आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी, 2012

मेथी व कांदा भाजी

मेथी व कांदा भाजी: मेथी ची जुडी पेंडी मोकळी करावी. थोड देठासगट मेथी ची पान घ्यावीत. मेथी निवडुन झाल्यावर निवडलेली मेथी धुवून घ्यावी.बारीक चिरावी. मी विळीने भाजी चिरते.

एक कांदा बारीक चिरावा.मेथिची भाजी व कांदा वेगवेगळे ठेवावेत. तेल व मोहरी ची फोडणी करावी.

प्रथम कांदा फोडणीत घालून परतून घ्यावा.मेथी चिरलेली कांदा मध्ये घालावी परत कांदा व मेथी परतून घ्यावी.मेथी कांदा मध्ये हळद तिखट मिठ हिंग घालावे. कळत न कळत पाणी घालावे.मेथी व कांदा मसाला घातलेले पाणी थोड घातलेले हलवून वाफ आणावी.

छान मेथी व कांदा भाजी तयार होते.

भाकरी पोळी बरोबर खान्यास द्यावी.

घरोघरी मेथी व कांदा भाजी तयार करतात खातात.

घरोघरी मेथी व कांदा भाजी करतात.

DSCF2237  DSCF1222

रथसप्तमी

ॐ 

स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर उत्तरायण शिशिरऋतु नक्षत्र अश्र्विनी सात सोमवार माघ शुक्लपक्ष रथसप्तमी आहे. रथधिष्ठित सूर्य याचे पूजन करतात. तसेच दिनांक तारीख ३० जानेवारी (१) ला रथसप्तमी आहे. 

ॐ 
रथसप्तमी म्हणून मी तिळग़ूळ याची पोळी केली आहे.
प्रथम तिळ भाजून घेतले.
मिस्कर मधून बारीक करून घतले. 
ग़ूळ किसून बारीक करून घेतला.
खोबर किसून घेतले. 
खोबर तिळ कूट ग़ूळ सादूक तूप लावून सर्व एकत्र केले. 
कणिक तेल मीठ घालून पाण्यात.भिजवून गोळा केला. 
ग्यस पेटविला तवा ठेवला.
ओट्यावर पोळपाट लाटणं ठेवले.
कणीक याचा छोटा गोळा घेतला हातानेच मोठ्ठा केला कणीक गोळ्या मध्ये तिळ गूळ खोबर तूप याच सारण भरलं पोळी प्रमाणे लाटून पेटलेल्या ग्यास च्या तव्यावर तिळ गूळ पोळी भाजून घेतली.दोन्ही बाजूने परत तूप सोडले. छान खमंग व कुरकुरीत झाली. तूप व तिळ गूळ पोळी डीश मध्येकाढून खाण्यास दिली. तिळगूळ पोळी कोणी कोणी डाळीचे पीठ भाजून तिळ गूळ मध्ये घालून पण पोळी करतात. कोणी कोणी नुसता गूळ घालून गुळा ची पोळी करतात.ज्याला जशी आवडेल तशी तिळ गूळ पोळी करतात. घरोघरी तिळ गूळ पोळी करतात.

वांग मटार भाजी

वांग मटार भाजी: मटार सोलून मटार काढून घ्यावेत. वांगी देठासगट लांब लांब चिरावीत. मटार वांगी एकत्र करून धुवावित. तेल मोहरी याची फोडणी करावी. फोडणी मध्ये मटार वांगी घालावित. थोड पाणी घालून झाकन ठेवून भाजी शिजू द्यावी. वांग मटार शिजल्यावर भाजी मध्ये हळद हिंग मीठ लाल तिखट भाजलेले तिळकुट सुक किसलेले खोबर घालावे.

वांग मटार मसाला परत पाण्यात शिजवु ध्यावे.छान वाफ आणावी. पातेल्याला वांग मटार मसाला लागणार नाही याची काळजी घ्यावी. वांग मटार याची भाजी बाजरी च्या भाकरी बरोबर चांगली लागते.

एरवी ज्वारी ची भाकरी किंवा पोळी बरोबर पण वांग मटार भाजी चांगली खान्यास चांगली लागते.

घरोघरी वांग मटार भाजी व भाकरी अथवा पोळी बरोबर खातात.

घरोघरी वांग मटार भाजी करतात.

DSCF2234 DSCF0291

परतलेली हरबरा डाळ

हरबरा डाळ : हरबरा डाळ चणाडाळ आपल्याला पाहिजे तेवढी घ्यावी.सात आठ तास छान पाण्यात भिजत ठेवावी. पाणी काढून मिस्कर मधून बारीक करावी. आपल्याला जेवढी बारीक हवी तेवढी बारीक करावी.

तेलाची मोहरी घालून फोडणी करावी.त्यात कडीपत्ता टाकावा.वाटलेली हरबरा डाळ टाकावी.खूप छान परतून घ्यावी. मोकळी करावी. मोकळी झाल्यावर हरबरा डाळीत तिखट मीठ हळद हिंग टाकावे.थोड लिंबू पाळावे.परत छान सर्व एकत्र परतावे.डाळ मोकळी होण्या करता खूप हलवावी लागते.

पातेल्याला लागू नाही याची काळजी घ्यावी लागते. सर्व परतलेली हरबरा डाळ पोहे सारखी खाण्यास डिश मध्ये देऊन परत वाटल्यास लिंबू कोथिंबीर घालावी. अशी हरबरा डाळ पोळी भाकरी बरोबर पण खाण्यास देतात.

परतलेली हरबरा डाळ घरोघरी करतात.

घरोघरी करतात.

DSCF2233

मी कसा ब्लॉग तयार करते?

मी कसा ब्लॉग तयार करते:

मी प्रथम गूगल ट्रानस्लीटरेशन वर जाते.
तेथे मराठी, संस्कृत, हिंदी, गुजराथी अशा सर्व भाषा असतात.
मी संस्कृत वर जाते. ॐ लिहिते.
मग मराठी भाषा निवडते, इंग्रजी तून मराठी स्पेलिंग करते (फोनेटिक इंग्रजी).
सर्व लिखाण झाल्यावर सिलेक्ट ऑल करते. कॉपी करते. हॉटमेल वर जाते. तेथे पेस्ट करते.
टु वर जाते. इमेल वर माझ्या ब्लॉग चा पत्ता घालते. सेंड करते.
सर्वांना मराठी वाचायला मिळते.

सर्व संगणक मध्ये गुगल प्लस ची सोय आहे.
फक्त भाषा प्रमाणे आपण स्पेलींग करून तयार करावे लागते. एवढच
सराव प्रमाणे मराठी स्पेलींग करण्यास वेळ लागतो.
सराव घाला की लगेच लगेच स्पेलींग तयार होतात.
रस्व दीर्घ पाहिजे असल्यास ट्रानस्लीटरेशन वर पोपप पट्टी येते त्यावर क्लिक करणे. म्हणजे रस्व दीर्घ पण बरोबर येते.

अशा प्रमाणे लिखाण करून ब्लॉग तयार करू शकतो.

प्रजासत्ताक दिन

आज २६ जानेवारी (१) २०१२ दिनांक तारीख ला

प्रजासत्ताक दिन आहे. प्रजासत्ताक दिनाच्या

शुभेच्छा !

तिरंगा  भारत

dscf1897

DSCF2226

श्रीगणेश जयंती

स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर उत्तरायण शिशिरऋतु नक्षत्र शततारा
माघ शुक्लपक्ष गुरुवार विनायक चतुर्थी श्रीगणेश जयंती आहे.

तसेच गुरुवार २६ जानेवारी (१) २०१२ तारीख दिनांक ला श्रीगणेश जयंती आहे.

तिळगुळ याचा लाडु गणपती ला नैवेध्द देतात.

DSCF1535  DSCF0527

DSCF2077  aca1f8502b4e

DSCF1665

तिळगुळ घ्या गोड बोला !

स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर उत्तरायण हेमंतऋतु नक्षत्र हस्त कृष्णपक्ष पौष महिना सप्तमी रविवार १५ जानेवारी (१) २०१२ तारीख दिनांक ला मकरसंक्रांति भानुसप्तामि आहे.

ह्यादिवसा पासून माघशुक्लपक्ष रथसप्तामि संक्रांति च महत्व आहे तिळगुळ हलवा तिळा ची गुळ घालून केलेली पोळी करणे हळद कुंकू करणे काही वस्तू किंवा धान्य पदार्थ देण्याची पध्दत आहे. मी तिळगुळ याची वडी व लाडू केले आहे. तीळगुळ दडी व लाडू : प्रथम तीळ भाजून घ्यावे गुळा चा कळतनळत पाणी घालून गुळ विरघळू द्यावा पाणी घातल्यामुळे गुळ जळत नाही.पाक घट्ट करावा.पाकामध्ये तीळ टाकावेत किसलेले खोबर घालावे कोणी शेंगदाने पण घालतात.मी तीळ किसलेले खोबर घातले आहे.थोड सादुक तूप तीळ पाक ह्यात घालावे. पोळपाट ला तूप लावाव. हाताने सारखे करून घ्यावे सुरुने वड्या पाडाव्यात.किंवा गोल लाडू करावे.खुपदिवस तीळ गुळा चे लाडू व वड्या राहतात.

घरोघरी तिळगुळा चे लाडू वडी पोळी असे पदार्थ करतात. तिळगुळ घ्या गोड बोला असे म्हणतात.

तिळगुळ घ्या गोड बोला !

बाजरीचा भात

स्वस्ति शालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर उत्तरायण हेमंतऋतु नक्षत्र उत्तरा शनिवार पौष कृष्णपक्ष १४ जानेवारी (१)२०१२ ला भोगी आहे. यंदा भोगी १४ (१)जानेवारी ला आली आहे.

संक्रात १५ (१)जानेवारी ला आहे.

भोगीला बाजरी ची भाकरी तीळ लावून करतात.मी बाजरीचा भात केलेला आहे.
बाजरीचा चा भात : आपल्याला हवी तेवढी बाजरी घ्यावी. बाजरीला पाण्याचा हात लावावा. अर्धा तास भिजत ठेवावी पूर्वी उखळ मुसळ खलबत्ता कांडत असतं

सडून घेत बारीक करत असतं मी मिस्कर मधून बारीक करून घेतली. कोंड्या सगट
ठेवावी. गरम पाणी करावे.पातेल्यात तेलाची फोडणी मोहरी घालून करावी. फोडणी मध्ये बाजरी बारीक केलेली घालून परतावी. बाजरी मध्ये गरम पाणी घालावे.पाणी व बाजरी मध्ये मीठ हळद हिंग थोड तिखट तीळ याचा कूट व अख्खे कच्चे सेंगदाणे घालावे. छान शिजवू ध्यावे. परत मोहरी व तेल हिरवी लाल मिरची घालून फोडणी करून बाजरी च्या भातावर घालावी. मुगाच्या उसळी बरोबर बाजरी चा भात खावा बाजरी चा भात व उसळ खाण्यास खूपच गोड लागतो.>

घरोघरी बाजरी चा भात करतात.

DSCF2212  DSCF2213

मुगाची उसळ                                        बाजरीचा भात

सूर्य याची आरती

                                                   ॐ
सूर्य याची आरती : जय जय जगतहरणा दिनकर सुखकिरणा || उदयाचल
जगभासक दिनमणि शुभस्मरणा | पद्मासन सुखमूर्ती सुहास्यवदना |
पद्मकर वरदप्रभ भास्वत सुखवदना ||१|| जय देव जय देव जय भास्कर सूर्या |
विधिहरिशंकररूपा जय सुरवरवर्या ||धृ O || कनकाकृतिरथ एकचक्रांकित तरणी |
सप्तननाश्र्वभूषित रथिं त्या वैसोनी || योजनसहस्त्र व्दे व्दे शतयोजना दोनी |
निमिषार्धै जग क्रमिसी अद् भूत तव करणी ||जय O || ||२||
जगदुभ्दव स्थितिप्रलयकरनाद्दरूपा | ब्रह्म परात्पर पूर्ण तूं अव्दय तद्रूपा ||
तत्वपदव्यतिरित्क अखंडसुखरूपा |अनन्य तव पद मौनी वंदित चीद्रुपा ||
जय देव जय देव जय भास्करा सूर्या ||३||

DSCF0671  DSCF0669

भेट कार्ड

भेट कार्ड : पोष्टा ने नवीन वर्षा ला दिवाली ला संक्रात सणाला भेट कार्ड पाठवित असत.
वाढदिवस परीक्षा शुभेच्छा ला पण भेट कार्ड पाठवित असत.घरातील कोणी पास झाले की भेट कार्ड पाठवित असत.

छोट्या छोट्या पिशवीत हलवा घालून पोष्टा ने हलवा देत असतं. पोष्टा च्या पाकिटात अख्खे तीळ गुळ कुंकू याची पुडी पण पाठवित असत.

आता फोन वर च शुभेच्छा देतात. तीळ गुळ पण फोन वर च सांगतात.

स्वत:रुमाल पेंटीग करून संक्रात सणाला देत असत. विणून पण रुमाल तयार करत असत.हे सर्व जपून ठेवण्यास चांगल वाटत.

घरोघरी असे भेट कार्ड येत असत.

DSCF2202  DSCF2203

पुरुषांचे राहणीमान

ॐ 

पुरुषांचे राहणीमान : पुरुष धोतर कुडता (सदरा) घालातातं. कोट पण घालतात.डोक्यावर टोपी काळी किंवा पांढरी घालतात. फेटे पण बंधतात. फेटे बांधण्याचे खूप प्रकार आहेत. मध्ये गोल ठेवून मोठा काना पर्यंत फेटा बांधतात.कोणी पाठीवर फेटाचा भाग सोडून डोक्यावर काना पर्यंत फेटा बांधतात.कोणी फेटा चा मध्ये पातळ भाग ठेवून गोल फेटा बांधतात. तयार गोल ऊभे फेटे बांधतात.कोणी ह्याट डोक्यावर वापरतात. हल्ली कांही पुरुष च असे राहतात. लग्न व समारंभ याला सर्रास फेटे बांधण्याची पध्दत आहे. बिकबाळी हातात अंगठी हातात व पायात कड घालतात. नंतर पुरुष पायाजामे सदरा वापरत. नंतर पुरुष घड्याळ गळ्यात साखळी वापरायला लागले. नंतर पुरुष शर्ट प्यंट घड्याळ गळ्यात साखळी हातात. अंगठी मनगटात शाखळी किंवा कड वापरायला लागले घरोघरी अजुन ही धोतर सदरा टोपी असतोच.

स्त्रियांचे राहणीमान

राहणीमान : स्त्रिया बायका पूर्वी कपाळी मेणावर मोठ्ठ लाल कुंकू लावतं असतं. काष्टा घालून नऊवारी लुगड नेसत असतं. धारवाडी खणाची चोळी घालतं. कानात. मोत्याचा सात मोती असलेल्या कुड्या घालत.खोफा अंबाडा मध्ये सोन्याचं फूल घालतं काळे मणी असलेले दोन वाट्या सोन्याचा असलेले सोन्या मध्ये मंगळसुत्र घालतं.

मोहनमाळ चिंचपेटी सोन्या ची घालत. पायाच्या बोटा मध्ये जोडवी घालत. नाकातं मोत्याची नथ घालत. हातातं काचेच्या बांगड्या व पाटल्या गोठ बांगड्या सोन्याचे तोडे सर्रास रोज कंबरपट्टा घालतं.

हाताच्या बोटामध्ये अंगठी वापरत सोन्याचावाक्या घालण्याची पध्दत आहे. बायका घालतं असत.

नंतर सहावारी साडी नेसायची पध्दत आली.कुंकू, गंध, किंवा टिकली लावायची पध्दत आली काचेच्या बांगड्या पाटल्या बागंड्या सोन्याचा घालत. काळे मणी सोन्याची दोन वाटी असलेले मंगळसूत्र घालतातच.

पायाच्या बोटामध्ये जोडवी घालतात. पायात चांदीच्या साखळ्या घालण्याची पध्दत आली आहे.

छल्ला हल्ली वापरतात. अंगठी हाताच्या बोटं मध्ये घालतात केसाचे दोन वेण्या किंवा एक वेणी रिबिनी लावून घालायची पध्दत असे.

आता आता ड्रेस वापरतात. केस मोकळे ठेवण्याची पध्दत आली आहे.आता ही बायका पाटल्या गोठ बांगड्या तोडे वाक्या नथ चमकी वापरतात.

घरोघरी कुंकू पायातील जोडवी हातातील काचेच्या बांगड्या अंगठी चमकी घालून सहावारी साडी लांब हाताचे पोलक पदर खोचून बायका सर्रास घरात व बाहेर फिरतांना वावरतात.

सोन शरीरावर अंगावर घातल्यामुळे पूर्वी तजेल राहत असे. हल्ली कामावर नोकरी वर बायका जातात. त्यामुळे एवढ रोज सोन वापरत नाहीत. मात्र सणावाराला अजून ही लग्नात बायका सोन याचा वापर करतात.

घरोघरी थोड तरी सोन वापरून बायका राहतात.

रांगोळी

पौष पौर्णिमा

स्वस्ति शालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर उत्तरायण हेमंतरुतु नक्षत्र पुर्नवसु

पौष पौर्णिमा शुक्लपक्ष १५ सोमवार तसेच जानेवारी ९.१.२०१२ ला शाकंभरी पौर्णिमा आहे. माघस्नानारंभ आहे.

पौष पौर्णिमा च्या सर्वांना शुभेछा !

Full Moon

जातं

जातं : जातं अजुन ही कांही घरोघरी जात असतं. मेतकुट पीठी साखर करण्या करता
जातं याचा उपयोग करतात मुहूर्त करण्या करता जात वापरतात. दगडी दोन पाळ असतात.

एक लाकडी खुंटा असतो. सुपात धान्य ठेवून डावा पाय पसरून उजवा पायाची मांडी घालतात.

एकटी किंवा दोन बायका बसतात. मुहूर्ता ला पाच सात अशा कितीतरी सवाष्ण बायका खुंटा ला हात लावतात. डाव्या हाताने हातानं सुपातील धान्य गोल जातं ह्यात घालतात. कोणी खुंटा डावी कडून फिरवितात तर कोणी उजवी कडून फिरवितात धान्या चा बारीक होतांना गु S र गु S र असा आवाज चांगला मोठा येतो. असा आवाज ऐकण्यास खूप चांगल वाटत.

ओवी म्हणत जातं ह्यात ध्यान टाकून दळतात. ओवी ऐकतांना पण मनाला चांगल वाटत. ओवी जातं बायका धान्य दळण्याचा आवाज सर्व एकत्र चांगल वाटत. घरोघरी पूर्वी असा आवाज ऐकू येत असे.

आता आता गिरणीतून वीज याचा पट्टा च्या साह्याने ज्वारी गहू हरबरा चं पीठ भाजणी गिरणी तून दळून आणतात.

हल्ली पिठी साखर पण गिरणीतून दळून आणतात. गिरणी पण दगडी पाळ दोन एकावर एक असतात. पट्टा याचा आवाज पट पट पट पट असा येतच असतो.दळलेल पीठ गरम असते डबे धरतांना डबा गरम लागतो. मी खूप वेळा गिरणीत धान्य दळून आणायला गेले आहे. व जात वर पण पिठी साखर मेतकुट करायला मुहूर्ता ला पण बसले आहे.
घरोघरी जात व गिरणी याचा उपयोग करतात.हल्ली छोटी पिठाची गिरणी घरात वापराव्या करता बाजारात मिळते.

घरोघरी गिरणी तून धान्य दळून आणतात.

grindingstone

वाहन

वाहन : सायकल लहान मुलांची तीन चाकी सायकल असते शाळा कॉलेज मुला मुलींची सायकल दोन चाकी असते. मोटर सायकल फटफटी दोन चाकी असते. स्कूटर तीन चाकी असते. बस चार चाकी असले तरी मागील चाक दोन दोन चाक लावतात. रेल्वे प्रत्येक डबा ला दोन चाक असतात. रस्ता नीट करणे बुलडोझर याला तीन मोठे मोठे गोल चाक असतात. बैलगाडी याला दोन लोखंडी चाक असतात. गाडीला चार चाक असतात.

विमान याला तीन चाक असतात. हातगाडी ला चार लोखंडी चाक असतात. ट्रक याला चार चाक असून मागील चाक दोन दोन असतात.

प्रत्येक वाहन चालविणारे वेगवेगळे व्यक्ती माणस असतात. तरी पण प्रत्येक माणूस व्यक्ती व्यवस्तीत वाहन चालवितात.

प्रत्येक वाहना च्या व्यक्ती ला हात दाखवून पुढे जाण्यास सांगतात.

हे प्रत्येक वाहनं चालकाचे कौशल्य आहे.

वाहन चालकांनी वाहन नीट चालविल्यास कोणता ही अपघात होणार नाही व देश जग नीट राहील याची सर्व वाहन चालकांनी काळजी दक्षता घेतली की कांहीच देश व जगात वाहन चालकां ना व इतर सर्वाना काहीच त्रास नाही.

Roadroller

नवीन वर्षा च्या शुभेच्छा!

ॐ 

रविवार १ जानेवारी (१)२०१२ नवीन वर्ष सुरु होत आहे.
नवीन वर्षा च्या सर्व महिना ला सर्व शुभेच्छा !

%d bloggers like this: