आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 9, 2011

सार्थ महालक्ष्मी स्तोत्रम्

सार्थ

|| महालक्ष्मी स्तोत्रम् ||

श्रीगणेशाय नम: |

इदं स्तोत्रं महापुण्यं लक्ष्म्यगस्तिप्रकिर्तितम् |
विष्णुप्रसादजननं चतुर्वर्गफलप्रदम् ||२९||

राजव्दारे जयश्र्चैव शत्रोश्र्चैव पराजय:
भूतप्रेतपिशाचानां व्याघ्राणां न भयं तथा ||३०||

न शस्त्रानलतो यौधाभ्दयं तस्य प्रजायते |
दुर्व्टत्तानां च पापानां बहुहानिकरं परम् ||३१||

मंदुराकरिशालासु गवां गोष्ठे समाहित: |
पठेत्तद्दोषशांत्यर्थं महापातकनाषणम् ||३२||

सर्वसौख्यकरं नृणामायुरारोग्यदं तथा |
अगस्तिमुनिना प्रोक्तं प्रजानां हितकाम्यया ||३३||


अर्थ – हे महापुण्य दायक स्तोत्र लक्ष्मी ने अगस्ती ऋषीं च्या मुखाने प्रगट केले. ते विष्णूची कृपा प्राप्त करून देते आणि चारही प्रकारचे फळे देते.(धर्म,अर्थ काम व मोक्ष देते. ||२९||

राजसभेत जय मिळेल, शत्रूचा पराभव होईल, भूत प्रेत व पिशाचे तसेच वाघापासून भीती
उरणार नाही. ||३०||

शस्त्रापासून, अग्निपासून व युध्दामध्ये त्याला भीती नसेल आणि दुर्जनांच्या दुष्कृत्यांचा समूळ नाश होईल. ||३१||

घोड्यांची पागा, पिलाखाना, गाईंचा गोठा या ठिकाणी एकाग्र चित्ताने, दोषांच्या शांतीसाठी व महापातकांपासून निवृत्ती होण्यासाठी याचे पठण करावे. ||३२||

तसेच हे स्तोस्त्र मानवांना आयुष्य व आरोग्य देणारे आणि सर्व प्रकारे सुखी करणारे आहे. हे लोकांच्या कल्याणाच्या इच्छेने अगस्ती मुनी च्या व्दारे सांगितले गेले. ||३३||

इत्यगस्तिविरचितं श्रीमहालक्ष्मीस्तोत्र संपूर्णम ||

*   *   *

%d bloggers like this: