आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 9, 2011

मीठ

मीठ: मीठ रोज जेवणात आवश्यक आहे.केंव्हा केंव्हा भाजी आमटी त पोहे उपमा ह्यात ही मीठ कमी झाले तर आळणी लागते.परत मीठ टाकल्यास एकदम चव चांगली लागते.

रोज स्वंयपाक करणारे त्यांना हाताने मीठ घालायची सवय झालेली असते.अगदी छान पदार्थाला चव येते. म्हणतात पण एवढा मिठाचा अंदाज कसा येतो.वा ! मस्त जेवण झाल आहे.

घरची सुगरण खुष होऊन चेहरा वर आंनद दाखविते . मीठ विषय वर सहसा कोणी लिहीत नाही मला सहज सुचल म्हणून लिहिले आहे.

समुद्र काठी मिठा चे आगर असते.समुद्र ठिकाणी मीठ तयार करतात.खडे मीठ काळे पांढरे मिळतात.असतात.हल्ली टाटा मीठ

कैप्टन कुक असे दळलेले बारीक मीठ बाजारात मिळतात.मीठ मोहरी याने दृष्ट काढतात.लिंबाच सरबत कैरी व ईतर लोणच करण्या करता मिठा चा वापर करतात.चिंच मीठ याने तांब व पितळ याची भांडी स्वच्छ करतात.होतात.

  DSCF2131

युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, चायना, इंडिया, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, ब्राझील ह्या देशांमध्ये मिठागरे आहेत.

%d bloggers like this: