मी कसा ब्लॉग तयार करते?
ॐ
मी कसा ब्लॉग तयार करते:
मी प्रथम गूगल ट्रानस्लीटरेशन वर जाते.
तेथे मराठी, संस्कृत, हिंदी, गुजराथी अशा सर्व भाषा असतात.
मी संस्कृत वर जाते. ॐ लिहिते.
मग मराठी भाषा निवडते, इंग्रजी तून मराठी स्पेलिंग करते (फोनेटिक इंग्रजी).
सर्व लिखाण झाल्यावर सिलेक्ट ऑल करते. कॉपी करते. हॉटमेल वर जाते. तेथे पेस्ट करते.
टु वर जाते. इमेल वर माझ्या ब्लॉग चा पत्ता घालते. सेंड करते.
सर्वांना मराठी वाचायला मिळते.
सर्व संगणक मध्ये गुगल प्लस ची सोय आहे.
फक्त भाषा प्रमाणे आपण स्पेलींग करून तयार करावे लागते. एवढच
सराव प्रमाणे मराठी स्पेलींग करण्यास वेळ लागतो.
सराव घाला की लगेच लगेच स्पेलींग तयार होतात.
रस्व दीर्घ पाहिजे असल्यास ट्रानस्लीटरेशन वर पोपप पट्टी येते त्यावर क्लिक करणे. म्हणजे रस्व दीर्घ पण बरोबर येते.
अशा प्रमाणे लिखाण करून ब्लॉग तयार करू शकतो.