आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 15, 2011

मेथी

मेथी: मेथी कडु, तुरट, तिखट अशी मेथी असते उष्ण गुणधर्म ची असते. हिवाळी ऋतु मध्ये मेथी भरपूर खातात. मेथी पासून लाडु करतात. मेथीदाणे याची पावडर जाडसर करून घेतात. सुका मेवा व कणिक भाजुन गूळ याचा पाक करून एकत्र करून लाडु करतात. तुरीचे डाळी चे वरण लावून तिखट मीठ हिंग हळद घालून मुध्दा भाजी करतात.

चणा डाळीचे पीठ लावून पण मेथी ची भाजी करतात.कांदा घालून पण भाजी करतात. मेथी धपाटी परोटे धिरडी ज्वारीचे पीठ चणा डाळी चे पीठ तिखट मीठ हळद हिंग तेल मोहन म्हणून घालून दोन्ही भाजून करतात. कच्ची मेथी लिंबू मीठ शेंगदाणे याचा
कुट घालून हिरवी मिरची हळद तेलाची मोहरी घालून फोडणी करून मेथी कोशींबीर करतात.

मेथी खीर बाळाला दुध मिळाव म्हणून बाळांतीन हिला मेथीची पावडर दुध साखर एकत्र उकळून खीर करतात हाडे ठिसूळ होणे कंबर दुखणे बारीक ताप अजीर्ण होणे ह्यावर मेथी चूर्ण किंवा मेथी चे दाणे पाण्यात भिजवून खावेत.रक्तातील साखर कमी
होण्याकरता मेथी चा ऊपयोग होतो.

मेथी घरोघरी खातात.

DSCF2150

%d bloggers like this: