्दती च्या खोल्या पन्हाळगडाच्या पूर्वे कडे तटबंदीत एक कोठार (खोली) असून ती खोली दारू (युध्दाची) कोठार म्हणून किंवा कैदखाना म्हणून वापरले जात होते.अशाच पध्दती चा खोल्या अंधारबावे कडून दक्षिणे कडे जाणाऱ्या तटबंदीत असून त्यांना आता तालीमखाना म्हणून ओळखले जाते. या खोल्यांचा वापर पहारे क ऱ्यांना राहण्यासाठी किंवा कैदखाना म्हणून केला जात होता.

पुसाटी बुरूज

ॐ 

पुसाटी बुरूज पन्हाळगडाची माची (उपत्यका) ज्या ठिकाणी संपते त्या टोकाला हे एका मागे एक असे दोन बलदंड बुरुज आले आहेत पन्हाळ्याच्या पायथ्याशी सर्वात कमी उंचीचा भाग व अगदी अमोरचा मसाई पठाराचा भाग असल्यामुळे या ठिकाणी टोकाकडील एक बुरुज बांधल्या नंतर मधील भागात खंदक खणून त्याच्यावर दुसरा बुरुज बांधून पाहिला टोकाकडील बुरुज दुसऱ्या बुरुजाच्या आहारी (बुरुजावरील तोफा , बंदुकांच्या माऱ्याच्या टप्प्यात ) आणला आहे. पहिल्या बुरूजा कडून गडाच्या माचीत प्रवेश करण्यासाठी दुसऱ्या बुरूजा च्या शेजारीच दरवाजा तून प्रवेश करावा लागत असे. आज तो दरवाजा संपूर्ण नामशेष झाला आहे. त्याचा पाया तेवढा शिल्लक आहे.या बुरूजा च्या 
जवळ च पन्हाळ गडाच्या दुर्गादेवी चे स्थान आहे. असे एकूण ४८ बुरुज पन्हाळ गडाच्या तटबंदीत आज ही अस्तित्वात आहेत. नृसिंह फणशी महाकाली शिवाबाण मोहरा लक्ष्मण अशी नावे माहिती तील आहेत.

दुतोंडी बुरुज

ॐ 

दुतोंडी बुरुज : पन्हाळा वर जे बुरुज शिल्लक आहेत त्यापैकी एक बुरुज दुतोंडी बुरुज होय या दुतोंडी बुरुज दोन बाजूने चढणे उतरणे यासाठी पायऱ्या आहेत यासाठी ह्या बुरुज ला दुतोंडी बुरुज म्हणतात शेजारीच दौलती नावाचा बुरुज आहे. या बुरूजा बद्दल अशी आख्यायिका आहे .बुरूजाखाली प्रचंड दौलत आहे. असा शिलालेख या बुरुज वर होता.आदिलशाने हा बुरुज पूर्ण खणून काढला त्याला काही ही मिळाले नाही. परत 
आदिलशहा ने हाबुरुज जांभ्या दगडात बांधला .बुरुज वर सलेलेल शिलालेख हा आज विशाळगडाच्या दर्ग्यात गेलेला आहे त्यावर हा ‘बुरुज नुसता दौलती नसून दौलती ची एक खाण आहे.हा बुरुज गडावर असलेला राजदिंडी चा रक्षक आहे दौलती ची राखण करणारा दौलती आहे. असे म्हटले आहे.

पसायदान

पसायदान

आतां विश्र्वात्मकें देवें | येणें वाग्यज्ञे तोषावें |
तोषोनि मज द्दावें पसायदान हें ||१||

जें खळांची व्यंकटी सांडो | तया सत्कर्मी रती वाढों|
भूतां परस्परें पडो | मैत्र जिवांचे ||२||

दुरितांचें तिमिर जावो | विश्र्व स्वधर्मसूर्यें पाहो |
जो जे वांछील तो तें लाहो | प्राणिजात ||३||

वर्षत सकळमंगळीं | ईश्र्वरनिष्ठाची मांदियाळी |
अनवरत भूमंडळीं | भेटतु भूतां ||४||

चलां कल्पतरुंचे आरव | चेतनाचिंतामणीचें गांव |
बोलते जे अर्णव | पियूषाचे ||५||

चंद्रमे जे अलांछन | मार्तंड ते तापहीन |
ते सर्वांही सदा सज्जन | सोयरे होतु ||६||

किंबहुना सर्वासुखीं | पूर्ण होऊनी तिहीं लोकीं |
भजिजो आदिपुरुखीं | अखडिंत ||७||

आणि ग्रंथोपजीविये | विशेषीं लोकीं इये |
दृष्ठा दृष्ठविजयें | होआवें जी ||८||

येथ म्हणे विश्र्वेशरावो | हा होईल दानपसावो |
येणें वरें ज्ञानदेवो | सुखीया झाला ||९||

DSCF1958

व्यंकटेश स्तोत्र

व्यंकटेश स्तोत्र

श्रीचैतन्यकृपा अलोकिक | संतोषोनि वैकुंठनायक |
वर दिधला अलोकिक | जेणे सुख सकळांसी ||१०१||

हा ग्रंथ लिहितां गोविंदा | या वचनी न धरावा भेद
हृदयी वसे परमानंद | अनुभवसिध्द सकळांसी ||१०२||

या ग्रथींचा इतहास | भावे बोलिला विष्णुदास |
आणिक न लागती सायास | पथणमात्रे कार्यसिध्दि ||१०३||

पार्वतीस उपदेशी कैलासनायक | पूर्णानंद प्रेमसुख |
त्याचा पार न जाणती ब्रह्मादिक | मुनी सुरवर विस्मित ||१०४||

प्रत्यक्ष प्रगटेल वनमाळी | त्रैलोक्य भजत त्रिकाळी |
ध्याती योगी आणि चंद्रमौळी | शेशाद्रीपर्वती उभा असे ||१०५||

देवीदास विनवी श्रोतयां चतुरां | प्रार्थनाशतक पठण करा |
जवया मोक्षाचिया मंदिरा | कांही न लागती सायास ||१०६||

एकाग्रचित्ते एकांती | अनुष्ठान कीजे मध्यराती |
बैसोनियां स्वस्थाचित्ती | प्रत्यक्ष मूर्ति प्रगटेल ||१०७||

तेथे देहभावासी नुरे ठाव | अवघा चतुर्भुज देव |
त्याचे चरणी थेवोनि भाव वरप्रसाद मागावा ||१०८||

इति श्रीदेवीदासविरचितं श्री व्यंकटेशस्तोत्रं संपूर्णम् ||

||श्रीव्यंकटेशार्पणमस्तु||

श्री व्यंकटेश स्तोत्र

श्री व्यंकटेश स्तोत्र

ग्रंथी धरोनी विश्र्वास | पठण करील रात्रंदिवस |
त्यालागी मी जगदीश | क्षण एक न विसंबे ||९१||

इच्छा धरुनि करील पठण | त्याचे सांगतो मी प्रमाण |
सर्व कामनेसी साधन | पठण एक मंडळ ||९२||

पुत्रार्थीयाने तीन मास | धनार्थीयाने एकविस दिवस |
कन्यार्थीयाने षण्मास | ग्रंथ आदरे वाचावा ||९३||

क्षय अपस्मार कुष्ठादि रोग | इत्यादि साधने प्रयोग |
त्यासी एक मंडळ संग | पठणेंकरुनि कार्यसिध्दी ||९४||

हे वाक्य माझे नेमस्त | ऐसे बोलिला श्रीभगवंत |
साच न मानी जयाचे चित्त | त्यासी अध:पात सत्य होय ||९५||

विश्र्वास धरील ग्रंथपथणी | त्यासी कृपा करील चक्रपाणी|
वर दिधला कृपा करुनी अनुभवे कळो येईल ||९६||

गजेंद्राचिया आकांतासी | कैसा पावला ह्रषीकेशी |
प्रल्हादाचिया भावार्थासी | स्तंभांतूनी प्रगटला ||९७||

व्रजासाठी गोविंदा | गोवर्धन परमानंदा |
उचलोनियां स्वानंदकंदा | सुखी केले तये वेळी ||९८||

वत्साचेपरी भक्तांसी | मोहे पान्हावे धेनु जैसी |
मातेच्या स्नेहतुलनेसी | त्याचपरी घडलेसे ||९९||

ऐसा तूं माझा दातार | भक्तासी घालिसी कृपेची पांखर |
हा तयाचा निर्धार | अनाथनाथ नाम तूझे ||१००||

श्री व्यंकटेश स्तोत्र

श्री व्यंकटेश स्तोत्र

मजलागी देई ऐसा वर | जेणे घडेल परोपकार |
हेचि मागणे साचार | वारंवार प्रार्थीतसे ||८१||

हा ग्रंथ जो पठण करी | त्यासी दु:ख नसावे संसारी |
पठणमात्रे चराचरी | विजयी करी जगाते ||८२||

लग्नार्थियाचे व्हावे लग्न | धनार्थियासी व्हावे धन |
पुत्रार्थीयाचे मनोरथ पूर्ण | पुत्र देऊनि करावे ||८३||

पुत्र विजयी आणि पंडित | शतायुषी भाग्यवंत |
पितृसेवेसी अत्यंत रत | जयाचें चित्त सर्वकाळ ||८४||

उदार आणि सर्वज्ञ | पुत्र देई भक्तालागून |
व्याधीष्ठाची पीडा हरण | तत्काळ कीजे गोविंदा ||८५||

क्षय अपस्मार कुष्ठादि रोग | ग्रंथपठणे सरावा भोग |
योगाभ्यासियासी योग | पठणमात्रे साधावा ||८६||

दरिद्री व्हावा भाग्यवंत | शत्रुचा व्हावा नि:पात |
सभा व्हावी वश समस्त | ग्रंथ पठणेकरुनियां ||८७||

विद्दार्थीयासी विद्दा व्हावी | युध्दी शस्त्रे न लागावी |
पठणे जगांत कीर्ती व्हावी | साधु साधु म्हणोनियां ||८८||

अंती व्हावे मोक्षसाधन | ऐसे प्रार्थनेसी दीजे मन |
एवढे मागतो वरदान | कृपानिधे गोविंदा ||८९||

प्रसन्न झाला व्यंकटरमण | देविदासासी दिधले वरदान |
ग्रंथाक्षरी माझे वचन | यथार्थ जाण निश्र्चयेंसी ||९०||

श्री व्यंकटेश स्तोत्र

श्री व्यंकटेश स्तोत्र

आतां करु तुझी पूजा | जगज्जिवना अधोक्षजा |
आर्ष भावार्थ हा माझा | तुज अर्पण केला असे ||७१||

करुनी पंचामृतस्नान | शुध्दोदक वरीघालून |
तुज करु मंगलस्नान | पुरुषसूक्तेकरुनयां ||७२||

वस्त्रे आणि यज्ञोपवीत | तुजलागी करू प्रीत्यर्थ |
गंधाक्षता पुष्पे बहुत | तुजलागी समर्पुं ||७३||

घूप दीप नैवेद्द | फल तांबूल दक्षिणा शुध्द |
वस्त्रे भूषणे गोमेद | पद्मरागादिकरुनि ||७४||

भक्तवत्सला गोविंदा | ही पूजा अंगीकारावी परमानंदा |
नमस्कारुनि पादारविंदा | मग प्रदक्षिणा आरंभिली ||७५||

ऐसा षोडशोपचारे भगवंत | यथाविधि पुजिला हृदयांत |
मग प्रार्थना आरंभीली बहुत | वरप्रसाद मागावया ||७६||

जयजयाजी श्रुतिशास्त्रआगमा | जयजयाजी गुणातीत परब्रह्मा |
जयजयाजी हृदयवासिया रामा | जगदुध्दारा जगद्गुरो ||७७||

जयजयाजी पंकजाक्षा | जयजयाजी कमळाधिशा |
जयजयाजी पूर्णपरेशा | अव्यक्तव्यक्ता सुखमूर्ते ||७८||

जयजयाजी भक्तरक्षका | जयजयाजी वैकुंठनायका |
जयजयाजी जगत्पालका | भक्तांसी सखा तूं एक ||७९||

जयजयाजी निरंजना | जयजयाजी परात्परगहना |
जयजयाजी शून्यतीत निर्गुणा | परिसावी विज्ञापना एक माझी ||८०||

श्री व्यंकटेश स्तोत्र

श्री व्यंकटेश स्तोत्र

उभय बाहुदंड सरळ | नखे चंद्रापरिस तेजाळ |
शोभती दोन्ही कारकमळ | रातोत्पलाचियेपरी ||६१||

मनागटी विराजती कंकणे | बाहुवटी बाहुभूषणे |
कंठी लेइली आभरणे | सूर्यकिरणे उगवली ||६२||

कंठावरुते मुखकमळ | हनुवटी अत्यंत सुनीळ|
मुखचंद्रमा अति निर्मळ | भक्तस्नेहाळ गोविंदा ||६३||

दोन्ही अधरांमाजी दंतपंक्ती | जिव्हा जैसी लावण्यज्योती |
अधरामृतप्रात्पीची गती | ते सुख जाणे लक्ष्मी ||६४||

सरळ सुंदर नासिक | जेथे पावनासी झाले सुख |
गंडस्थळींचे तेज अधिक | लखलखीत दोन्ही भागी ||६५||

त्रिभुवनींचे तेज एकवटले | बरवेपण शिगेसी आले |
दोन्ही पातायांनी धरिले | तेच नेत्र श्रीहरीचे ||६६||

व्यंकटा बृकुटिया सुनीळा | कर्णव्दयाची अभिनव लीळा|
कुंडलांच्या फांकती कळा | तो सुखसोहळा अलोकिक ||६७||

भाळ विशाळ सुरेख | वरती शोभे कस्तुरीटिळक |
केश कुरळ अलोकिक | मस्तकावरी शोभती ||६८||>

मस्तकी मुकुट आणि किरीटी | सभोंवती झिळमिळ्याची दाटी |
त्यावरी मयुरपिच्छाची वेटी | ऐसा जगजेठी देखिला ||६९||

ऐसा तूं देवाधिदेवा | गुणातीत वासुदेव |
माझिया भक्तीस्तव | सगुणरुप झालासी ||७०||

श्री व्यंकटेश स्तोत्र

श्री व्यंकटेश स्तोत्र

शेषशयना सार्वभौमा | वैकुंठवासिया निरुपमा |
भक्तकैवारिया गुनाधामा | पाव आम्हां ये समयी ||५१||

ऐसी प्रार्थना करुनी देवीदास | अंतरी आठवीला श्रीव्यंकटेश |
स्मरतां ह्रदयी प्रगटला ईश | त्या सुखासी पार नाही ||५२||

ह्रदयीं आविर्भवली मूर्ती | त्या स्वरूपाची अलोलिक स्थिती |
आपले आपण श्रीपती | वाचेहाती बोलवीतसे ||५३||

तें स्वरूप अत्यंत सुंदर | श्रोती श्रवण कीजे सादर |
सांवळी तनु सुकुमार | कुंकुमाकार पादपद्मे ||५४||

सुरेख सरळ अंगोळीका | नखे जैसी चंद्ररेखा|
घोटीव सुनीळ अपूर्व देखा | इंद्रनी ळा चियेपरी ||५५||

चरणी वाळे घागरिया | वांकी वरत्या गुजरिया |
सरळ सुंदर पोटरिया | कर्दळीस्तंभाचिया ||५६||/p>

गुडघे मांडीया जानुस्थळ | कटीतटी किंकिणी विशाळ |
खालते विश्र्वउत्पत्तीस्थळ | वरी झळाळे सोनसळा ||५७||

कटीवरते नाभिस्थान | जेथोनी ब्रह्मा झाला उत्पन्न |
उदरी त्रिवळी शोभे गहन | त्रैलोक्य संपूर्ण जयामाजी ||५८||

वक्षस्थळी शोभे पदक | पोहोनी चंद्रमा अधोमुख |
वैजयंती करी लखलख | वोद्दुल्लतेचीयेपरी ||५९||

हृदयी श्रीवात्सलांच्छन | भूषण मिरवी श्रीभगवान
तयावरुते कंठस्थान | जयासी मुनिजन अवलोकिती ||६०||

श्री व्यंकटेश स्तोत्र


श्री व्यंकटेश स्तोत्र

तूं अनंत तुझी अनंत नामे | तयामाजी अति सुगमे |
तीं मी अल्पमती सप्रेमे | स्मरूनी प्रार्थना करीतसे ||४१||

श्रीव्यंकटेशा वासुदेवा | प्रद्दुम्ना अनंता केशवा |
संकर्षणा श्रीधरा माधवा | नारायणा आदिमूर्ती ||४२||

पद्मनाभा दामोदरा | प्रकाशगहना परात्परा |
आदि अनादि विश्र्वंभरा | जगदूध्दारा जगदीशा ||४३||

कृष्णा विष्णो हृषीकेशा | अनिरुध्दा पुरुषोत्तमा परेशा |
नृसिंह वामन भार्गवेशा | बौध्द कलंकी निजमूर्ती ||४४||

अनाथरक्षका आदिपुरुषा | पूर्णब्रह्म सनातन निर्दोषा |
सकळमंगळ मंगळाधिशा | सज्जनजिवना सुखमूर्ती ||४५||

गुणातीता गुणज्ञा | निजबोधरुपा निमग्ना |
शुध्द सात्विका सुज्ञा | गुणप्राज्ञा परमेश्र्वारा ||४६||

श्रीनिधी श्रीवत्सलांछनधरा | भयकृद्रयनाशना गिरिधरा |
दुष्टदैत्यसंहारकरा | वीरा सुखकरा तूं एक ||४७||

निखिल निरंजन निर्विकारा | विवेकखाणीवैरागरा |
मधुमरदैत्यसंहारकरा | असुर मर्दना उग्रमूर्ती ||४८||

शंखचक्र गदाधरा | गरुडवाहना भक्तप्रियकरा |
गोपीमनरंजना सुखकरा | अखंडीत स्वाभावे ||४९||

नानानाटकसूत्रधारिया | जगद्व्यापका जगद्वर्या |
कृपासमुद्रा करुणालया | मुनिजनध्येया मुळमूर्ती ||५०||

श्री व्यंकटेश स्तोत्र

श्री व्यंकटेश स्तोत्र

अठरा भार वनस्पतींची लेखणी | समुद्र भरला मषीकरूनी |
माझे अवगुण लिहितां धरणी | तरी लिहिले न जाती ||३१||

ऐसा पतित मी खरा | परी तूं पतितपावन शार्ड्ग.धरा |
तुवां अंगीकार केलिया गदाधरा | कोण दोषगुण गणील ||३२ ||

नीच रतली रायासी | तिसी कोण म्हणेल दासी |
लोह लागतां परिसासी | पूर्वस्तिती मग कैंची ||३३||

गांवींचे होते लेंडं वोहळ | गंगेसी मिळतां गंगाजळ |
कागविष्ठेचे झाले पिंपळ | तयांसी निद्दं कोण म्हणे ||३४||

तैसा कुजाति मी अमंगळ परी तुझा म्हणवितो केवळ |
कन्या देऊनियां कुळ | मग काय विचारावे ||३५||

जाणत असतां अपराधी नर | तरी कां केला अंगीकार |
अंगिकारावरी अव्हेर | असर्थें केला न पाहिजे ||३६||

धांव पाव रे गोविंदा | हाती घेवोनियां गदा |
करी माझ्या कर्माचा चेंदा | अच्चिदानंदा श्रीहरी ||३७||

तुझी नामाची अपरिमितं शक्ती | तेथे माझी पापे किती |
कृपाळुवा लक्ष्मीपती | बारावे चित्ती वाचारी ||३८||

तुझे नाम पतितपावन | तुझे नाम कालीमदहन |
तुझ्र नाम भावातारण | संकटनाशन नाम तुझे ||३९||

आतां प्रार्थना ऐके कमळापती | तुझे नामी राहो माझी मती|
हेंची मागतो पुढत -पुढती | परंज्योती व्यंकटेशा ||४०||

श्री व्यंकटेश स्तोत्र

मायेची करुनी द्रौपदी सती | अन्ने पुरविली मध्यराती |
ऋषीश्र्वरांच्या बैसल्या पंक्ती | तृप्त केल्या क्षणमात्रे ||२१||

अन्नासाठी दाही दिशा | आम्हां फिरविसी जगदीशा |
कृपाळुवा परमपुरुषा | करुणा कैसी तुज न ये ||२२||

अंगिकारिया शिरोमणि |तुज प्रार्थितो मधुर वचनी |
अंगिकार केलिया झणी | मज हातींचे न सोडावे ||२३||

समुद्रे अंगीकारीला वडवानळ | तेणे अंतरी होतसे विव्हळ |
ऐसे असोनि सर्वकाळ | अंतरी साठविला तयाने ||२४||

कूर्मे पृथ्वीचा घेतला भार | तेणे सोडिला नाही बडिवार|
एवढा ब्रह्मांडगोळ थोर | त्याचा अंगिकार पैं केला ||२५||

शंकरे धरिले हाळाहळा | तेणे निळवर्ण झाला गळा |
परी त्यागिले नाही गोपाळा | भक्तवत्सला गोविंदा ||२६||

माझ्या अपराधांच्या परी | वर्णिता शिणली वैखरी |
दुष्ट पतित दुराचारी | अधामाहूनी अधम ||२७||

विषयासक्त मंदमती आळशी | कृपण कुव्यसनी मलिन मानसी |
सदा सार्वकाळ सज्जनांसी | द्रोह करी सर्वदा ||२८||

वचनोक्ती नाही मधुर | अ त्यंत जनांसी निष्ठुर |
सकळ पामरांमाजी पामर | व्यर्थ बडिवार जगी वाजे ||२९||

काम क्रोध मद मत्सर |हे शरीर त्यांचे बिढार |
कामकल्पनेसी थार | दृढ येथे केला असे ||३०||

श्री व्यंकटेश स्तोत्र

श्री व्यंकटेश स्तोत्र

जननीपरी त्वां पाळिले | पतयापरी त्वां सांभाळीले |
सकळ संकटांपासूनि रक्षिले |पूर्ण दिधले प्रेमसुख ||७||

हे अलोलिक जरी मानावे | तरी जग हे शृजिले आघवे |
जनक जननिपण स्वभावे | सःअज्स आले अम्गासि ||८||

दिनानाथा प्रेमासाठी | भातक रक्षिले संकटी |
प्रेम दिधले अपूर्व गोष्ठी | भजनासाठी भत्कांच्या ||९||

आता परिसावी विज्ञापना | कृपाळूवा लक्ष्मीरमणा |
मज घालोनी गर्भाधाना | अलोलिक रचना दाखविली ||१०||

तुज न जाणता झालो कष्ठी आता दृढ तुझे पायी घापली मिठी
कृपाळूवा जगजेठी | अपराध पोटी घाली माझे ||११||

माझिया अपराधांच्या राशी |भेदोनी गेल्या गगनासी |
दयावंत हृषीकेशी | आपुल्या ब्रिदासी सत्य करी ||१२||

पुत्राचे सहस्त्र अपराध | माता काय मानी तयाचा खेद |
तेवी तू कृपाळू गोविंद | मायबाप मजलागी ||१३||

उडादांमाजी काळे गोरे | काय निवडावे निवडणारे |
कुचलिया वृक्षाची फळे | मधुर कोठोनी असतील ||१४||

अराटीलागी मृदुता | कोठोनी असेल कृपावंता |
पाषाणासी गुल्मलता | कैशियापारी फुटतील ||१५||

आपाद मस्तकावरी अन्यायी | परी तुझे पदरी पडलो पाही |
आतां रक्षण नाना उपायी | करणे तुज उचित ||१६||

समर्थाचिये घरीचे श्र्वान | त्यासी सर्वही देती मान |
तैसा तुझा म्हणवितो दीन | हा अपमान कवणाचा ||१७||

लक्ष्मी तुझे पायांतळी | आम्ही भिक्षेसी घालोनी झोळी |
येणे तुझी ब्रीदावळी | कैसी राहील गोविंदा ||१८||

कुबेर तुझा भांडारी | आम्हां फिरविसी दारोदारी |
यांत पुरुषार्थ मुरारी | काय तुजला पैं आला ||१९||

द्रौपदीसी वस्त्रे अनंता | देत होतासी भाग्यवंता |
आम्हांलागी कृपणता | कोठोनी आणिली गोविंदा ||२०||

सौ. वीणा सहस्त्रबुध्दे

सौ. वीणा सहस्त्रबुध्दे: सौ. वीणा सहस्त्रबुध्दे यांचा जन्म १४ सप्टेबंर १९४७८ रोजी कानपूर येथे झाला. संस्कृत मध्ये एम.ए. व संगीत प्रवीण आहेत. कुमार गंधर्वाचा त्यांचा गायकीवर प्रभाव आहे. लोकरंजनार्थ गायन आणि संगीत अध्यापन यासाठी व्यतीत करणाऱ्या आहेत. एस.एन.डी.टी. पुणे येथे संगीत विभाग प्रमुखपदी आहेत. चित्रकला याची त्यांना आवड आहे.पुण्याचा सवाई गंधर्व पुण्यतिथी महोत्सवात आपल्या स्वरांनी त्या रसिक श्रोत्यांना आनंद देतात.

veena sahasrabuddhe  DSCF1512

श्री व्यंकटेश स्तोत्र

श्री व्यंकटेश स्तोत्र
श्रीगणेशाय नम: || श्रीव्यंकटेशाय नम: ||

ॐ नमो जी हेरंबा | सकळादी तु प्रारंभा |
आठवुनी तुझी स्वरुपशोभा | वंदन भावे करीतसे ||१||

नमन माझे हंसवाहिनी | वाग्वरदे विलासिनी|
ग्रंथ वदावया निरुपणी | भावार्थखाणी जयामाजी ||२||

नमन माझे गुरुवर्या | प्रकाशरूपा तूं स्वामिया |
स्फुर्ती द्दावी ग्रंथ वदावया | जेणे श्रोतयां शुख वाटे ||३||

नमन माझे संत सज्जनां |आणि योगियां मुनिजनां |
सकळ श्रोतयां साधिजनां | नमन माझे शाष्टांगी ||४||

ग्रंथ ऐका प्रार्थनाशतक | महादोषांसी दाहक |
तोषुनियां वैकुंठनायक | मनोरथ पूर्ण करील ||५||

जयजयाजी व्यंकटरमणा | दयासगरा परिपूर्णा |
परंज्योति प्रकाशगहना |करितो प्रार्थना श्रवण कीजे ||६||

कलाकौशल्य

मी केलेले कलाकौशल्य जपून ठेवलं आहे एकत्र पाहण्यास चांगलं वाटेल ‏!

DSCF0670  DSCF0980

DSCF0669  DSCF1942

DSCF1950  DSCF0401

DSCF0601  DSCF0367

DSCF1876  DSCF0347  मी केलेले विणकाम

DSCF0649

पानावर कात्रीने कापलेली चित्रं

विडाच पान वडा च पान व कोणताही झाडाच पान ह्यावर मी गंध यांनी पान रंगविली आहेत. सरस्वती श्रीयंत्र वडाच्या पारंब्या स्वस्तीक अशी मी पान रंगवली आहेत.
आता वडाचा पानावर मी कात्रीने कापून पानाचं चित्र तयार केले केलं आहे. पानावर रांगोळी पण कापून रांगोळी तयार करता येते. पान मोठे घेऊन आंबाच्या पानावर झाड मानसं अशी चित्र काढता येतात. त्याला सराव व्हावयाला हवा.

मी दाखविण्या करता पानावर रेषा व गोल फुल दाखविण्या प्रयंत्न केला आहे. तसा कात्रीने कापलेला पाना वर रांगोळी सारखं पाहण्यास नक्कीच आवडेल सर्वांना !

DSCF1943  DSCF1944  DSCF1945

वडाची पानं

DSCF1942  DSCF1950

DSCF1946  DSCF1947  DSCF1948

पिंपळाची पानं

गुणकारी आवळा

गुणकारी आवळा: पित्त झाल्यास आवळा खातात. स्मरणशक्ती आणि बुध्दी वाढविण्यासाठी आवळा खातात.
दृष्टी सुधारण्या साठी आवळा खातात.कांती सतेज बनण्यासाठी आवळा खातात केसांना पण आवळा याचे तेल लावतात.
आवळा अन्यात्रासाला पण उपयोग होतो.
बाजारात आवळा व आवळा ची पूड आवळा चे तेल मिळते. आवळा च्या रसात जिरे व खडी साखर घालून सकाळ – संध्याकाळ दोन वेळा घ्यावा. एक एक चमचा. सर्व उपचारावर उपयोग होतो.

Phyllanthus Emblica L Aml Indian Gooseberry Kemloko  amla

Phyllanthus Emblica

ब्लॉग पोस्ट २८१

ब्लॉग पोस्ट: १० सप्टेबंर २०११ तारीख ला माझा ब्लॉग पोस्ट २८१ वा ब्लॉग  होत आहे.

त्या बध्दल मला खुप लिखाण केल्याचे व वाचन पण एवढे झाले या बध्दल मला खूप
समाधान व छान वाटत आहे. आपण सर्वांनी वाचन करून प्रतिक्रिया व भेटी दिल्या त्या
बध्दल सर्वांना धन्यवाद ! धंयवाद !

DSCF1351  DSCF0657

ब्लॉग आकडे: 14,996 भेटी

ऋतु

     ऋतु प्रमाणे जसे जसं पान फुल असतात तसेच स्वंयपाक खाण्याचे पदार्थ पण ऋतु प्रमाणे असतात. पावासाळा मध्ये उपवास करतात साबुदाणा राजगीरा शेंगदाने भगर रताळ लाल भोपळा असे पदार्थ साबुदाणा खिचडी साबुदाणा वडे बटाटा दाण्याचा कुटं घालून भिजविलेला असतो. त्याचे वडे खिचडी करतात. राजगीरा लाह्याचा गुळ तूप घालून लाडू करतात. तसेच राजगीरा लाह्या दुध साखर घालून करतात. लाल भोपाळा ची दाण्याचा कुटं तुपाची जिरे पांदिलोन मीठ वापरतात. हे उपवासाचे पदार्थ करतात. पूरण कनिक ह्यात घालून उकड करतात. तसेच नारळ खोबरं साखर किंवा गुळ घालून सारण करतात व तांदुळ पिठीचे उकड काडून मोदक करतात कणीक याचे पण उकड याचे मोदक करतात. सुकखोबर पिठी साखर सुकामेवा एकत्र करून तळून मोदक करतात. हे पावासाळा ऋतु मध्ये खाण्याचे पदार्थ करतात.

     हिवाळा मध्ये नवीन धान्य आलेले असते दिवाळी त तेलकट तुपकट थंडी मध्ये करतात. रवा डाळीच पीठ तुप साखर पाक किंवा पीठी साखर वापरुन लाडू करतात. शंकर पाळी करंज्या चिरोटे अनारसे असे पदार्थ करतात चकली शेव चिवडा मसाले वापरुन पदार्थ करतात. कडबोळी कडबूळी पण तेलात तळून पदार्थ करतात तीळ डाळ शेंगदाने चिवडा व ईतर पदार्थ मध्ये वापरतात.

     उन्हाळा ऋतु मध्ये वाळवलेले पदार्थ जास्त करतात भाजी कमी मिळते चना डाळ भिजत टाकुन वाटून हिंग तिखटा ची पूड मीठ एकत्र करून उन्हात वाळवतात त्याची सांडगे याची आमटी करतात. पोहे पापड उडीद मुग पापड तळून खातात उडीद वडे चना डाळीचे भजी करतात. गव्हाची कुरडई वाळवून तळतात. कुरडई चा चीक पण खातात.

शेवया याची खीर व चना डाळीचा पुरण पदार्थ तीन ही ऋतु त करतात.

DSCF1940  DSCF1377

गणेश प्रार्थना


गणेश प्रार्थना
मोरया s मोरया s अष्टविनायक मोरया s
मोरया s मोरया s अष्टविनायक मोरया s
दुर्वाकुरच्या मळ्यात झुलला, जास्वंदी पाळणा
पाळण्यात हा छान शोभतो, गौरी पुत्र देखणा
ढोल नि ताशा, झांजा गर्जे, शंखनाद दुमदुमला
मोरगांवाचा मयुरेश्वर हा, छन छन नाचतं आला
थेऊरस्थानी, श्री चिंतामणी , आनदांने हसला
सिध्दटेकचा सिध्दिवनायक, भक्तासंगे रामला
स्वरुपसुंदर, महागणपती, रांजणगावी डोले
ओझरातला श्रीविघ्नेश्वर, पाहुनी नयन निमाले
लेण्याद्रीचा गिरिजात्मजही भूरळ घालतो मना
वरविनायक, महडगावचा, पावतसे भक्तांना
बल्लाळेश्वर, पालिग्रामी, उपवनी झोके घेई
चहुंबाजूनी, भावभक्तीचा, दरवळ तरळत येई
अष्टविनायक, दैवत अमुचे, भावे ओवाळूया
नैवेद्दाचे मोदक अर्पून, गणेशास वंदूया

– अरुण तावडे कांदिवली

महाराष्ट टाइम्स संवाद रविवार ४. ९. २०११ तारीख ला पेपर मध्ये हे लिखाण आले आहे.

DSCF1934

तराजू

तराजू: पेपरवाले पेपर पेपर असे हाका मारत रस्त्यान जातात .आम्ही नेहमी दारावर वर्तमान पत्राची रध्दी देत असतो. पेपर वाले पोत्यातून तराजू चे २ पारड दांडा वजनं काढतात .दांड्याला २ पारड लावतात .एका पारड्यात वजन ठेवतात दुसऱ्या पारड्यात आमची वर्तमान पत्राची रध्दी ठेवतात .परत वजनं करून झाल्यावर आमच्या वजन केलेले वर्तमान पत्र रध्दी व आमचे दुसरे वर्तमान पत्र रध्दी दुसऱ्या पारड्यात ठेवतात दोन्ही पारडे सारखे करतात परत दोन्ही रध्दी एकत्र करून परत नवीन वर्तमानपत्र दुसऱ्या पारड्यात ठेवतात अशी सर्व पेपर वर्तमान पत्र रध्दी एकत्र करतात. २० /२५ रुपये ते आम्हाला देतात.

जाताना कसं चालल्य हातान चं विचार पूस करतात .व पेपर वाले परत रस्त्यान पेपर म्हणत जातात.

Balance  DSCF1618

कार्ल नेगली

कार्ल नेगली : वनस्पती शास्त्रातील संशोधन कार्ल नेगली यांचा जन्म २८ मार्च १८१७ साली घाला. तत्वज्ञान विषयाची आवड होती. निसर्ग तत्वज्ञान याचा अभ्यास करतांना नेगली यांनी वनस्पती शास्त्र याची आवड निर्माण झाली. झुरीख विद्दापीठ येथे पदवी प्रदान केली. एकपेशीय शेवालांचे विविध प्रकार आणि गुणधर्म यावर विश्लेषण केले. तसेच वनस्पती ची वाढ कशी होते याविषयावर सखोल अभ्यास केला. पेशी आणि पेशी सिध्दांत नुकताच रुजला होता. पेशी च्या सूक्ष्म दर्शी अभ्यासाला सुरुवात झाली होती. नेगले यांनी पेशीचे विभाजन त्यांचा केंद्रासहित होते. पेशी विभाजन क्रिया अचुक पणे करण्यात येईल. इतकेच नाही तर केंद्रकात आणखी एक घटक ही असतो .असेही निरीक्षण केले.
घटक म्हणजे च रंगसुत्रे हे सिध्द केले झाले. वनस्पती शास्त्रा त नेगले नेगली यांनी मोलाचे संशोधन केले.

Carl_Wilhelm_von_Naegeli  DSCF1901

झाडांची पाने

जसं जसे दुर्वा ला महत्व आहे तसेच फुलांचा पानांना व ईतर पान यांना महत्व आहे. जेष्ठ महिना मध्ये वडा च पान वापरतात. आषाढ महिना मध्ये हरतालिका, मंगळागौर ह्या वेळी पण जाई जुई चमेली जास्वंदी चाफा याची पान देवाला व घरात पूजेला श्रावण व भाद्रपद महिना वापरतात. तसेच आश्र्विन महिना मध्ये शमी च पान दसरा ला वापरतात. मार्गशीर्ष पिंपळ याच पान वापरतात. व चैत्र महिना मध्ये अंबा याची पान आंबा. माघ महिना मध्ये बेल याच पान वापरतात. तुळस तुळस आषाढ महिना मध्ये वापरतात तसेच श्रावण महिना मध्ये पण तुळस वापरतात. जेष्ठ महिना मध्ये वडा च पान वापरतात. पौंष महिना मध्ये आंबा याची पान वापरतात. फाल्गुन महिना मध्ये एरंडा च पान वापरतात. चैत्र महिनात कडूलिंब च पान वापरतात. विड्याची केळीची पाने मेंदीची पाने हि सर्व पाने १२ बारा महिने वापरतात.

अशी सर्व महिना मध्ये निसर्गा च्या सानिध्यात मनुष्य वावरत राहतो. ही सर्व माहिती मी लिहिली आहे.

DSCF1933  DSCF1938

DSCF1924  DSCF1925

DSCF1934

श्री जेष्ठा, कनिष्ठा महालक्ष्मी आरती

श्री जेष्ठा, कनिष्ठा महालक्ष्मी आरती
जय देवी हरतालिके | सखी पार्वती अंबिके ||
आरती ओवाळीते | ज्ञानदिककळीके ||धृ o ||
हरअर्घांगीं वससी | जाशी यज्ञा माहेराशी ||
तेथें अपमान पावसी | यज्ञ कुंडी गुप्त हौसी || जय O ||१||
रिघसी हिमाद्रीच्या पोटीं | कन्या हौसी तुं गोमटी | उग्र तपश्र्चर्या मोठी |
आचरसी उठाउठी ||जय O ||२||
तापपंचाग्री साघनें | घुमृपाने अघोवदने ||
केलीं बहु उपोषणें | शंभु ब्रताराकारणें ||जय O ||३||
लीला दाखाविसी द्दष्टी | हें व्रत करिसी लोकासाठिं ||
पुन्हां वरिसी घुर्जटी | मजा रक्षावें संकटीं ||जय O ||४||
काय वर्णुं तव गुण | अल्पमती नारायण | मातें दाखवी चरण चुकवावें जन्ममरण ||जय देवी O ||५||

– सौ. मेधा देशपांडे.

दुर्वांचे उपयोग

दुर्वांचे उपयोग : गणपतीला दुर्वा आवडतात. दर मंगळवार व चतुर्थी व गणेशउत्सवात गणपती ला दुर्वा वाहतात. दुर्वा ही विशिष्ट जातीची हरळी च आहे. गडद काळपट हिरवा रंग यांचे प्रत्येक पात्याला तीन फाटे असलेली हरळी म्हणजे दुर्वा. ३ / ५ / ७ असलेली हरळी दुर्वा एकत्र करुन २१ दुर्वा ची जुडी वाहण्याची प्रथा आहे. तसेच २१ / २१ /२१ दुर्वा व ५१ दुर्वा जुडी १०८ जुडा चां हार करुन गणपती ला वाहतात. दुर्वा चे उपयोग उपचार म्हणुन करतात. दुर्वा चा रस थंड प्रकृती चा असतो. उष्णतेचा विकार हया वर उपयोग करतात.
मधुमेह ह्यांना अर्धा तास हिरवळी वर चालण्यास सांगतात. अर्ध शिशी साठी नाकात दुर्वा चा रस घालतात.
बुध्दीमत्ता यावर सकारात्मक परिणाम दुर्वा चा रसाचा उपयोग होतो.

ही सर्व माहिती पुढारी बुधवार ३१ .८ ऑगस्ट .२०११ मध्ये आली आहे.
हल्ली सार्वजण सल्लानुसार पथ्य करतात.

aca1f8502b4e

ऋषीपंचमी

  ॐ

स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर दक्षिणायन वर्षा ऋतु शुक्रवार स्वाती नक्षत्र तुला रास ऋषीपंचमी , जैन संवत्सरी आहे.तसेच २ सप्टेंबर २०११ तारीख ला ऋषीपंचमी आहे. त्यादिवशी सवाष्णी स्वत: कष्टांच खातात . बैल यांनी नांगरेल धान्य खात नाहीत. तो दिवस इतर धान्य व भाज्या मिळतात ते धान्य व भाज्या खातात. अभिमान स्वत : कष्टाचा जरूर असावा. पण मानी नसावा.

ऋषीपंचमी ला तसेच ३ सप्टेंबर ला सौ .आकाश वाहिनी यांचा वाढदिवस आहे. सौ .आकाश वाहिनी यांना माझा नमस्कार व सर्व शुभेच्छा!

DSCF1496  DSCF0483

DSCF1414  DSCF0575

श्रीगणेश चतुर्थी

स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर दक्षिणायन वर्षा ऋतु भाद्रपद शुक्लपक्ष श्रीगणेश चतुर्थी गणेश पूजन ४ गुरुवार आहे.चित्रा नक्षत्र तुला रास चंद्र दर्शन निषेध तसेच १ सप्टेंबर २०११ तारीख ला गणपती सार्वजनिक व घरगुती बसवतात . लोकमान्य टिळक यांनी प्रथा पाडली आहे .१०० वर्ष १२५ वर्ष झाली आहेत प्रथा सुरु झाली आहे.तसेच गौरी पण आणतात. गणपती घरोघरी ५,७,१० दिवस असतात. गौरी ३ दिवस असतात. मातीचे किंवा (PLASTER OF PARIS प्लॅस्टर ऑफ पॅरीस ) चे असतात. लोक एकत्र येण्या करता मत ऐकण्या करता ही प्रथा पाडली आहे. मी आता आमच्या घरातील कांही गणपती ची छायाचीत्र दाखवीत आहे.

DSCF0384  DSCF1235

DSCF1049  DSCF1048

DSCF0920  aca1f8502b4e

DSCF0281  DSCF1838

%d bloggers like this: