आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर, 2011

छायाचित्र संग्रह

छायाचित्र संग्रह : छायाचित्र फोटो हे पूर्वा पार पासून जतन जपुन संग्रह करण्याची पध्दत रित आहे. मागील वस्तु मागे आपण कसे वावरत होतो दिसत होतो आपले नातेवाईक कसे दिसतात हे पूर्वीच्या छायाचित्र पाहुन आरे असं मनात येत. त्यांची आलेली आठवण चायाचित्रात पाहुन मन परत पूर्वात मागे जात.

छायाचित्र साठवन व संग्रह करणे फार महत्वाच काम आहे. मग घरगुती व्यक्ती असो निसग्रा चे असो रांगोळी चे असो रांगोळी ने श्र्लोक लिहिलेले असो नुसती रांगोळी रंगीत रांगोळी असो असे छायाचित्र जपून ठेवणे चांगलं वाटत.

पक्षाचे झाडा चे फुला चे हे पण छायाचित्र जपून ठेवण्यास चांगलं वाटत.

पूर्वी काळे छायाचित्र स्टुडीयोत काढून मिळत किंवा फोटो ग्राफर घरी येऊन काढून धुऊन देत असत.

आता घरोघरी क्यामेरा असल्यामुळे छायाचित्र काढले की स्टुडीयोत छायाचित्र धुवून मिळते.

छायाचित्र संग्रह करणे फार महत्वाच काम आहे घरोघरी मोठ्या लोकांचे लहान मुलांचे छायाचित्र असतात.

डोहाळजेवण, संक्रात सण कोणतीही पूजा वाढदिवस लग्न मौंज वास्तू सर्व प्रकारचे छायाचित्र असतात.

हल्ली क्यासेट सीडी असे छायाचित्र पण पाहण्यास मिळतात.परदेश ला आपण गेलो तर तेथील व आपले छायाचित्र संग्रह करता येतो.

घरोघरी छायाचित्र संग्रह असतो.

DSCF1233

आदर

आदर : घर घरात कांही नियम असतात. ते नियम लहान मूला पासून मोठ्या माणसा पर्यंत पाळले जातात. मोठ्या व्यक्ती ला आदराने तुम्हीं (आपण) अशी भाषा वापरून संवाद सुरु करतात. घरात जसे नात असते.

मोठी माणसं बाहेरून किंवा ह्या खोलीतून त्या खोलीत जाताना आदरान बसनं बोलणं असतं. काहीं ठिकाणी आईला पण पाणी ध्या ! घ्या अशी भाषा असते. कांही घरात नंणद च्या मुलांना पण आदरांनी जेवा घ्या काय म्हणताय असे बोलतात. माझ्या मामी मला काय करता कस चाललय असे फोन वर विचारपूस करतात.

मंडईत किंवा ईतर खरेदी करतांना आदराने केवढा ला देता असे विचारले की आदर वाटत असतो दारावरून विक्रेते असतात. त्यांना ओ भाजीवाले पेपरवाले केळीवाले अशी हाकं मारली की आदर वाटत असतो.

ऑफिस मध्ये पण आदराने शिपाई किंवा हाताखाली काम करणारे यांना आदराने असे काम करा सांगावे नियम पाळून आदर ठेवून मान ध्यावा. बोलावे.

परदेशात गेले असल्यास देशाचे नियम पाळून आपली वस्तू किंवा घ्यावयाची वस्तू आदर ठेवून विचारून करावे आपली वस्तू पर्स विसरेल अशे काम करू नये. घरोघरी आदराने वागणं असतं. समाजात.आदराने वागण असतं.

देश परदेश आदरानं वागणं असतं.

आदराने जग चांगलं चालत.

घरोघरी आदराने वागणं असतं.

DSCF2042

श्रीमहालक्ष्मी माहात्म्य

मार्गशीर्ष गुरुवार २२ डिसेंबर२०११ तारीख ला माझा ब्लॉग पोस्ट मध्ये मी गुरुवार मार्गशीर्ष च पुस्तक वैभव लक्ष्मी व्रत हे पुस्तक दाखविले आहे. गुरुवार मार्गशीष च पुस्तक ते नसून श्री महालक्ष्मी माहात्म्य आहे पुस्तक वैभव लक्ष्मी व्रत हे पुस्तक चुकीचे दाखविल्या बध्दल क्षमस्व.

मार्गशीर्ष गुरुवार च पुस्तक श्रीमहालक्ष्मी माहात्म्य आहे.

DSCF2198

ब्लॉग पोस्ट: ४०३

ब्लॉग पोस्ट: ४०३ : दिनांक तारीख २८ डिसेंबर (१२) २०११ तारीख ला माझा ब्लॉग पोस्ट चारशे तीन ४०३ होत आहे. वर्तमान पत्र मासिक वाचन पंचाग मधील सण स्वत: कांही
माहिती असलेले असलेल सर्व मिळून माझ लिखान चालू आहे.आजचा ब्लॉग झाला
उद्या नवीन काय लिहायचा असे सारख मनात विचार असतात.विचार करता करता
कोणता ही विषया वर लिखान सापडते.अरे हा विषय चांगला आहे. व पटकन संगणक
मध्ये लिखान लिहायला लागते. जसा विषय असेल तसा रांगोळी पण काढून तो विषय
तयार करून ब्लॉग तयार करते. वेगवेगळे विषय ब्लॉग मध्ये झाले आहेत. कोणता ब्लॉग चांगला अस सांगता येत नाही. प्रत्येक ब्लॉग च वैशिष्ठ वेगवेगळे आहे. कांही वेळेला शब्द तयार करतांना स्पेलींग कसे तयार करायचे हे पण लक्ष देऊन करावे लागते. कोणी विचारले तर ब्लॉग लक्षात आहे का तर वाचून सांगता येईल. चारचे तीन ब्लॉग पोस्ट आज माझा होत आहे आपण सर्वांनी ईतके ब्लॉग पोस्ट वाचन केले प्रतिक्रिया दिल्या भेटी दिल्या त्या बध्दल धन्यवाद ! धंयवाद !

भेटी २७,०७७

DSCF2192

हार्मोनियम

हार्मोनियम: बाजाची पेटी, हार्मोनियम अथवा संवादिनी हे नाव आहेत.बाजाच्या पट्ट्या : काळ्या व पांढऱ्या असतात. आखूड पट्ट्यांना काळा रंग दिलेला असतो.व लांब पट्ट्यांना पांढरा रंग असतो.काळ्या पट्ट्यां ची विभागणी दोन आणि तीन अशा गटात केलेली आढळते. पांढऱ्या पट्ट्या मात्र सलग असतात. काळ्या पट्ट्यांना काळी एक ,काळी दोन,काळी तीन, काळी चार,व काळी पाच नावांनी ओळखतात.काळी पाच नंतर येणारी काळी पट्टी पुन्हा काळी एकच येते.पांढऱ्या पट्ट्यांना पांढरी एक, दोन, तीन, चार ,पांच,सहा व पांढरी सात असे म्हटले जाते.काळी एक च्या डाव्या बाजूला असणारी पांढरी पट्टी ही पांढरी एक होय.

याच पट्टीला पाश्र्च्यात्त्य संगीतात C (सी) म्हणतात अशा रीतीने सात पांढऱ्या व पाच काळ्या पट्ट्या मध्ये ही स्वरमंजूषा संगीताचे भांडार साठवून आहे.

DSCF2163

वर्तमानपत्र

वर्तमान पत्र : वर्तमान पेपर: रोज सकाळी सात आठ वाजता वार्तमान पेपर घरोघरी येत असतो. अगदी सकाळ झाली की दाराकडे लक्ष लागते वर्तमान पेपर आला आल का ?चहा व वर्तमान पत्र वाचण्याची सवय झालेली असते.

हल्ली सायकल चालवुन मूल ग्यालरीतच खालुन वर्तमान पत्र टाकतात. वर्तमान पत्रला रबर लावून गुंडाळी करतात. व अगदी नेम धरुन बरोबर वर्तमान पेपर ग्यालरी त पडतो. हे एक वरतमान पत्र टाकणाऱ्या मुलांचा कौशल्य व कौतूक आहे.

केसरी ,लोकसत्ता, पुढारी, सकाळ, महाराष्ट्र टाइम्स लोकमत, टाइम्स ऑफ इंडिया इंग्रजी इंद्रधनुष्य असे किती तरी वर्तमानपत्र पेपर असतात.

पहिल एक पाना वर माथळा पासून शेवट दहा पानं वाचण्यासारखी असतात. हवामान, आजचे विचार,वाढदिवस, पंचाग राशिभविष्य कॉर्नर, जाहिराती, अग्रलेख, बहुतांचे अंतरे .धावते जग,जाता जाता ,देश विदेश खेळ. लहान मुलांचे चित्र विशेष
आरोग्य,शेती असं भरपूर वाचायला मिळते. वर्तमान पत्र वर्तमान पेपर मध्ये असत.माहिती मूळे ज्ञान भरपूर मिळते.

रोज वर्तमान पत्र वर्तमान पेपर घरोघरी घेतात. वर्तमानपत्र वर्तमान पेपर ची रद्दी पण साठवली की रद्दीवाले कडेदिली की पैसे पण मिळतात. व वर्तमान पत्र वाचन केल्याचा आनंद मिळतो.

घरोघरी वर्तमानपत्र वर्तमान पेपर हा मित्र असतो.

DSCF2183

नाताळ

                                                      ॐ
नाताळ या शब्दाचा अर्थ जन्म असा असल्याचे ख्रिस्ती पुराणात म्हटले आहे.
त्यावरुन येशू ख्रिस्ता च्या जन्मोत्सवाला हे नाव मिळाले. इ.स.३५३ मध्ये रोम च्या
धर्माध्यक्षाने येशूचा जन्मदिवस २५ डिसेंबर असल्याचे निश्चित करून हा सण
२५ डिसेंबर ते ६ जानेवारी या काळात साजरा करावा असा आदेश काढला.
झाड तयार करून त्या झाडाला वस्तू लटकवून सजवून ठेवतात. सकाळी झाडावरची
आवडती वस्तू पाहून सर्वजन आनंदीत होतात. पांढरी दाढी टोकदार रंगीत टोपीवाला नाताळ
बाबाचे आकर्षण असते.आपल्याला सारे कांही देतो या विश्वासाने ती या जादूचा झाडाची
आराधना करत राहतात.
मेरी ख्रिसमस

DSCF2189

हातगाडी

बर्फाचा गोळा : मी बाजारात जातांना शाळा दिसली. तेथे एक घंटा वाजविणारी हातगाडी उभी होती. गाडी भोवती शाळकरी भरपूर मूलं उभी होती. बर्फा चा गोळा कोणी लाल रंगाचा हिरवा हिरवा रंगाचा पिवळा रंगाचा सर्व एकत्र रंगाचा गोळा मागत असतांना मला दिसली. बर्फ वाला बर्फ किसून काडीला लावून हाताने काडीला एकत्र करत होता त्यावर वेगवेगळ्या बर्फ चा गोलावार वेगवेगळे रंग तयार करून मुलांना देता होता.असे एकदम पाच सहा बर्फा चे गोळे रंगीत तयार झाले.रंगीत बर्फा चे गोळे पाहण्यास चांगल वाटतं वाटलं.

मुला कडून आठ आणे प्रत्तेका कडून बर्फा चा गोळा वाला पैसे घेत असत. मुल पण खुष झाली .मी पण एक लाल रंगाचा बर्फाचा गोळा घेतला मला लाल रंगाचा बर्फाचा गोळा खाताना गोड थंड चांगल वाटलं. असा रंगीत बर्फाचा गोळा बर्फ वाला कडून घेऊन खातांना चांगल वाटत.!

घरोघरी बर्फ याचे गोळा खातात.

lal_ice_gola_chuski

पाट

पाट: टेबल खुर्ची वर जेवण किंवा काही खाण्यास पाट यावर बसून खायला चांगल वाटत
पाटावर मांडी घालून आरामात बसता येते पाटावर बसून तेल लावता येते..पूजा करतांना पाट यावर बसून चांगली पूजा करता येते.
पाटावर बसून ओवाळता येते. पाटावर बसून मंत्र जप करता येतो.पाटावर बसून खालील बसणारी कामे करता येतात.पाटावर सर्व काम करतांना चांगल वाटत .!

DSCF2158

मार्गशीर्ष गुरुवार

स्वस्ति शालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर शिशिर ऋतु प्रारंभ उत्तरायणारंभ
मार्गशीर्ष कृष्णपक्ष 22 डिसेंबर२०११ तारिख ला गुरुवार मार्गशीर्ष महिना मधला चौथा गुरुवार आहे.

मार्गशीर्ष महिना मध्ये चारही गुरुवार सकाळी उपवास व संध्याकाळी गोड जेवण करतात.
सवाष्ण बायका वैभव लक्ष्मीव्रत करतात.

सुख, शांती, वैभव सवाष्ण रुप राहण्याकरता हे वैभव लक्ष्मीव्रत करतात. तांबा च्या तांबा मध्ये पाणी घालून आंबा याची पान ठेवतात.लक्ष्मी ठेवतात. सवाष्ण बायका बोलावून वैभव लक्ष्मीव्रत पुस्तक वाचतात.हळद कुंकू लावून खणा नारळांनी तांदूळ ह्यांनी ओटी भारतात. शिरा गव्हा ची खीर असे कांही गोड देतात.

वाटल्यास जेवण देतात.वैभव लक्ष्मीव्रत पुस्तक देतात.असे हे मार्गशीर्ष महिना त चार गुरुवार करतात.

मनाला खूप चांगल वाटत.हे वैभव लक्ष्मीव्रत केल्यामुळे .म्हणून वैभव लक्ष्मीव्रत करतात.

DSCF2166

फुगा फुगे

फुगा फुगे : फुगा लहान मूला पासून मोठ्या लोका पर्यंत सर्वांना आवडतो.फुगा फुगे वाढदिवस याला लहान मूला पासून मोठ्या मानसांच्या वाढदिवस याला फुगे लावतात.फुगे लहान मोठे असतात.दुकान, घर ,हॉटेल कांही कार्यक्रम असला की फुगा फुगे मुळे शोभा येते.वास्तू प्रसन्न उच्छाही वाटत असते.

गोल मोठा फुगा मध्ये छोटा फुगा घालून फुगा मिळतो. जत्रे मध्ये व वाणी याचा दुकानात. शुशोभीत वस्तूच्या दुकानात फुगे मिळतात.

क्रिसमस सनाला व नवीन वर्षा ला घराच्या वास्तूला फुगे लावतात.होळी ला एरंडा च्या झाडाला फुगे लावतात.

ग्यास चे फुगे खूप उंच जाणारे मिळतात.रंगीत फुगे चांगले दिसतात.घरोघरी फुगे याचा फुगवून घरात लावून उच्छाह ठेवतात.घरोघरी फुगे याचा वापर करतात.

DSCF2184

फुगा फुगे

श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर

स्वस्ति शालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर दक्षिणायन हेमंतऋतु मार्गशीर्ष कृष्णपक्ष दशमी व २०.१२ डिसेंबर २०११ तारीख ला श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांची पुण्यतिथी आहे.

त्यांनी सकाळी ५ वाजुन ५८ मिनीट ला समाधी घेतली आहे. १० दिवस उच्छव गोंदवले गावात असतो.

गोंदवले गावात श्रीब्रह्म चैतन्य महाराज यांची समाधी आहे.त्या गोंदवले श्री ब्रह्मचैतन्य गाव म्हणतात.

श्री गोंदवले महाराज अस ही म्हणतात.श्री गोंदवले महाराज श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांनी साधा सोपा जप भक्तांना दिला आहे.सांगितला आहे.अखंड जप म्हणा आपणास कांही कमी पाडणार नाही.

श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांचा जप.
श्री राम जय राम जयजय राम हा जप आहे.
श्री राम जय राम जयजय राम
श्री राम जय राम जयजय राम
श्री राम जय राम जयजय राम
श्री राम जय राम जयजय राम
श्री राम जय राम जयजय राम

असे म्हणतांना मनाला खूपच खूप चांगल वाटत आहे.

श्री महाराजांचा जप मंत्र म्हणावयास सोपा आहे त्यातून त्यामुळे श्री राम यांचे नामस्मरण होते.

 DSCF2165

DSCF2182

श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर

राजधानी दिल्ली

दिल्ली : भारताची आधी कलकत्ता राजधानी होती. ब्रिटिश यांच्या च सरकार ने १२ डिसेंबर १९११ रोजी एका आदेशाने दिल्ली-नवी दिल्ली राजधानी अस्तित्वात आणली

आता १२ डिसेंबर २०११ साली दिल्ली नवी – दिल्ली राजधानी ला १०० वर्ष पूर्ण झाली आहेत. महाभारताच्या काळात दिल्ली हस्तिनापूर – इंद्रप्रस्थ म्हणून प्रख्यात होती.

ऐतिहासिक बखर नुसार राजा दिलूज याने दिल्लिचा शोध लावला दिल्ली आणि नवी दिल्ली याच विभाजन एक पुल करतो दिल्लीत शहाजहा नने वसलेला जुन्या दिल्लीतील मोगल आणि हिंदू संस्कृती ची प्रतीक असलेला लाल किल्ला ,जामा मशीद, अप्पा गंगाधर जैन मंदिर, शीश गंज गुरुद्वार ह्या वास्तू आहेत.

भारतीय राजकारणा चा मध्यबिंदू म्हणजे मध्य दिल्ली. राष्ट्रपती भवन संसद भवन ते इंडिया गेट (पहिल्या विश्वयुध्दा चे स्मारक)हे सर्व अविस्मरणीय ऐतिहासिक आहेत.

१२ डिसेंबर १९११ ते १२ डिसेंबर २०११ साल म्हणजे १०० वर्ष दिल्ली राजधानी झाली आहेत.

India Gate

काचेच्या गोट्या

काचेच्या गोट्या : शाळेतुन मूल घरी आली की स्वच्छ होऊन खाऊन खेळायला जातात.गोट्या
चार पाच घेतात .मातीतगोल छोटासा खड्डा करतात त्याला गल म्हणतात . आंगठा चाफेकळी व मधल बोट यांनी एक गोटी
जमिनीवर ठेवतात व दोन्ही हाताने दोन गोट्या चाफेकळी व मधल बोट ह्यात ठेवून जमिनीवरील गोटी
वर मारून गोल खड्यात गल मध्ये घालण्याचा प्रयत्न करतात. व एक गोटी गल मध्ये गेल्यावर एक सही झाल असे
म्हणतात. असे गोटी घालून गल मध्ये गोटी घालून सही झाले की पाहण्यास चांगल वाटत. मी हा गोटीचा गल मध्ये
गोटी गेल्याचा व शही झाली हे पुष्कळ वेळा खेळ पाहिला आहे.गोटीचा सही चा खेळ पाहण्यास चांगल वाटत.!

गोटी उजव्या चाफेकळी व मधल बोट ह्यामध्ये गोटी ठेवतात आंगठा
व करंगळी व मरंगळी तिन्ही बोट एकत्र करतात.व डाव्याहाताचे मधल बोट
चाफेकळी व आंगठा उजव्या गोटी ठेवली त्याबोटाना ढकलून जमिनीच्या गोटीला
मारून गल मध्ये नेतात व सही करतात.ही सही झाली की चांगल वाटत.!

DSCF2162  DSCF2156

DSCF0448

मी काचेच्या गोट्या ची प्लास्टिक च्या वायरची विणून मी द्राक्ष केली आहेत.

चांगल वाटतं.!

घंटा : देवळातील किंवा घरातील देवातील घंटा वाजविली की आवाज चांगला ऐकु येतो ऐकावा वाटतो.! चांगल वाटतं.!
चांगला घंटा चा आवाज ऐकायला चांगल वाटतं ऐकायला छान वाटतं घंटा चा आवाज ऐकायला चांगल वाटतं .!
तबला : तबला याचे बोल ऐकायला चांगल वाटतं.छान वाटतं तबला याचे बोल ऐकायल चांगल वाटत.!
हर्मोनियाम: पेटी चे सुर ऐकायला चांगल वाटतं पेटी चे सुर ऐकायला छान वाटतं हारमोनियम चे सुर ऐकायला चांगल वाटतं .!
तंबोरा : तंबोरा लावतांना आलाप ऐकाताना चांगल वाटतं तंबोरा व गाण ऐकतांना चांगल वाटतं गाण ऐकतांना छान वाटतं चांगल वाटतं.!
तंबोरा व गाण ऐकतांना चांगल वाटतं.!
वीणा: वीणा ऐकतांना चांगल वाटतं वीणा ऐकतांना छान वाटतं वीणा ऐकताना
चांगल वाटतं !

DSCF1837  harmonium

DSCF2161

गाजर

गाजर : गाजर याला संस्कृत मध्ये गर्जर / गृंजन म्हणतात.गाजर मुळा प्रमाणे जमिनीत येते. देशी गाजर लाल रंगा चे असते. विलायती गाजर गुलाबी रंगा चे असते. लाल गाजर शंकु आकाराची गाजर गोड असतात.

गाजरा पासून कोशींबिर बनविता येते. गाजर किसुन हिरवी मिरची मीठ हिंग हळद लिंबु
शेंगदाणे याचा कुट घालून करतात.गाजर हलवा दुध साखर गाजर याचा किस काजू बदाम घालून गाजर याचा हलवा करतात. भाजी पण करतात.

अ जीवनसत्व गाजर ह्यात असते.लोह पण गाजर मध्ये असते. डोळे साठी गाजर खाणे चांगले असते. रक्त वाढते. गंधकयुक्त असल्यामुळे रक्तशुध्द होण्यास मदत होते.

घरोघरी गाजर खात असतात.

DSCF2152

गाजर

मेथी

मेथी: मेथी कडु, तुरट, तिखट अशी मेथी असते उष्ण गुणधर्म ची असते. हिवाळी ऋतु मध्ये मेथी भरपूर खातात. मेथी पासून लाडु करतात. मेथीदाणे याची पावडर जाडसर करून घेतात. सुका मेवा व कणिक भाजुन गूळ याचा पाक करून एकत्र करून लाडु करतात. तुरीचे डाळी चे वरण लावून तिखट मीठ हिंग हळद घालून मुध्दा भाजी करतात.

चणा डाळीचे पीठ लावून पण मेथी ची भाजी करतात.कांदा घालून पण भाजी करतात. मेथी धपाटी परोटे धिरडी ज्वारीचे पीठ चणा डाळी चे पीठ तिखट मीठ हळद हिंग तेल मोहन म्हणून घालून दोन्ही भाजून करतात. कच्ची मेथी लिंबू मीठ शेंगदाणे याचा
कुट घालून हिरवी मिरची हळद तेलाची मोहरी घालून फोडणी करून मेथी कोशींबीर करतात.

मेथी खीर बाळाला दुध मिळाव म्हणून बाळांतीन हिला मेथीची पावडर दुध साखर एकत्र उकळून खीर करतात हाडे ठिसूळ होणे कंबर दुखणे बारीक ताप अजीर्ण होणे ह्यावर मेथी चूर्ण किंवा मेथी चे दाणे पाण्यात भिजवून खावेत.रक्तातील साखर कमी
होण्याकरता मेथी चा ऊपयोग होतो.

मेथी घरोघरी खातात.

DSCF2150

बर्फ

वसुधालय वरती बर्फ पडत आहे. डिसेंबर २०११ महिना सुरु झाला आहे. नाताळ २५ डिसेंबर ला सुरु होईल. वसुधालय वरील बर्फ सर्वांनी आवश्य पाहावा. बर्फ पाहण्यास छान वाटत आहे. त्यानिमीत्त रांगोळ्या लावल्या आहेत.

DSCF2124  DSCF2127

DSCF2128  DSCF2126

भूकंप

भूकंप : पृथ्वी च्या बाह्य आवरणात अनेक प्लेटस् असतात.त्यापैकी जगभरातील बारा प्लेटस् महत्वा च्या आहेत. या बारा प्लेटस् एकामेकांवर, एकामेकांच्या खाली किंवा एकामेकां च्या बाजूने सरकत असतात. या सरकण्यामुळेच पृथ्वी च्या बाह्य आवरणाचा आकार सतत बदलत असतो. या हालचाली मुळे प्रस्तरांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर ताण आणि ऊर्जा साठू लागते. हा ताण असह्य झाला की प्रतरांचे थर तडकतात आणि ऊर्जा कंपनाच्या रूपाने बाहेर पडते.यालाच ‘भूकंप’असे म्हणतात.

भूगार्भाच्या आत ज्या ठिकाणी भूकंपाची सुरुवात होते त्याला ‘फोकस किंवा भूकंपाचा केंद्रबिंदू असे म्हणतात. हा केद्रबिंदू भुगर्भाच्या आत पृष्ठभाग ‘एपिसंटर’ म्हणून ओळखला जातो.

पृथ्वी च्या गर्भात होणाऱ्या कंपांना ‘सर्फेस वेव्हज्’ असे म्हणतात. निरनराळ्या क्षमतेचे हजारो भूकंप पृथ्वीवर होत असतात.

DSCF2141

भारतात टेक्टॉनिक (Tectonic Earthquakes) प्रकारचे भूकंप होतात.

Earthquake fault types असतात.

नारळ

नारळ : नारळ याचे झाड समुद्र किनारावर असतात. हल्ली बंगला बाजुचा जमीनित पण लावतात. शहाळ श्रीफळ नारळ असे म्हणतात. शहाळ ओलखोबर नारळ याचे पाणी असते. तसेच नारळ जाड खोबर व नारळ याचे पाणी असते. नारळ वाळवून सुक खोबर करतात. नारळा चे खोबर साखर व गुळ बरोबर वा नुसत खातात. सुक खोबर नुसतपण खातात.

नारळ खोबर याचे गोड व तिखट पदार्थ ला वापरतात. कोल्हापूर चटणी मध्ये सुक खोबर लाल मिरची धने जिरे कोथिंबीर मीठ लसून कांदा एकत्र कुटून जाडसर पावडर वर्षभर करून ठेवतात. ओल नारळ खोबर खोवून हिरवी मिरची कोथिंबीर लिंबू एकत्र करून वाटून मिक्सर मधून काढून चटणी तयार करतात. ओल नारळ खोबरं खोवून रवा लाडूत साखर याचा पाक करून खोबर व रवा याचे लाडू करतात. नारळ खोवून साखर दुध एकत्र करून खोबर याची नारळ याची वडी तयार करतात. पोहे उपमा खाध्य पदार्थवर खाण्यास देतात. भाजी आमटीत खोबर घालतात. काळामसालात सुक खोबर जिरे धने तीळ मीठ एकत्र करून पूड तयार करून मसाला म्हणून वापरतात.

शहाळ याने सवाष्ण गरोदर बाई ची ओटी भरतात नारळ याने सवाष्ण बाई ची ओटी भरतात. सुक खोबर याने पण ओटी भरतात.

नारळ देवाला देतात. शनिवार मारुती शनी ला नारळ वाहतात फोडतात. देवीची ओटी साडी चोळी नारळ याने ओटी भरतात.

घरोघरी नारळ याचा ऊपयोग करतात.

DSCF2138  Vagator Beach, Goa

मिरची

मिरची: मिरची हिरवी लाल रंगाची मिळते. हल्ली ढोबळी मिरची हिरवी,पिवळी व लाल रंगाच्या मिळतात.

लवंगी मिरची ,जवारी मिरची काश्मिरी मिरची बेरकी मिरची असे मिरची चे प्रकार आहेत.
रोज च्या स्वंयपाक व भजी ईतर तिखट खाण्याचे पदार्थ करताना लालमिरची किंवा हिरवी मिरची वापरली जाते वापरतात. लाल मिरची पाण्यात भिजत ठेवून नंतर मीठ घालून वाटतात. मराठवाडी खरडा तयार करतात. सांबार मध्ये देठासगट लाल मिरची फोडणीत टाकतात. चिवडा तही लाल मिरची वापरतात. लाल मिरची ची पावडर करतात.

रोज भाजी चटणीत लाल मिरची चा ऊपयोग करतात. हिरवी मिरची पोहे साबुदाणा खिचडी हिरवी चटणी करतांना ऊपयोग करतात.

तवा वर मीठ हिरवी मिरची दगडी बत्ताने पूर्वी चुली वर आता ग्यास च्या शेगडी वर तवाला आच देऊन तवावर मीठ मिरची चांगली वाटतात. ठसका चांगला येतो. पण ह्या मिरची ला चव येते. हिरवी मिरची तेलात तळतात मीठ लावून वडे बरोबर देतात.

मेथी बारीक करून मीठ हिंग एकत्र करून हिरव्या मिरचीत भरतात व उन्हात वाळवून नंतर तेलात तळतात.

ढोबळी मिरची भाजी करतात चना डाळीचे पीठ लावतात वाफं आणून भाजी करतात दाण्याचा कूट वापरून पण ढोबळी मिरची भाजी करतात.

म्यागी मध्ये वापरतात.पिज्जा मध्ये पण ढोबळी मिरची वापरतात. कोणतीही मिरची असो रोज स्वंयपाक घरात घरोघरी मिरची वापरतात.

DSCF2136

मिरची व मिठाचा खर्डा पाटा-वरवंटा वर मी वाटला आहे.

मार्गशीर्ष पोर्णिमा

मार्गशीर्ष पोर्णिमा: स्वस्ति शालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर दक्षिणायन हेमंतऋतु मार्गशीर्ष शुक्लपक्ष शनिवार १५ पंधरा तसेच डिसेंबर १० २०११ तारीख ला मार्गशीर्ष पोर्णिमा व श्रीदत्तात्रेय जयंती आहे.

आग्रहायणी, खग्रास चंद्रग्रहण आहे.श्रीदत्त जन्म सकाळी सहा ६ वाजता दुपारी व संध्याकाळी असा वेळेला केंव्हा ही करतात.गाणगापूर वाडी व ईतर गावात श्रीदत्त जन्म करतात.

चंद्रग्रहण असले तरी वेळ पाहुन श्रीदत्त जन्म करतात. चंद्रग्रहण चंद्र उगववतांना उगोवतांना वा किंवा रात्री चंद्रग्रहण लागते. व चंद्रग्रहण सुटते रात्रीच. सूर्य पृथ्वी व चंद्र एका लाईन मध्ये एका रेषेत कक्षेत येतात.जसा पृथ्वी फिरेल तसतसे चंद्रग्रहण लागते. तसेच परत पृथ्वी फिरेल तसे चंद्रग्रहण सुटते.

पोर्णिमा ला चंद्र ग्रहण असते. अमावस्या ला सूर्य ग्रहण असते. सूर्य चंद्र व पृथ्वी एका
रेषेत येतात. व सूर्य ग्रहण लागते. पृथ्वी फिरेल तसे सूर्य ग्रहण लागते.व पृथ्वी फिरेल तसे सूर्य ग्रहण सुटते.

आज मार्गशीर्ष पोर्णिमा आहे. खग्रास चंद्रग्रहण आहे.

DSCF2132

Lunar Eclipse

मीठ

मीठ: मीठ रोज जेवणात आवश्यक आहे.केंव्हा केंव्हा भाजी आमटी त पोहे उपमा ह्यात ही मीठ कमी झाले तर आळणी लागते.परत मीठ टाकल्यास एकदम चव चांगली लागते.

रोज स्वंयपाक करणारे त्यांना हाताने मीठ घालायची सवय झालेली असते.अगदी छान पदार्थाला चव येते. म्हणतात पण एवढा मिठाचा अंदाज कसा येतो.वा ! मस्त जेवण झाल आहे.

घरची सुगरण खुष होऊन चेहरा वर आंनद दाखविते . मीठ विषय वर सहसा कोणी लिहीत नाही मला सहज सुचल म्हणून लिहिले आहे.

समुद्र काठी मिठा चे आगर असते.समुद्र ठिकाणी मीठ तयार करतात.खडे मीठ काळे पांढरे मिळतात.असतात.हल्ली टाटा मीठ

कैप्टन कुक असे दळलेले बारीक मीठ बाजारात मिळतात.मीठ मोहरी याने दृष्ट काढतात.लिंबाच सरबत कैरी व ईतर लोणच करण्या करता मिठा चा वापर करतात.चिंच मीठ याने तांब व पितळ याची भांडी स्वच्छ करतात.होतात.

  DSCF2131

युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, चायना, इंडिया, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, ब्राझील ह्या देशांमध्ये मिठागरे आहेत.

ऊस

                                                      ॐ

ऊस : ऊसा पासून साखर गुळ काकवी तयार करतात.ऊसाचे करवे करून खातात.ऊस दाताने सोलून खातात.

ऊसाचा रस पितात.ऊसाचा रस काढून आटवून ढेप ढेपी चा आकार देऊन गुळ तयार करतात.मी ऊसाचा रस गरम करताना गुऱ्हाळ पाहिले आहे.मोठ्या कढईत गोल चुली लाकडाचा पेटलेला शेक पाहिला आहे.

बाजारात गुळाचा ढेपी मिळतात.सक्रांत सणाला छोट्या ढेप वाण म्हणून देतात.तसेच साखर पण वाण देतात.लुटतात.

तुळसी च्या लग्नाला ऊस उभा करून तुळसी चे लग्न करतात. घरोघरी साखर व गुळ असतो ऊसामुळे साखर व गुळ याला फार महत्व आहे.

sugar cane plantation

चहा

चहा: कमीत कमी १०० ते १२५ से.मी. पर्जन्यमान असणाऱ्या प्रदेशात चहाची लागवड केली जाते. दक्षिण चीन दक्षिणपूर्व आशिया येथे चहाचे पीक अधिक आढळते.भारतात आसाम,दार्जीलिंग, निलगिरी, डेहराडून मणिपूर,तराई त्रावणकोर आदी ठिकाणी चहाचे मळे आहेत.चहाचा उत्पादनात भारताचा जगात प्रथम क्रमांक लागतो.जगातील जवळ जवळ सर्वच चहाचे मळे १५०० मिटर्स उंचीवर डोंगर उतारावर आहेत. तीन फुटाच्या अंतराने लावलेली चहाची झुडपे तीन फुट वाढू देतात.मग त्याचा वरचा भाग खुडला जातो.दर २० वीस वर्षांनी जुनी झाडे टाकून तीन वर्षे जमीन पडीक ठेवून नवी झाडे लावली जातात.नवीन रोप तयार होण्यास पाच वर्ष लागतात. चहाच्या झाडाची कोवळी पाने तोडण्याचे काम बायकाच करतात. पाने कारखाना त आणली जातात.तेथे विविध प्रक्रिया केल्या जातात. क्यमेलीया सायनोन्सिस या झुडपां च्या पानांपासून चहा पावडर बनविली जाते.

चहाचा मळा चहाची पाने आणि फुल

कापूस

कापूस : कापसाचे झाड असते. शेतकरी सरकी बी तयार करून बाग तयार करुण मळे तयार करतात. झाडां ना सरकी सगट गेंडे येतात. कापूस येतो.

कापूस याचा ऊपयोग देवाला फुल वात तेल वात तुळसी च्या काडीला कापूस गुंडाळून काकड आरतीला कापूस काकड आरतीला ऊपायोग करतात. देवाला पूजेच्या वेळी वाहतांना गेज ला हळद व कुंकू लावून गेज देवाला वाहतात.

सुती कापड तयार करतात. दी उशी कापसा पासून तयार करतात. सूत काढतात.दवाखाना मध्ये मलम (जखम) पट्टीला कापूस वापरतात. कापूस घरोघरी असतो.

DSCF2130

कापूस याची पुजेची तयारी

लिखाण

मी पूर्वी केलेले कागदावरती व डायरीवरती लिखाण आजही पाहण्यास चांगलं वाटत आहे !

गायत्री मंत्र  DSCF1258

DSCF0901  DSCF0893

  DSCF0870  DSCF0883 

DSCF0625  DSCF0608

 DSCF2128  DSCF2127

|| श्री महलक्ष्मी यंत्र ||

DSCF2123  DSCF2118DSCF2116  DSCF2112DSCF2110  DSCF2105DSCF2103  DSCF2101DSCF2100  DSCF2107

मी काढलेले || श्री महलक्ष्मी यंत्र ||

तुझी माया

तुझी माया

भूमीपरी तुझी माया मुकी साठूनियां पोटी
वृक्षापरी आणी माझ्या फुलें बोलकीं हीं ओठीं

हवेपरी तुझी माया वेढुनीहि निराकार
माझ्या श्र्वासाउच्छुवासांत एक तिचा आविष्कार

नभापरी तुझी माया नित्य आणि नरंजन
घाली सौंदर्याचें निळें माझ्या डोळ्यांत अंजन<

ऐसी गडे तुझी माया नये पहाया मापाया
जग विसरून देवा लागे भक्ताच्याच पायां

पुणें, ३१- ८ – ५०
बोरकरांची कविता

सर्वांत मोठे खगोल !

पृथ्वी : आपली पृथ्वी आकाराच्या बाबतीत सौरमंडळात सहावा स्थानावर आहे. जीवसृष्टी असलेला हा एकमव ज्ञात ग्रह निळ्या शार दिसणाऱ्या या ग्रहाचा व्यास १२,७५६ किलोमीटर इतका आहे.

शुक्र : आकाशात् सर्वाधिक चमकदार दिसणारा हा ग्रह त्याचे कारण म्हणजे सुर्यापासून अंतराच्या बाबतीत तो दुसरा च क्रमांकावर आहे.शुक्रचा व्यास १२,१०४ किलोमीटर इतका आहे.

मंगळ : सध्या जीवसृष्टी चा शोध याच ग्रहावर अधिक घेतला जात आहे.या तांबड्या ग्रहाचा व्यास ६,८०५ किलोमीटर इतका आहे.सूर्यापासून अंतरा च्या बाबतीत हा चौथा स्थानावर आहे.त्याच्या पृष्ठभागावर आयर्न ऑकसाईड चे प्रमाण अधिक असल्याने त्याला तांबूस स्वरूप मिळाले आहे.

गॅनीमीड : हा गुरुचा एक चंद्र त्याचा व्यास ५,२६२ किलोमीटर इतका आहे. गॅलिलिओने १६१० मध्ये त्याचा शोध लावला. चंद्रावर ९७ किलोमीटर जाडीचा बर्फाचा थर असल्याने मानले जाते.

टायटन : हा शनिचा एक चंद्र आकाराच्या बाबतीत तो आपल्या सौरमालिकेत दहावा स्थानावर आहे.त्याचा व्यास ५,१५० किलोमीटर इतका आहे. पृथ्वीवर सुरुवातीच्या काळात जसे वातावरण होते तसे आता टायटन वर आहे. असे समजले जाते.

कै. बा. भ. बोरकर

आज ३० नोवेंबर ! कविवर्य कै. बा भ. बोरकर यांचा आज १०१वा जन्मदिन. त्यानिमित्त त्यांच्या एका काव्याने झालेले परमेश्वराचे आणि त्यांचे स्मरण !

लोण ——-

पाणी दांड्याने हाणीता त्याची उरे काय खूण
वार झेलूनही तसे माझे अच्छोदक मन
तुझ्या स्मरणासरशी फुटे आंत निळा झरा
तोच आपोआप होतो डंखा विखारा उतारा
आधी व्याधी उपाधीची त्यांत निरसती सले
संसाराच्या पाशातही चित्त मोकळे मोकळे
तुझ्या ठायी जीवा थारा धीर आधार आसरा
संसार हा मिटे फुले जसा मोराचा पिसारा
लय लाभल्याने तुझी त्रितापांचे तपत्रय
तुझ्या अखंड सांगाते झालो निश्चिंत निर्भय
तुझ्या माझ्या आट्यापाट्या आनंदाच्या क्रीडेसाठी
माझ्या धावा पोंचवाया तुझे लोण तुझ्याहाती

—— कै. बा. भ. बोरकर

सर्वांत मोठे खगोल !


सर्वांत मोठे खगोल !

सूर्य : हा आपल्या सौरमालिकेतील तारा.त्याचा भोवती सर्व ग्रह प्रदक्षिणा घालत असतात. त्याचापासून च आपल्याला प्रकाश आणि उष्णता मळते.आपल्या सौरमालिकेत अर्थातच सर्वांत मोठा खगोल सूर्य हाच आहे. त्याचा व्यास १३ लाख,९२ हजार, १४० किलोमीटर इतका आहे.

गुरु : आपल्या ग्रहमालिकेतील हा सर्वांत मोठा ग्रह वायूचा एक मोठा गोळा असलेला गुरुचे चंद्र ही अनेक आहेत. गुरुचा व्यास १ लाख, ४२ हजार, ९८४ किलोमीटर इतका आहे.

शनी : आकाराच्या बाबतीत सर्व ग्रहां मध्ये याचा दुसरा क्रमांक लागतो. शनीच्या भोवती असणाऱ्या कडीमुळे तो वैशिष्ट पूर्ण दिसतो.शनीला ही साठ पेक्षा अधिक चंद्र आहेत शनिचा व्यास १ लाख, २० हजार ५३६ किलोमीटर इतका आहे.

युरेनस : सूर्या पासून हा अंतराचा बाबतीत सातवा ग्रह आहे.आकाराच्या बाबतीत तो चौथ्या क्रमांकावर आहे.एका ग्रीक देवतेचे नाव या ग्रहाला देण्यात आले आहे.त्याचा व्यास ५१ हजार ११८ किलोमीटर इतका आहे.

नेपच्यून : अंतराच्या बाबतीत हा सूर्या पासून आठवा क्रमांकाचा ग्रह आहे.ग्रीक समुद्र देवतेचे नाव त्याला देण्यात आले आहे. त्याचा व्यास ४९,५२८ किलोमीटर इतका आहे.२३ सप्टेंबर १८४६ रोजी त्याचा शोध लागला.

%d bloggers like this: