चहा
ॐ
चहा: कमीत कमी १०० ते १२५ से.मी. पर्जन्यमान असणाऱ्या प्रदेशात चहाची लागवड केली जाते. दक्षिण चीन दक्षिणपूर्व आशिया येथे चहाचे पीक अधिक आढळते.भारतात आसाम,दार्जीलिंग, निलगिरी, डेहराडून मणिपूर,तराई त्रावणकोर आदी ठिकाणी चहाचे मळे आहेत.चहाचा उत्पादनात भारताचा जगात प्रथम क्रमांक लागतो.जगातील जवळ जवळ सर्वच चहाचे मळे १५०० मिटर्स उंचीवर डोंगर उतारावर आहेत. तीन फुटाच्या अंतराने लावलेली चहाची झुडपे तीन फुट वाढू देतात.मग त्याचा वरचा भाग खुडला जातो.दर २० वीस वर्षांनी जुनी झाडे टाकून तीन वर्षे जमीन पडीक ठेवून नवी झाडे लावली जातात.नवीन रोप तयार होण्यास पाच वर्ष लागतात. चहाच्या झाडाची कोवळी पाने तोडण्याचे काम बायकाच करतात. पाने कारखाना त आणली जातात.तेथे विविध प्रक्रिया केल्या जातात. क्यमेलीया सायनोन्सिस या झुडपां च्या पानांपासून चहा पावडर बनविली जाते.
![]() |
![]() |
चहाचा मळा | चहाची पाने आणि फुल |