आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 11, 2011

मिरची

मिरची: मिरची हिरवी लाल रंगाची मिळते. हल्ली ढोबळी मिरची हिरवी,पिवळी व लाल रंगाच्या मिळतात.

लवंगी मिरची ,जवारी मिरची काश्मिरी मिरची बेरकी मिरची असे मिरची चे प्रकार आहेत.
रोज च्या स्वंयपाक व भजी ईतर तिखट खाण्याचे पदार्थ करताना लालमिरची किंवा हिरवी मिरची वापरली जाते वापरतात. लाल मिरची पाण्यात भिजत ठेवून नंतर मीठ घालून वाटतात. मराठवाडी खरडा तयार करतात. सांबार मध्ये देठासगट लाल मिरची फोडणीत टाकतात. चिवडा तही लाल मिरची वापरतात. लाल मिरची ची पावडर करतात.

रोज भाजी चटणीत लाल मिरची चा ऊपयोग करतात. हिरवी मिरची पोहे साबुदाणा खिचडी हिरवी चटणी करतांना ऊपयोग करतात.

तवा वर मीठ हिरवी मिरची दगडी बत्ताने पूर्वी चुली वर आता ग्यास च्या शेगडी वर तवाला आच देऊन तवावर मीठ मिरची चांगली वाटतात. ठसका चांगला येतो. पण ह्या मिरची ला चव येते. हिरवी मिरची तेलात तळतात मीठ लावून वडे बरोबर देतात.

मेथी बारीक करून मीठ हिंग एकत्र करून हिरव्या मिरचीत भरतात व उन्हात वाळवून नंतर तेलात तळतात.

ढोबळी मिरची भाजी करतात चना डाळीचे पीठ लावतात वाफं आणून भाजी करतात दाण्याचा कूट वापरून पण ढोबळी मिरची भाजी करतात.

म्यागी मध्ये वापरतात.पिज्जा मध्ये पण ढोबळी मिरची वापरतात. कोणतीही मिरची असो रोज स्वंयपाक घरात घरोघरी मिरची वापरतात.

DSCF2136

मिरची व मिठाचा खर्डा पाटा-वरवंटा वर मी वाटला आहे.

%d bloggers like this: