आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी 10, 2012

स्त्रियांचे राहणीमान

राहणीमान : स्त्रिया बायका पूर्वी कपाळी मेणावर मोठ्ठ लाल कुंकू लावतं असतं. काष्टा घालून नऊवारी लुगड नेसत असतं. धारवाडी खणाची चोळी घालतं. कानात. मोत्याचा सात मोती असलेल्या कुड्या घालत.खोफा अंबाडा मध्ये सोन्याचं फूल घालतं काळे मणी असलेले दोन वाट्या सोन्याचा असलेले सोन्या मध्ये मंगळसुत्र घालतं.

मोहनमाळ चिंचपेटी सोन्या ची घालत. पायाच्या बोटा मध्ये जोडवी घालत. नाकातं मोत्याची नथ घालत. हातातं काचेच्या बांगड्या व पाटल्या गोठ बांगड्या सोन्याचे तोडे सर्रास रोज कंबरपट्टा घालतं.

हाताच्या बोटामध्ये अंगठी वापरत सोन्याचावाक्या घालण्याची पध्दत आहे. बायका घालतं असत.

नंतर सहावारी साडी नेसायची पध्दत आली.कुंकू, गंध, किंवा टिकली लावायची पध्दत आली काचेच्या बांगड्या पाटल्या बागंड्या सोन्याचा घालत. काळे मणी सोन्याची दोन वाटी असलेले मंगळसूत्र घालतातच.

पायाच्या बोटामध्ये जोडवी घालतात. पायात चांदीच्या साखळ्या घालण्याची पध्दत आली आहे.

छल्ला हल्ली वापरतात. अंगठी हाताच्या बोटं मध्ये घालतात केसाचे दोन वेण्या किंवा एक वेणी रिबिनी लावून घालायची पध्दत असे.

आता आता ड्रेस वापरतात. केस मोकळे ठेवण्याची पध्दत आली आहे.आता ही बायका पाटल्या गोठ बांगड्या तोडे वाक्या नथ चमकी वापरतात.

घरोघरी कुंकू पायातील जोडवी हातातील काचेच्या बांगड्या अंगठी चमकी घालून सहावारी साडी लांब हाताचे पोलक पदर खोचून बायका सर्रास घरात व बाहेर फिरतांना वावरतात.

सोन शरीरावर अंगावर घातल्यामुळे पूर्वी तजेल राहत असे. हल्ली कामावर नोकरी वर बायका जातात. त्यामुळे एवढ रोज सोन वापरत नाहीत. मात्र सणावाराला अजून ही लग्नात बायका सोन याचा वापर करतात.

घरोघरी थोड तरी सोन वापरून बायका राहतात.

रांगोळी

%d bloggers like this: