आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 2, 2011

सर्वांत मोठे खगोल !

पृथ्वी : आपली पृथ्वी आकाराच्या बाबतीत सौरमंडळात सहावा स्थानावर आहे. जीवसृष्टी असलेला हा एकमव ज्ञात ग्रह निळ्या शार दिसणाऱ्या या ग्रहाचा व्यास १२,७५६ किलोमीटर इतका आहे.

शुक्र : आकाशात् सर्वाधिक चमकदार दिसणारा हा ग्रह त्याचे कारण म्हणजे सुर्यापासून अंतराच्या बाबतीत तो दुसरा च क्रमांकावर आहे.शुक्रचा व्यास १२,१०४ किलोमीटर इतका आहे.

मंगळ : सध्या जीवसृष्टी चा शोध याच ग्रहावर अधिक घेतला जात आहे.या तांबड्या ग्रहाचा व्यास ६,८०५ किलोमीटर इतका आहे.सूर्यापासून अंतरा च्या बाबतीत हा चौथा स्थानावर आहे.त्याच्या पृष्ठभागावर आयर्न ऑकसाईड चे प्रमाण अधिक असल्याने त्याला तांबूस स्वरूप मिळाले आहे.

गॅनीमीड : हा गुरुचा एक चंद्र त्याचा व्यास ५,२६२ किलोमीटर इतका आहे. गॅलिलिओने १६१० मध्ये त्याचा शोध लावला. चंद्रावर ९७ किलोमीटर जाडीचा बर्फाचा थर असल्याने मानले जाते.

टायटन : हा शनिचा एक चंद्र आकाराच्या बाबतीत तो आपल्या सौरमालिकेत दहावा स्थानावर आहे.त्याचा व्यास ५,१५० किलोमीटर इतका आहे. पृथ्वीवर सुरुवातीच्या काळात जसे वातावरण होते तसे आता टायटन वर आहे. असे समजले जाते.

%d bloggers like this: