आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 8, 2011

सार्थ महालक्ष्मी स्तोत्रम्

सार्थ
|| महालक्ष्मी स्तोत्रम् ||
श्रीगणेशाय नम: |

|| श्रीमहालक्ष्मीस्तोत्रम् ||

किं लक्ष्मी बहुनोक्तेन जल्पितेन पुन: पुन: |
अन्यन्मे शरणं नास्ति सत्यं सत्यं हरिप्रिये ||२३||

एतच्छ्रुत्वा s गस्तिवाक्यं हृष्यमाणा हरिप्रिया |
उवाच मधुरा वाणीं तुष्ठा s हं तव सर्वदा ||२४||

लक्ष्मीरुवाच ||
यत्त्वयोक्तमिदं स्तोत्रं पठिष्यति मानव: |
श्रुणोति च महाभागस्तस्याहं वशवर्तिनी ||२५||

नित्यं पठति यो भक्त्या त्वलाक्ष्मिस्तस्य नश्यति
ऋणं च नश्यते तीव्रं वियोगं नै पश्यति ||२६||

य: पठेतत्प्रातरुत्थाय श्रध्दाभक्तिसमन्वित: |
ग्रहे तस्य सदा स्थास्ये नित्यं श्रिपतिना सह ||२७||

सुखसौभाग्यसंपन्नो मनस्वी बुध्दिमान् भवेत |
पुत्रवान् गुणवान् श्रेष्ठो भोगभोक्ता च मानव: ||२८||

अर्थ – हे लक्ष्मी, फार काय बोलू ? आणि वारंवार तेच ते कितीदा
सांगू ? हे हरिप्रिये, मी अगदी खरे खरे सांगतो की तु झ्याशिवाय
मला दुसरी कडे कुठेही शरण जावयाचे नाही. ||२३||

असे अगस्ती ऋषीं चे बोलणे ऐकून ती हरीचा वल्लभा आनंदित
झाली आणि गोड अशा आवाजाने म्हणा ली की “मी”
नेहमीच तुझ्या वर संतुष्ट आहे. ||२४||

तुझ्याकडून उच्चारले गेलेले हे स्तोत्र जो प्रीतीने म्हणेल, ऐकेल तो महाभाग्यवान होईल (कारण) मी त्याला वश होऊन राहीन.||२५||

जो याचे भक्तिपूर्वक नित्य पठण करील त्याच्या दारिद्र याचा नाश होईल.
तो डोईजड अशा कर्जा पासून मुक्त होईल आणि माझा व त्याचा वियोग होणार नाही ||२६||

जो पहाटे उठून श्रध्दा आणि भक्ती पूर्वक याचे पठण करील त्याच्या घरांत मी श्रीपतीसह सदैव स्थिर राहीन.||२७||

मग तो मनुष्य सुख व सौभाग्य युक्त, मनोबल संपन्न, पुत्र संपन्न, गुणी व श्रेष्ठ होईल
आणि सर्व प्रकारचे भोग भोगील. ||२८||

%d bloggers like this: