आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी 14, 2012

बाजरीचा भात

स्वस्ति शालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर उत्तरायण हेमंतऋतु नक्षत्र उत्तरा शनिवार पौष कृष्णपक्ष १४ जानेवारी (१)२०१२ ला भोगी आहे. यंदा भोगी १४ (१)जानेवारी ला आली आहे.

संक्रात १५ (१)जानेवारी ला आहे.

भोगीला बाजरी ची भाकरी तीळ लावून करतात.मी बाजरीचा भात केलेला आहे.
बाजरीचा चा भात : आपल्याला हवी तेवढी बाजरी घ्यावी. बाजरीला पाण्याचा हात लावावा. अर्धा तास भिजत ठेवावी पूर्वी उखळ मुसळ खलबत्ता कांडत असतं

सडून घेत बारीक करत असतं मी मिस्कर मधून बारीक करून घेतली. कोंड्या सगट
ठेवावी. गरम पाणी करावे.पातेल्यात तेलाची फोडणी मोहरी घालून करावी. फोडणी मध्ये बाजरी बारीक केलेली घालून परतावी. बाजरी मध्ये गरम पाणी घालावे.पाणी व बाजरी मध्ये मीठ हळद हिंग थोड तिखट तीळ याचा कूट व अख्खे कच्चे सेंगदाणे घालावे. छान शिजवू ध्यावे. परत मोहरी व तेल हिरवी लाल मिरची घालून फोडणी करून बाजरी च्या भातावर घालावी. मुगाच्या उसळी बरोबर बाजरी चा भात खावा बाजरी चा भात व उसळ खाण्यास खूपच गोड लागतो.>

घरोघरी बाजरी चा भात करतात.

DSCF2212  DSCF2213

मुगाची उसळ                                        बाजरीचा भात

%d bloggers like this: