छायाचित्र संग्रह
ॐ
छायाचित्र संग्रह : छायाचित्र फोटो हे पूर्वा पार पासून जतन जपुन संग्रह करण्याची पध्दत रित आहे. मागील वस्तु मागे आपण कसे वावरत होतो दिसत होतो आपले नातेवाईक कसे दिसतात हे पूर्वीच्या छायाचित्र पाहुन आरे असं मनात येत. त्यांची आलेली आठवण चायाचित्रात पाहुन मन परत पूर्वात मागे जात.
छायाचित्र साठवन व संग्रह करणे फार महत्वाच काम आहे. मग घरगुती व्यक्ती असो निसग्रा चे असो रांगोळी चे असो रांगोळी ने श्र्लोक लिहिलेले असो नुसती रांगोळी रंगीत रांगोळी असो असे छायाचित्र जपून ठेवणे चांगलं वाटत.
पक्षाचे झाडा चे फुला चे हे पण छायाचित्र जपून ठेवण्यास चांगलं वाटत.
पूर्वी काळे छायाचित्र स्टुडीयोत काढून मिळत किंवा फोटो ग्राफर घरी येऊन काढून धुऊन देत असत.
आता घरोघरी क्यामेरा असल्यामुळे छायाचित्र काढले की स्टुडीयोत छायाचित्र धुवून मिळते.
छायाचित्र संग्रह करणे फार महत्वाच काम आहे घरोघरी मोठ्या लोकांचे लहान मुलांचे छायाचित्र असतात.
डोहाळजेवण, संक्रात सण कोणतीही पूजा वाढदिवस लग्न मौंज वास्तू सर्व प्रकारचे छायाचित्र असतात.
हल्ली क्यासेट सीडी असे छायाचित्र पण पाहण्यास मिळतात.परदेश ला आपण गेलो तर तेथील व आपले छायाचित्र संग्रह करता येतो.
घरोघरी छायाचित्र संग्रह असतो.