आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी 31, 2012

मेथी व कांदा भाजी

मेथी व कांदा भाजी: मेथी ची जुडी पेंडी मोकळी करावी. थोड देठासगट मेथी ची पान घ्यावीत. मेथी निवडुन झाल्यावर निवडलेली मेथी धुवून घ्यावी.बारीक चिरावी. मी विळीने भाजी चिरते.

एक कांदा बारीक चिरावा.मेथिची भाजी व कांदा वेगवेगळे ठेवावेत. तेल व मोहरी ची फोडणी करावी.

प्रथम कांदा फोडणीत घालून परतून घ्यावा.मेथी चिरलेली कांदा मध्ये घालावी परत कांदा व मेथी परतून घ्यावी.मेथी कांदा मध्ये हळद तिखट मिठ हिंग घालावे. कळत न कळत पाणी घालावे.मेथी व कांदा मसाला घातलेले पाणी थोड घातलेले हलवून वाफ आणावी.

छान मेथी व कांदा भाजी तयार होते.

भाकरी पोळी बरोबर खान्यास द्यावी.

घरोघरी मेथी व कांदा भाजी तयार करतात खातात.

घरोघरी मेथी व कांदा भाजी करतात.

DSCF2237  DSCF1222

%d bloggers like this: