आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 8, 2011

सांगली चा गणपती

सांगली चा गणपती: हा गणपती पंढरी म्हणून ओळखला जातो.मंदिर १८११ च्या दरम्यान बांधायला सुरुवात झाली .

१८४४ मध्ये मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले.त्या वेळेचे सांगली संस्थानाचे अधिपती थोरले चिंतामनराव अप्पासाहेब

पटवर्धन यांनी मंदिरातील गणपती पंचायतनाची यथाविधी पूजा केल्याचा उल्लेख आहे. श्री गणपति पंचायतनातील

शिव ,सूर्य, चिंतामणेश्वरी, लक्ष्मीनारायण व गणपती अशीपाच मंदिरे येथे आहेत . मध्यवर्ती गणेश मंदिर आहे.श्री गणेशाची

संगमरवरी अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे.मंदिराच्र्या एका बाजूस श्री केंगनश्वरीचे मंदिर आहे. तेथेच संस्थान चा हत्ती उभा असतो.

सांगली संस्थानचे विद्दमान अधिपती विजयसिंहराजे पटवर्धन यांनी गेल्या वर्षभरात गणेश मंदिराच्या व्यवस्थापनाकडे पूर्ण लक्ष दिले आहे.

%d bloggers like this: