आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 11, 2011

कोजागिरी पौर्णिमा

स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर दक्षिणायन शरदऋतु आश्र्विन शुक्लपक्ष १५ कोजागिरी पोर्णिमा आहे तसेच आक्टोबर ११ .१० .२०११ तारीख ला कोजागिरी पौर्णिमा आहे.

पाऊस नुकताच थांबलेला असतो आकाश स्वच्छ दिसतं ! आकाशात चंद्र स्वच्छ दिसतो चंद्र खूप दिवसा नंतर पाहिल्या मुळे सर्वजन चंद्राची पूजा करतात.दुध साखर ह्याचा नैवेद्द दाखवितात.दुधात चंद्र पाहुन ते दुध पितात. जागरण करुन उत्सव करतात. पहिला जेष्ठ मुलगा वा मुलगी ह्यांना ओवाळतात.

रात्री लक्ष्मी इंद्र पूजन आग्रयण कुलधर्म नवान्नप्राशन आकाश दीपदान अशी पूजा करतात.

कोल्हापूर येथे महालक्ष्मी देवळात महाप्रसाद आमटी भात ह्याचा प्रसाद देतात. मी खूप वर्षी हा प्रसाद खालल्ला आहे.

चंद्र

मी स्वतः पौर्णिमेच्या चंद्राचा फोटो कॅमेऱ्याने फोटो काढला आहे.

%d bloggers like this: