आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 12, 2011

नारळ

नारळ : नारळ याचे झाड समुद्र किनारावर असतात. हल्ली बंगला बाजुचा जमीनित पण लावतात. शहाळ श्रीफळ नारळ असे म्हणतात. शहाळ ओलखोबर नारळ याचे पाणी असते. तसेच नारळ जाड खोबर व नारळ याचे पाणी असते. नारळ वाळवून सुक खोबर करतात. नारळा चे खोबर साखर व गुळ बरोबर वा नुसत खातात. सुक खोबर नुसतपण खातात.

नारळ खोबर याचे गोड व तिखट पदार्थ ला वापरतात. कोल्हापूर चटणी मध्ये सुक खोबर लाल मिरची धने जिरे कोथिंबीर मीठ लसून कांदा एकत्र कुटून जाडसर पावडर वर्षभर करून ठेवतात. ओल नारळ खोबर खोवून हिरवी मिरची कोथिंबीर लिंबू एकत्र करून वाटून मिक्सर मधून काढून चटणी तयार करतात. ओल नारळ खोबरं खोवून रवा लाडूत साखर याचा पाक करून खोबर व रवा याचे लाडू करतात. नारळ खोवून साखर दुध एकत्र करून खोबर याची नारळ याची वडी तयार करतात. पोहे उपमा खाध्य पदार्थवर खाण्यास देतात. भाजी आमटीत खोबर घालतात. काळामसालात सुक खोबर जिरे धने तीळ मीठ एकत्र करून पूड तयार करून मसाला म्हणून वापरतात.

शहाळ याने सवाष्ण गरोदर बाई ची ओटी भरतात नारळ याने सवाष्ण बाई ची ओटी भरतात. सुक खोबर याने पण ओटी भरतात.

नारळ देवाला देतात. शनिवार मारुती शनी ला नारळ वाहतात फोडतात. देवीची ओटी साडी चोळी नारळ याने ओटी भरतात.

घरोघरी नारळ याचा ऊपयोग करतात.

DSCF2138  Vagator Beach, Goa

%d bloggers like this: