आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 21, 2011

पेरणी

पेरणी

ऊन पेरले मी जेव्हा सावलीत आलो

श्वासातील दु:खामधूनी मोकळाच झालो

हर एक घावाला मी दिली फुले दोन

कुणी हसे खुळेपणाला खुळा खुळा झालो

वाट परि मजसि सांगे संगतीत मीच

धरणीच्या हिरव्या रेषा न्याहाळीत गेलो

ऊन जरा वरमून गेले रूप वृक्ष झाले

फळाफुलातूनी तेव्हा गुणगुणून आलो

कसलेही नसणे खोटे नसणे ठेवावे पायी

एक पेर बोटामधूनी लक्ष बहर झालो

श्रीकांत चिवटे

ह्यांची ही कविता ह्यांच पुस्तक तुळसपाणी पुस्तक मधील आहे.

%d bloggers like this: