आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 27, 2011

हार्मोनियम

हार्मोनियम: बाजाची पेटी, हार्मोनियम अथवा संवादिनी हे नाव आहेत.बाजाच्या पट्ट्या : काळ्या व पांढऱ्या असतात. आखूड पट्ट्यांना काळा रंग दिलेला असतो.व लांब पट्ट्यांना पांढरा रंग असतो.काळ्या पट्ट्यां ची विभागणी दोन आणि तीन अशा गटात केलेली आढळते. पांढऱ्या पट्ट्या मात्र सलग असतात. काळ्या पट्ट्यांना काळी एक ,काळी दोन,काळी तीन, काळी चार,व काळी पाच नावांनी ओळखतात.काळी पाच नंतर येणारी काळी पट्टी पुन्हा काळी एकच येते.पांढऱ्या पट्ट्यांना पांढरी एक, दोन, तीन, चार ,पांच,सहा व पांढरी सात असे म्हटले जाते.काळी एक च्या डाव्या बाजूला असणारी पांढरी पट्टी ही पांढरी एक होय.

याच पट्टीला पाश्र्च्यात्त्य संगीतात C (सी) म्हणतात अशा रीतीने सात पांढऱ्या व पाच काळ्या पट्ट्या मध्ये ही स्वरमंजूषा संगीताचे भांडार साठवून आहे.

DSCF2163

%d bloggers like this: