कै. बा. भ. बोरकर
आज ३० नोवेंबर ! कविवर्य कै. बा भ. बोरकर यांचा आज १०१वा जन्मदिन. त्यानिमित्त त्यांच्या एका काव्याने झालेले परमेश्वराचे आणि त्यांचे स्मरण !
लोण ——-
पाणी दांड्याने हाणीता त्याची उरे काय खूण
वार झेलूनही तसे माझे अच्छोदक मन
तुझ्या स्मरणासरशी फुटे आंत निळा झरा
तोच आपोआप होतो डंखा विखारा उतारा
आधी व्याधी उपाधीची त्यांत निरसती सले
संसाराच्या पाशातही चित्त मोकळे मोकळे
तुझ्या ठायी जीवा थारा धीर आधार आसरा
संसार हा मिटे फुले जसा मोराचा पिसारा
लय लाभल्याने तुझी त्रितापांचे तपत्रय
तुझ्या अखंड सांगाते झालो निश्चिंत निर्भय
तुझ्या माझ्या आट्यापाट्या आनंदाच्या क्रीडेसाठी
माझ्या धावा पोंचवाया तुझे लोण तुझ्याहाती
—— कै. बा. भ. बोरकर