आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी 8, 2012

जातं

जातं : जातं अजुन ही कांही घरोघरी जात असतं. मेतकुट पीठी साखर करण्या करता
जातं याचा उपयोग करतात मुहूर्त करण्या करता जात वापरतात. दगडी दोन पाळ असतात.

एक लाकडी खुंटा असतो. सुपात धान्य ठेवून डावा पाय पसरून उजवा पायाची मांडी घालतात.

एकटी किंवा दोन बायका बसतात. मुहूर्ता ला पाच सात अशा कितीतरी सवाष्ण बायका खुंटा ला हात लावतात. डाव्या हाताने हातानं सुपातील धान्य गोल जातं ह्यात घालतात. कोणी खुंटा डावी कडून फिरवितात तर कोणी उजवी कडून फिरवितात धान्या चा बारीक होतांना गु S र गु S र असा आवाज चांगला मोठा येतो. असा आवाज ऐकण्यास खूप चांगल वाटत.

ओवी म्हणत जातं ह्यात ध्यान टाकून दळतात. ओवी ऐकतांना पण मनाला चांगल वाटत. ओवी जातं बायका धान्य दळण्याचा आवाज सर्व एकत्र चांगल वाटत. घरोघरी पूर्वी असा आवाज ऐकू येत असे.

आता आता गिरणीतून वीज याचा पट्टा च्या साह्याने ज्वारी गहू हरबरा चं पीठ भाजणी गिरणी तून दळून आणतात.

हल्ली पिठी साखर पण गिरणीतून दळून आणतात. गिरणी पण दगडी पाळ दोन एकावर एक असतात. पट्टा याचा आवाज पट पट पट पट असा येतच असतो.दळलेल पीठ गरम असते डबे धरतांना डबा गरम लागतो. मी खूप वेळा गिरणीत धान्य दळून आणायला गेले आहे. व जात वर पण पिठी साखर मेतकुट करायला मुहूर्ता ला पण बसले आहे.
घरोघरी जात व गिरणी याचा उपयोग करतात.हल्ली छोटी पिठाची गिरणी घरात वापराव्या करता बाजारात मिळते.

घरोघरी गिरणी तून धान्य दळून आणतात.

grindingstone

%d bloggers like this: