ॐ
माउंट फ्युजी अभयारण्य : जपान देशातील फ्युजी हाकोन इझु पर्यटकांच सर्वात जास्त वर्दळ असणारं उद्दान आहे.
चेरी,पाईन वृक्षां नीं नटलेला या उद्दानात मृग रानडुक्कर, मेकॉक ,माकड डॉरमाऊस आदी छोटे प्राणी आढळतात .
हे जपान मधील अतिउंच शिखर तसंच ज्वालामुखीच्या उद्रेकानं तयार झालेलं फ्युझी सरोवर, गरम पाण्याचा झरा
आदी वैशीष्ट पूर्ण नटलेलं हे उद्दान टोकियो शहरापासून जवळ आहे.
इगवाझु अभयारण्य : (Iguazu ) – दक्षिण अमेरिकेत अर्जेंटीना येथे हे राष्ट्रीय उद्दान आहे. हे उद्दान प्रसिध्द आहे.
तेथील इगवाझु धबधब्यासाठी समशीतोष्ण कटीबंधात विविध वनस्पती, ब्रागोनिया, ऑर्किड, पाईन अशा बऱ्याच वृक्ष संपत्तीं नं संरुध्द असनाऱ्या या उद्दानात प्युमा, जॅग्वार , ओसेलॉट (Ocelot ) असं वैविध्यपूर्ण प्राणीजीवन पाहण्यास मिळत याच भागात मुंगी खाणारे प्राणीही वास्तव्यास आहेत इग्वाझु बंदरातून या अभयारण्यात जाता येते.

इटोशा अभयारण्य (Etosha ) – नैरुत्य अफ्रिकेतील नामिबिया देशातील हे अभयारण्य अर्धषुष्क वातावरणात काटेरी झुडपं आणि गवताने भरलेलं आहे.
इटोशा या शब्दाचा अर्थ ‘ग्रेट व्हाइट प्लेस’ या अभयारण्यात अंजीर , खजूर ,यांचे वृक्ष
आढळतात. येथील जमीन अनेक प्रकारांच्या खनिजां नी संपन्न आहे.जगातील सर्वात उंच हत्ती या अभयारण्यात पाहावयास मिळतो.
अजस्त्र हत्तीशिवाय तेथे झेब्रा,जिराफ, आर्डवुल्फ ,मुंगुस, अजगर असे अनेक प्राणी आढळतात. नामिबियातील नामुटोनी, ओकाउजो
(Okaukuejo ) व हलाली या तीन ठिकाणांहून या अभयारण्यात प्रवेश मिळतो.
ब्लॉग आवडला? इतरांना सांगा
Like this:
Like Loading...