आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी 29, 2012

वांग मटार भाजी

वांग मटार भाजी: मटार सोलून मटार काढून घ्यावेत. वांगी देठासगट लांब लांब चिरावीत. मटार वांगी एकत्र करून धुवावित. तेल मोहरी याची फोडणी करावी. फोडणी मध्ये मटार वांगी घालावित. थोड पाणी घालून झाकन ठेवून भाजी शिजू द्यावी. वांग मटार शिजल्यावर भाजी मध्ये हळद हिंग मीठ लाल तिखट भाजलेले तिळकुट सुक किसलेले खोबर घालावे.

वांग मटार मसाला परत पाण्यात शिजवु ध्यावे.छान वाफ आणावी. पातेल्याला वांग मटार मसाला लागणार नाही याची काळजी घ्यावी. वांग मटार याची भाजी बाजरी च्या भाकरी बरोबर चांगली लागते.

एरवी ज्वारी ची भाकरी किंवा पोळी बरोबर पण वांग मटार भाजी चांगली खान्यास चांगली लागते.

घरोघरी वांग मटार भाजी व भाकरी अथवा पोळी बरोबर खातात.

घरोघरी वांग मटार भाजी करतात.

DSCF2234 DSCF0291

%d bloggers like this: