आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 3, 2011

तुझी माया

तुझी माया

भूमीपरी तुझी माया मुकी साठूनियां पोटी
वृक्षापरी आणी माझ्या फुलें बोलकीं हीं ओठीं

हवेपरी तुझी माया वेढुनीहि निराकार
माझ्या श्र्वासाउच्छुवासांत एक तिचा आविष्कार

नभापरी तुझी माया नित्य आणि नरंजन
घाली सौंदर्याचें निळें माझ्या डोळ्यांत अंजन<

ऐसी गडे तुझी माया नये पहाया मापाया
जग विसरून देवा लागे भक्ताच्याच पायां

पुणें, ३१- ८ – ५०
बोरकरांची कविता

%d bloggers like this: