आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी, 2012

२०१२ साल लिप वर्ष

२०१२ साल लिप वर्ष आहे आल आहे.फेब्रुवारी महिना २९ दिवस चा आहे.
२९ फेब्रुवारी ला माजी पतंप्रधान मोरारजी देसाई यांचा वाढदिवस असतो.

Morarji_Desai_1978  DSCF1597

पंचामृत

पंचामृत : कच्चे शेंगदाने दहा पंधरा घेतले. सुक खोबर विळीने पापळ भाग कापून दहाबारा भाग घेतले.
पेटत्या ग्यास वर पातेले ठेवले पातेल्या मध्ये तेल मोहरीची फोडणी केली. फोडणी झाल्या नंतर कच्चे शेंगदाने खोबर फोडणीत घातले. ग्लास भर पाणी घातले. फोडणी कच्चे शेंगदाने खोबर ह्यात कडीपत्ता धने जिरे पावडर हिरवी मिरची हळद मीठ तीळकुट चिंच याचे बोळकळ गूळ टाकला.अटवू दिले तीळ कूट टाकला कोणी कोणी शेंगदाने कूट टाकतात. परत फोडणी शेंगदाने खोबर मसाला शिजवू दिला खरं तर फोडणी शेंगदाने खोबर चिंच गूळ धणे जिरे पावडर घालून शिजवितात अटवितात. नुसत्या पाण्याला चिंच गूळ हिरवी मिरची पूर्वी लाल मिरची असे. मीठ याचच पाण्याला चव येत असे.मिळून येण्या करता
तीळकूट घालतात.किंवा शेंगदाणे कूट घालतात. मी कच्चे शेंगदाणे हिंग खोबर याचे काप चिंच गूळ हिरवी मिरची तीळकूट कडीपत्ता मीठ हळद जिरे पावडर धणे पावडर तीळकूट तेला ची मोहरी ची फोडणी पाणी सर्व एकत्र करून अटवून शिजवून पंचामृत केले आहे.

घरोघरी पंचामृत करतात.

DSCF2326

डाळ याची चटणी

                                                           ॐ
डाळ याची चटणी :चिवडातल डाळ असतं त्याची चटणी :एक वाटी डाळ घेतले.मिस्कर मध्ये प्रथम
एक चमचा मोहरी घातली मेथीचे दाणे दहा बारा घातले.ते प्रथम बारीक करून घेतले.डाळ मोहरी मेथीचे
दाणे बारीक केल्या मध्ये डाळ घातले.छोटा चमचा हिंग लाल तिखट चमचा हून कमी मीठ मिस्कर मध्ये
घातले.मोहरी मेथी डाळ लाल तिखट हिंग हळद मीठ परत सर्व एकत्र मिस्कर मधून बारीक केले.डाळ चटणी
तयार केली.झाली.ही चटणी कच्च तेल किंवा दही घालून पोळी भाकरी बरोबर खातात.तसेच तूप भात डाळ चटणी
घालून पण खातात.घरोघरी डाळ मोहरी मेथी हळद हिंग लाल तिखट मीठ घालून डाळ चटणी करतात.

                                    DSCF2322

मराठी भाषा दिन


ज्ञानपीठ कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी ला वाढदिवस असतो.
मारवा पुस्तक ४ सप्टेंबर १९९९ मधील मारवा कविता १ आहे.

मारवा

उषेत तेव्हा
ताम्र नभातुन
सुवर्ण किरणावली.

सांध्य घनातुन
झिरपत आता
विश्र्वंभर सावली.

उषेत होते
जागवणारे
भूपालीचे स्वर.

मृदुल मारवा
आज बांधतो
मला विसावाघर.

DSCF2323

२७ फेब्रुवारी मराठी भाषा दिन आहे.

लाल टोमाटो

                                                   ॐ
लाल टोमाटो :लाल टमाटो चार घेतले.धुतले. मध्यम कापले चिरले.
मिस्कर मध्ये लाल टमाटो घातले मीठ लाल तिखट हिंग गूळ याचा खडा घातला
पाणी अजिबात बारीक होण्या करता कळत नळत घातले.चांगले लाल टमाटो लाल तिखट
मीठ हिंग गूळ एकत्र गाळ केले. तेल मोहरी कांही न घालतां पातेल्यात पेटत्या ग्यास वर शिजविले.
उकळून अटविले घट्ट फार केले नाही.पण पातळ राहील असे अटविले.लाल टमाटो लाल तिखट मीठ हिंग
गूळ याची चटणी शिजवून केलीं.ह्यात तीळ शेंगदाने कूट खोबर कांही घातलेले नाही. सॉस सारखे सारखं केले.
घरोघरी लाल टमाटो लाल तिखट मीठ हिंग गूळ याची शिजवून चटणी करतात.

                                  DSCF2321

भगर

                                                                 ॐ
भगर : भगर लाचं वऱ्याचे तांदूळ म्हणतात.उपवास करतांना भगर शिजवून उपवास करतात.
आपल्याला हवी तेवढी भगर घ्यावयाची घेणे. प्रथम भगर धुवून घ्यावी घेणे.पातेले पेटविल्या ग्यास वर ठेवणे
ठेवून पातेल्यात तूप टाकणे मी तूप टाकले त्यात जिरे टाकले टाकणे.धुतलेली भगर तूप जिरे फोडणीत टाकली टाकणे.
अंदाजाने पाणी टाकले टाकणे तूप जिरे भगर पाणी ह्यात मीठ लाल तिखट टाकले.कोणी हिरवी मिरची टाकतात.लाल
तिखट चव व रंग चांगला येतो.झाकण ठेवून शिजविणे उतू जाणार नाही याची काळजी घेणे. तूप जिरे भर मीठ लाल तिखट
सर्व छान शिजते.शेंगदाने भाजलेले साल काढलेले थोडे घेतले घेणे मिस्कर मध्ये शेंगदाने मीठ लाल तिखट चिंच चं चिंचेचे कोवळे कोवळं
पाणी सर्व एकत्र करून मिस्कर मध्ये गाळ होतो करणे.परत दुसऱ्या पातेल्यात तूप जिरे ह्याची फोडणी केली करणे मिस्कर मधील
शेंगदाने मीठ लाल तिखट पाणी चिंच सर्व एकत्र केलेले तूप जिरे फोडणीत टाकले टाकणे.शेंगदाने आमटी ला उकळी दिली.गरम छान झाली.
भगर व शेंगदाने आमटी तयार केली झाली.घरोघरी भगर शेंगदाने आमटी तयार करतात.

                                            DSCF2318

सातूचं पीठ

                                                        ॐ
सातूचं पीठ: दोन बाऊल गहू घेतले एक बाऊल डाळ (चिवडा चं असत ते.)घेतले.गहुला प्रथम पाणी लावून ठेवले.
अर्धा तास नंतर गहू भाजून घेतले.गहू उडायला लागले की गहू भाजणे बंद केले.डाळ कच्च च ठेवले जिरे थोडे
भाजून घेतले. गहू भाजलेले कच्च डाळ भाजलेले जिरे एकत्र केले.गार झाल्या नंतर सर्व एकत्र गहू डाळ जिरे मिस्कर
मधून दळून काढले.छान बारीक सातूच पीठ तयार झाले.पीठ गार झाल्या नंतर एका बाऊल मध्ये तापवलेले गार दुध घेतले.
दुधात अंदाजाने गूळ किसून घातला.दुध गूळ एकत्र केले त्यात पातळ राहील असे सातूचे पीठ घातले.दुध गूळ सातूचे पीठ 30
एकत्र बाऊल मध्ये केले.व खाण्यास दिले.पूर्वी बोटानेच सातूचे पीठ दुध गूळ सातूचे एकत्र केलेले बोटानेच खात असत.
घरोघरी सातूचे पीठ तयार करतात.मी स्वत: सर्व सातूचे भाजून दुध गूळ घालून सातूचे पीठ तयार केले आहे.

                                    DSCF2314          DSCF2316

ताकातील हिरवी मिरची

                                                              ॐ
ताकातील हिरवी मिरची: आपल्याला हव्या तेवढ्या हिरव्या मिरच्या घ्यावात.
मी पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्या. मिरची मध्ये कापून मिरचीचे लहान भाग
केले. तेलाची मोहरीची फोडणी केली. फोडणी मध्ये पाच सहा मेथी चे दाणे टाकले.
फोडणीत मेथीचे दाणे तांबूस केले.हिरवी चिरलेली मिरची फोडणीत टाकली.अर्धा वाटी
ताक टाकले. हळद हिंग मीठ ताक व हिरवी मिरचीत टाकले.हिरवी मिरची मेथी हळद हिंग
मीठ ताक शिजविले अटविले.मिरचीत ताक व सर्व मसाला चांगला शिजला ताकामुळे मिरची तिखट
लागत नाही.चटणी म्हणून खाण्यास करावी द्यावी.मी हरवी मिरची मेथी हळद हिंग मीठ ताक असे सर्व शिजवून
ताकातील हिरवी मिरची केली आहे.घरोघरी ताकातील हिरवी मिरची करतात.

                                           DSCF2312

पुदिना चटणी


पुदिना चटणी :प्रथम नारळ वाहून (फोडून) घ्यावे अर्धा नारळ खोवून घ्यावे. मी बसून
अर्धा नारळ दोन्ही हातात धरून विळी च्या खोवणी वर खोऊन घेतले.पुदिना ची पान देठा
सगट पंचवीस तीस घेतली.अंदाजाने पेंडी करायची.पुदिना पानाला वास खूप असतो.अंदाजाने
घ्यावी घेणे.हिरवी मिरची दोन किंवा तीन घेणे मी दोन मिरच्या घेतल्या आलं थोड तुकडा घेतला.
आलं पण तिखट असते.थोडसे थोडसं पुरते.पुरतं मीठ एक चमचा घ्यावे मी अंदाजाने घेतले आहे.
लिंबू अर्धा हून कमी पिळणे. मी प्रथम मिक्सर मध्ये हिरवी मिरची दोन आलं तुकडा मीठ पुदिना बारीक करून
घेतले.नंतर त्यातच खोवलेले खोबर अर्धा हून कमी लिंबू पिळून घातले कळत न कळत पाणी घातले.
परत हिरवी मिरची आलं मीठ पुदिनालिंबू सर्व एकत्र परत मिस्कर मधून बारीक करून घेतले.हळद टाळली नाही.
पुदिना चा हिरवा रंग चांगला येतो व पुदिना ची चव येते. तेल व मोहरी याची फोडणी करून गार केली पुदिना
चटणी मध्ये घातली.एकसारखी चमचा याने परत हलविली.ओळ खोबर पुदिना लिंबू हिरवी मिरची आलं मीठ याची पुदिना
चटणी तयार केली झाली मी तयार पुदिना चटणी केली.घरोघरी पुदिना चटणी करतात.

  DSCF2301   DSCF2299

माताजीं

                                               ॐ
                     SRI AUROBINDO ASHRAM PONDICHERRY
                  श्री माताजीं चां २१ फेब्रुवारी ला वाढदिवस असतो
                      माताजीं नीं नवीन वर्ष व सही देऊन
                      शुभेच्छा व आशीर्वाद दिले आहेतं
                       माताजीं नां माझा नमस्कार !

                  DSCF2302DSCF2305

                    DSCF2309DSCF1575

महाशिवरात्रि

स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर उत्तरायण शिशिर ऋतु
नक्षत्र श्रवण रास मकर माघ कृष्णपक्ष १४ सोमवार महाशिवरात्रि शिवरात्र शिवपूजन आहे. तसेच तारीख दिनांक २० फेब्रुवारी(२) २०१२ सोमवार आहे. महादेव याची पूजा व उपवास करतात.

तेरावे ज्योतिर्लिंग : भारतात भगवान शंकराची बारा ज्योतिर्लिंगं आहेत. परंतु तेरावे तेरावं ज्योतिर्लिंग मॉरीशस मध्ये आहे. मॉरीशस मधील एक शिवमंदिर जगातील १३ वं ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिध्द आहे.

पृथ्वीच्या नकाशात ठिपक्या एवढं दिसणारं मॉरीशस हे एक नितांत रमणीय बेट आहे.या बेटाला ‘भूतलावरचं नंदनवन’ म्हणतात.या देशाला ‘मॉरीशस’ हे नाव का पडलं यामागे इतिहास आहे.

प्रभू रामचंद्राने ज्यावेळी रावणाचा पराभव केला त्यावेळी ‘मारिच ‘राक्षसाचे वंशज ‘द्वीप’ ‘व्दीप’ या बेटावर पळून आले,त्यामुळे या बेताला ‘मॉरीशस’ हे नाव पडलं पडले. हे बेट हिंदी महासागरांत आफ्रिके जवळ आहे.याची लांबी दक्षिणोत्तर ३९ मैल आहे.पूर्व -पश्र्चिम रुंदी २९ मैल आहे.एकूण क्षेत्रफळ ७१६ चौरस मैल आहे.शेती प्रधान देश आहे. मॉरीशस मध्ये भारतीय लोकांची संख्या खूप आहे. हे मंदिर गंगा तलावाच्या काठी आहे.याला ‘परी तलाव’ पण म्हणतात.

भारतात रामेश्र्वर केदारनाथ देवळांना महत्व आहे तसेच १३ तेरावं ज्योतिर्लिंग मॉरीशस मंदिर याला महत्व आहे.

घरातं देवातं महादेव नंदी असतो त्याची पूजा केली तरी घर बसल्या महादेव याची मनोभावे पूजा करतात होते.

घरोघरी महादेव व नंदी देवातं पूजेत असतात.

तेरावे ज्योतिर्लिंग : या मंदिराचा संबंध एका चमत्कारी घटनेशी निगडीत आहे.या मंदिराच्या प्रतिष्ठापना समारोहाच्या पाचव्या दिवशीच म्हणजे २ मार्च १९८९ रोजी सायंकाळी पाचच्या ५ सुमारास अचानक आकाशांत काळे ढग जमले, विजा कडाडू लागल्या आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्याचा वेळी मंदिराच्या घुमटावर एक दिव्य ज्योती अवतरली आणि तिने त्रिशूळा द्वारे शिवलिंगात प्रवेश केला.हे सगळ
एका क्षणात घडलं.त्यावेळी तेथील कमांडिंग ऑफिसर गाभाऱ्या जवळ महाज्योती प्रज्वलीत करीत होते.या प्रकारामुळे अचानक विद्दुतप्रवाह खंडित झाला. परंतु २१ बल्ब झगमगू लागले. जनसमुदाय एक आनंद मिश्रित गंभीर लहर पसरली.त्रिशूळातून पवित्र जल वाहू लागलं. आणि बाजूलाच असलेल्या मखमली कपड्यांवर डाव्या पायाचं
निशाण उमटलं. काही वेळाने त्या पदचिन्हाचं रुपांतर गजमुखात झालं. पाऊस सतत एक तास पडत राहिला.अभिषेक च्या वेळी घडलेली ही घटना अनेक लोकांनी पाहिली.
आठव्या दिवशी गणेश पूजनाच्या वेळेश गाभाऱ्यातील देवतेने गणपती च रूप धारण केलं. शिवलिंगावर नाग व स्वस्तिकाचे चिन्ह उमटलं. असं हे चमत्कारपूर्ण मंदिर गंगा तलावाच्या काठी आहे.या तलावाला ‘परी तलाव’सुध्दा सुद्दा म्हटलं जातं.

DSCF2281

13th Jyotirling

सुबत्ता

सुबत्ता आणि समाधान: भारत देश शेती प्रधान देश आहे. पूर्वी एकत्र कुटुंब शेती असे घरातील आई (आजी) सर्व अधिकार पणे पाहतं असतं. मूले व सूना सासुबाई चं ऐकत असत. शेता मध्ये गारागोटी येत असत. प्रत्येक घराणं आमचे आंबे खावयाला या एक एक दिवस असे. टोपली च जवल ठेवत असत. पूर्वी दुकानात जाऊन लुगडे घेवयाची पध्दत नव्हती घरीच नवीन कपड्याचे कपड्याला नवा वास असतो. तसे येत माझ्या काकू आई त्यातील हवे त्या रंगाचे लुगडे जोडीने घेत असत. माझ्या आई पैठणी व काकू चा शालू डोळ्या पुढे आठवतो. वडिलांचे धोतर कोट पांढरी व काळी टोपी आठवते. माझी आई नवरात्राचे उपवास करत सर्वांना भगर देत असत. पूर्वी ज्वारीच्या लाह्या असत. मोठ्ठ पातेले भर असायचे काकू सर्वांना वाटी वाटी देत असे. सुबत्ता त्या मनाने कमी होती पण लोक समाधानी असायचे.

पूर्वी घरात बाज असयाच्या सतरंजी घोंगडी हिरावळ सोलापूर चादर असायचे घराण्यात कोणी युनरसिटीत पहिला आला तर गावात पेढे वाटत असत.नातू मुलगा अमेरिकेला जात असेल तर गावातील शेतावर काम करणारे मुंबई विमानातळा वर येत असतं. मार्केट मध्ये भाजीवाले फलवाले छान राहतात.नळ दुरस्ती वाले लाईट दुरस्ती वाले मोटर सायकल फटफटी नी येतात. तसा पैसा असतो त्यांचा कडे. काम करतात. धून भांडी वाल्या बायका छान साडी नेसून हातात बांगड्या कपाळी कुंकू नाकात चमकी घालतात. कष्ट करतात, पैसा कमावून समाधानी राहायचा प्रयत्न असतो. सगळी कडे ताशे राहणीमान सुधारत आहे, हळू हळू सुबत्ता पसरत आहे.

सुबत्ते बरोबर समाधानी स्वभाव अत्यंत गरजेचा आणि ही सोपी व साधी गोष्ट लक्ष्यात आल्या नंतरच खरी प्रगती साध्य होते.

मनाचे समाधान हीच खरी सुबत्ता आहे.

मकाचा चिवडा

                                                                 ॐ
मकाचा चिवडा : मका याचे पातळ पोहे मिळतात.१५ रुपये पावशेर आपल्याला हवे तवढे घ्यावेत.
पेटत्या ग्यास वर कढई ठेवून तळण्यासाठी तेल भरपूर कढई घालावे.तेल चांगले तापवावे.तापले की पाहण्यासाठी
माकाचा एक पोहा टाकावा तापलेले तेल समजल्यावर थोडे थोडे मका याचे पोहे टाकून झाऱ्याने काढून पातेल्यात घालावे.
भरपूर आपल्याला हवे तेवढे मका याचे पोहे तळून झाल्यावर त्या तेलात कच्चे शेंगदाणे तळून घ्यावे.डाळ टाकू नये
कडीपत्ता तेलात तळून घ्यावा.शेंगदाणे कडीपत्ता मका यांचे पोहे तळलेले काढलेल्या पातेल्यात एकत्र करावे.त्यात
सर्व मका पोहे तळलेले पोह्यामध्ये तिखट मीठ हळद हिंग घालावे बाकी कांही मसाला लागत नाही.
मका याचे तळलेले पोहे तळलेले शेंगदाने तळलेला कडीपत्ता तिखट मीठ हळद हिंग सर्व डावाने न हलवता पातेले
खाली वर करून हलवावे म्हणजे मका याचे तळलेले पोहे तुटत नाही.गार गरम कसे ही

मका याचा पोहे तळलेला चिवडा
डिश मध्ये खाण्यास द्यावा. घरोघरी मका याचे पोहे तळलेला चिवडा घरोघरी करतात.

                               DSCF2296

                            DSCF2297

मसूर ची उसळ

                                                      ॐ
मसूर ची उसळ : आपल्याला हवी हवे तवढे मसूर घेऊन धुऊन घावेत.मोड न आलेले मसूर आहेत.
डाळच घावे.कुकर मध्ये धुतलेले मसूर घालावे भरपूर पाणी वाटी मसूर असले तर तीन वाटी पाणी घालावे
चार पाच शीट्या द्याव्यात. कुकर गार घाल्यावर कुकर चे झाकण काढून ग्यास पेटलेला वर पातेले ठेवावे.
तेल मोहरी कडीपत्ता घालावा. फोडणी झाल्यावर शिजलेले मसूर डाळ फोडणीत टाकावी.हळद हिंग लाल तिखट
मीठ घालावे.परत सर्व मसूर डाळ गरम करावी.छान शिजते.मसूर डाळ कुकर मध्ये शिजतांना कच्चे शेंगदाणे घालावे
मी घातले आहेत पण ते दिसत नाहीत.कच्चे शेंगदाणे शिजलेले चांगले लागतात.मसूर डाळ व कच्चे शेंगदाने याची
मासालां घालून केलेली उसळ चांगली लागते. घरोघरी मास्य्र डाळ व कच्चे शेगदाणे याची उसळ करतात.

                                                    DSCF2294

लाल भोपळा ची भाजी

                                                                    ॐ
लाल भोपळा ची भाजी : लाल भोपळा मध्ये बिया असतात.त्या काढून घ्यावात.उन्हात वाळवून
सोलून खाव्यात.भोपळा धुवून घ्यावा.साल काढून मोठ्या मोठ्या फोडी कराव्यात.पातेले पेटलेल्या
ग्यास वर ठेवून पातेल्यात सादूक तूप भरपूर घालावे जिरे घालावे तूप व जीरे याची फोडणी झाल्यावर
चिरलेला लाल भोपळा तूप व जीरे ह्या फोडणीत घालावे.दोन वाट्या पाणी घालावे. दोन हिरव्या माराच्या घालाव्यात.
साखर गूळ कांही घालू नये लाल भोपळा ला गोड चव असते.पाणी व लाल भोपळा शिजल्यावर त्यात मीठ व भाजलेले
साल काढलेले शेंगदाणे याचा कूट दोन चमचे घालावा.परत पाणी लाल भोपळा शेंगदाणे याचा कूट मिरची मीठ सर्व
परत थोड्यावेळ शिजवू ध्यावे.भाजी शिजतांना पातेल्यावर झाकणं ठेवावे वाफ बाहेर जात नाही उतू जात नाही याची
पण काळजी घ्यावी. लाल भोपळा तूप जीरे हिरवी मिरची मीठ शेंगदाणे कूट सर्व एकत्र लाल भोपळा याची तयार झाली.
लाल भोपळा ची भाजी उपवास याला पण चालते.घरोघरी लाल भोपळा याची करतात.

                                             DSCF2293                  DSCF2284                                DSCF2285

श्रीरामदास नवमी

स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर उत्तरायण शिशिरऋतु
नक्षत्र ज्येष्ठा रास धनु माघ कृष्णपक्ष नवमी व दशमी एक दिवस आली आहे.
नवमी ९ गुरुवार श्रीरामदास नवमी आहे. तसेच दिनांक तारीख १६ फेब्रुवारी (२) २०१२
आहे.

|| श्री हरि : ||
श्रीसमर्थ रामदासस्वामीविरचित
मनाचे श्लोक व करुनाष्टके
( मराठी )

||श्री राम ||
गणाधीश जो सर्वां गुणांचा |
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा |
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा |
गमूं पंथ आनंत या राघवाचा ||१||

मना सज्जना भक्तिपंथेचि जावें |
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें |
जनीं निंद्द तें सर्व सोडूनि द्दावें |
जनीं वंद्द तें सर्व भावें करावे ||२||

प्रभाते मनी राम चिंतीत जावा |
पुढें वैखरीं राम आधी वदावा |
सदाचार हा थोर सांडू नये तो |
जनीं तोचि तो मानवीं धन्य होतो ||३||

मना वासना दुष्ट कामा नये रे |
मना सर्वथा पापबुध्दि नको रे |
मना धर्मता नीति सोडूं नको हो |
मना अंतरी सार विचार राहो ||४||

DSCF2288

चाकवत ची भाजी

                                                           ॐ
चाकवत ची भाजी : चाकवत देठा सगट निवडून घ्यावा.चालणीत निवडलेला चाकवत घालून पाण्याने पाण्यानं
धुवून घ्यावा.मिक्सर मध्ये निवडलेला चाकवत थोड पाणी दोन वाटी पाणी घालावे.आंबट दही घालावे.दोन चमचे
हरबरा डाळीचे पीठ घालावे.चाकवत हरबरा डाळीचे पीठ दही पाणी सर्व एकत्र पातळ व बारीक करावे.तेलाची व मोहरीची
फोडणी करावी प्रथम कच्चे शेंगदाने तांबूस करून घ्यावेत मी घातले आहेत पण ते भाजीत दिसत नाही.नंतर चाकवत
सर्व केलेले मिश्रण फोडणी व शेंगदाने ह्यात घालावे.त्यात तिखट मीठ हळद हिंग घालावे.वाटल्यास फोडणीत लसून घालावा.
मी घातला नाही.सर्व चाकवत मिश्रण हलवावे पातेल्याला लागत नाही उकळी एई पर्यंत शिजवावे.चाकवत ताकातील भाजी पोळी
भाकरी बरोबर खाण्यास द्यावी.
घरोघरी चाकवत याची भाजी करतात.

                                                      DSCF2283

                         DSCF2286

लोखंड

ॐ 

लोखंड : लोखंड याचा रंग तांबूस काळसर असतो.लोखंड याचा उपयोग घर बांधतांना लोखंडी सळी चा उपयोग करतात. खिडकी चे गज करून लोखंडी सळी लावतात.गेट च दार पण लोखंड सळी नेच करतात.सुरी विळी फळ भाजी कापण्याकरता लोखंड चं वापरतात आता आता स्टील च पॉलीस देतात.स्वंयपाक याची लोखंड वर स्टील पॉलीस असते.तीवई पूर्ण लोखंड याची मिळते. हल्ली लोखंड स्टील पॉलीस ची तीवई मिळतात. खुर्च्या पण लोखंड रंगवून मिळतात.चालविणार वाहन सायकल गाडी बस रेल्वे पण लोखंड बोट विमान पत्राला पॉलीस करून रंगवून तयार करतात.इलेट्रीक वस्तू लोखंड ह्यापासून बनवतात. झाड टांगण्या करता लोखंड याचा आधार घेतात.पंखे फ्रिज पण लोखंड याचे रंगवुन वापर करतात. काही ठिकाणी लोखंड याचा शोभे चा वस्तु तयार करतात घोडा हत्ती रेल्वे गाडी बैलगाडी.मानसांचे पूतळे पण लोखंड करून स्टील पॉलीस करतात. तसेच कला कौशल्य म्हणून लोखंड याचे झाड तयार करतात. 

लोखंडी झाड असलेतरी तया लोखंडी झाडा ला मूळ फांद्या देठा सगट पान आहेत. आणि ताठ उभे आहे. पसरलेले लोखंडी झाड आहे.त्यामुळे लोखंडी झाड घरातं शोभून दिसते.

आयुष्याचे शंभर वर्ष

आयुष्याचे शंभर वर्ष
आयुष्याचे शंभर वर्ष लाभले
मानवी देहाचे सार्थक झाले आणि केले
आयुष्य बाल पणाचे सुखाचे गेले
सासरी माहेरी अंगणी खेळले
साथीदारा बरोबर सर्व तऱ्हेचे दिवस घालविले रमविले
कधी वस्त्रे होती धड नेसायला तर कधी दांडीची लुगडी पांघरायला
मुले नातवंडे पतवंडे सारी लाभली तिला गुणाची
तिची ही माया त्या लेकरावरती अति प्रेमाची
उंची भरजरी वस्त्रे ही नात सुनांनी घेतली
दर्शनासाठी तिने नेसली आंनदाने आशीर्वाद दिले
जीवन मान अपमान चे सुख दु:खा चे गेले
त्याचे उच्चारण मात्र कधी नाही केले
देह मात्र थकला थकला सोशीकपणा च गुण आपला केला
देवाशी मागे एकच मागणे देह आत्मा सैदेव सुंदर व्हावा
तुझाच आशीर्वादाने

सौ सुनीती रे देशपांडे

दही पोहे

                                                           ॐ
दही पोहे : प्रथम पोहे चाळणी घेऊन चाळून घ्यावेत.पोहे पातेल्यात काढून पाण्यानं धुवून काढावे.
थोडे भिजल्यावर पोहे मध्ये हिरवी कुटलेली मिरची मीठ हळद हिंग टाकावे. दही पोहे ओले होई पर्यंत
भरपूर टाकावे. तेल मोहरी याची फोडणी करावी.फोडणी गार करावी.नाहीतर पोहे गरम होतात.फोडणी
गार घाल्यावर दही पोहे मध्ये घालावी.फोडणी दहीपोहे एक सारखे डावाने चमचा ने हलवावे.डिश मध्ये
खाण्यास द्यावे.
घरोघरी दही पोहे करतात.

                                              DSCF2267

आरोग्य

                                                               ॐ
आरोग्य : नियमित जेवण करायला हवे.स्वंयपाकात साखर गुळ याचा वापर करु नये. गोड रोज फार खावू नये
चाहा कॉफीत साखर असते तेवढी बसं होते.गोड पदार्थ आठवड्यात एकदा खाण्यास हरकत नाही.पाले भाज्या जास्त
प्रमाणात खाव्यात. कोबी फ्लावर कमी खावा.बीट काकडी गाजर भरपूर खावे.आठवड्यात एकदा वेगवेगळ्या भाज्या खाव्यात.
मुग चवळी हिरवे पांढरे हरबरे पाण्यात भिजवून मोड न आणता तसेच कुकर मध्ये पाचं सहा शिट्या देवून मीठ तिखट हळद हिंग
घालून उसळी सारखे करून खावे.रोज एक फळ खावे.संत्र केळ पपई ऋतू प्रमाणे जसे फळ मिळेल तसे खावे.ताका पेक्षा दुध प्यावे .
कधी पोळी कधी भाकरी करावी आंबलेले ईडली डोसा खावू नये नारळ खराब झालेले खावू नये.शेंगदाने दाणे तीळ वापरावे पदार्थामध्ये
लवंग दालचीनी मिरे रोज वापरू नये.मसाला फार वापरू नये.
नियमित झोप फिरणे असावे.वर्तमानपत्र नियमित वाचावे.रेडीओ वरची गाणी ऐकावी.फार सिरीयल पाहत बसू नये.एखादी पहावी.
बातम्या ऐकाव्यात.फोन करून नातेवाईक यांना आज आपण काय केले ते सांगावे.कोणतं ही लिखान रोज करावे.वहीत श्र्लोक मंत्र लिहून
काढावे.रोज सकाळ संध्याकाळ रामरक्षा महावी गणपती स्तोत्र म्हणावं.महिनात एकदा डॉक्टर ला तब्येत दाखवावी.

                                          DSCF2270

हिरवे टमाटो

                                                     ॐ
हिरवे टमाटो : हिरवे टमाटो ची चिरून हरबरा डाळी चे पीठ लावून भाजी करता.
मी हिरवे टमाटो ची चटणी केली आहे.प्रथम हिरवे टमाटो धुवून घ्यावेत.
जाडसर चिरावे.तेलावर परतून काढावे. तीळ भाजलेले बारीक मिस्कर मधून करून घ्यावेत.
गार झालेले टमाटो तीळ कूटात टाकावे. त्याबरोबर आवडी प्रमाणे हिरवी मिरची मीठ टाकावे.
परत सर्व मिस्कर मध्ये बारीक करावे.काचेच्या सटात काढावे काढावी.परत तेल मोहरी ची फोडणी
करावी.फोडणी गार करून हिरव्या टमाटो चटणी त घालावी.हळद टाकू नये.टमाटो चा हिरवा रंग चांगला
दिसतो.हिरव्या टमाटो त तीळ कूट असल्यामुळे हिरव्या टमाटो ला तिळाची चव चांगली लागते.
घरोघरी हिरवे टमाटो वापरतात.हिरव्या टमाटो ची भाजी चटणी करतात.

                                          DSCF2274                                                                     DSCF2269

शेपूची भाजी

                                                          ॐ
शेपु ची भाजी : मुगाची डाळ सात आठ तास पाण्यात भिजत ठेवावी. शेपू देठ व थोड्या काड्या घेवून निवडावे.
शेपूची भाजी धुवून घ्यावी.नंतर चिरावी.तेलाची मोहरी घालून फोडणी करावी.फोडणी मध्ये भिजलेली मुगाची
पाणी काढून टाकून फोडणीत.टाकावी.मुगाची डाळ हलवून नंतर चिरलेला शेपू टाकावा.शिजण्याकरता थोड पाणी
टाकावे.वाफ आल्यावर हळद हिंग लाल तिखट मीठ टाकावे मुगाची डाळ शेपू घातलेला मसाला एकत्र हलवून परत
वाफ आणावी.परतलेली

भिजलेल्या मुगाच्या डाळीत हळद हिंग लाल तिखट मीठ कच्च तेल घालून कच्चीच खाण्यास चांगली लागते.

DSCF2268   DSCF2272

दही

                                                            ॐ
दही: दुपारी तीन साडेतीन वाजता चहा करतांना प्रथम आपल्याला हवं तेवढ दुध व दुधावर आलेली साय चीनी मातीच्या
बरणीत काढून घ्यावी.अर्धावाटी ताक किंवा दीड चमचा दही दूध व साय काढलेले त्यात घालावे.दुसरे दिवशी सकाळी सात आठ
वाजता त्या चे दही झालेले असते.थोड आंबट असते.आपण जसे विरजण लावतो तसे दही गोड आंबट असते.ताका करता दही
आंबट चांगले असते.
दही ह्यात साधे पाणी घालून ताक करावे.फ्रीज चे पाणी घालू नये.रवीने ताक करावे.दोन्ही हाताने मागेपुढे दही पाणी चांगले
घुसळले जाते.लोणी पण येते.ताक जेवतांना वाटीत वाढायची पद्दत पध्दत आहे.कोणी ताक मीठ लावून पितात.शेवटच्या
भातावर ताक दूध किंवा दही मीठ घालून खातात.ताका मध्ये साखर घालून लस्सी करतात.ताकात आलं हिंग मीठ घालून
पितात.कोणी ताकात हिरवी मिरची कुटून मीठ घालून पण ताक पितात.
दही पोहे पण करतात.पोहे पाण्यात भिजवून पाणी काढून टाकायचे पोह्या मध्ये दही मीठ हळद हिंग घालून तेलाची मोहरीची
फोडणी करून पोह्या मध्ये घालून दही पोहे करतात.
अशा प्रकारे दही तक याचा खाण्यासाठी दही ताक वापर घरोघरी करातात.
दही ताक घरोघरी खातातं.

DSCF2264  DSCF2265

माघ संकष्ट चतुर्थी

स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर उत्तरायण शिशिरऋतु नक्षत्र पूर्वा रास कन्या माघ कृष्णपक्ष संकष्ट चतुर्थी आहे. तसेच दिनांक तारीख १० फेब्रुवारी ( २ )२०१२ संकष्ट चतुर्थी आहे.कांही ठिकाणी शनिवार ११ फेब्रुवारी ( २ ) २०१२ तारीख दिनांक ला पण संकष्ट चतुर्थी आहे.

संकष्ट चतुर्थी आहे मी पेढे याचे मोदक केले आहेत. मैदा व ख्वा साखर याचे मोदक करतात.

मी कणीक मध्ये तेल मीठ घालून दुधात मळवून तिंबून भिजवून घेतली कणीक याचा गोळा केला.

हातानेच पेढे मऊ केले. हातानेच तींबलेला कणीक याचा गोळा घेतला.हातानेच गोल गोल पात पाती केले.

पाती मध्ये मऊ केलेला पेढा भरला मोदकाचा आकार दिला.तुपात कणीक पेढा याचे तयार केलेले मोदक

तळून काढले. मोदक केले की त्या बरोबर करंजी करतात करंजी केली की त्या बरोबर मोदक करतात.

मी एक करंजी केली आहे.

घरोघरी मोदक व करंजी करतात.

DSCF2279

घंटा

घंटा: घंटा मी कांही ब्लॉग पूर्वी मध्ये दाखविली आहे.  घंटा पितळी स्टील चांदी मातीची पण शोभे साठी घंटा असते.

घरातील देवातं डाव्या हाताने घंटा व उजव्या हातात आरती असते.घंटा वाजवून आरती करतात. गणपती देवी दत्त महादेव बरेच देवळात घंटा टांगलेली असते.

उजव्या हातील चार बोटांनी देवळात घंटा वाजवितात. 

घंटे चा आवाज नाद मधुर असतो. घंटे ला हातातील बोटांचा स्पर्श व घंटा याचा आवाज घुमतो. घंटा ऐकून ब्रह्मांड जवळ गेल्या सारखे सारखं वाटतं.

कोल्हापूर महालक्ष्मी च्या देवळात सकाळी पाचं ५ वाजता काकड आरातीच्यावेळी घंटा वाजवितातं तो आवाज महाद्वार पर्यंत ऐकु जातो. एवढी मोठी घंटा व घंटा चा आवाज असतो. कोणी कोणी हॉल मध्ये टांगून ठेवतात. बाहेर जातांना घंटा वाजवून घंटा याचा आवाज ऐकून बाहेर पडतात. 

सतार वाजवितांना तारांचा आवाज ऐकू चांगला येतो. खूप रियाज झाला की ब्रह्मांड पर्यंत माणूस जातो. मी खूप सतार वाजविली आहे.रियाज केला आहे. कोणतही वाध्य याचा आवाज बराचं वेळ घुमतो. घर देऊळ शाळे मध्ये पण तासाला घंटा वाजवितात. तो पण आवाज घुमतो. घंटे चा आवाज, वाध्य याचा आवाज घुमून नाद मधुर होऊन ब्रह्मांड सापडतं. घर देऊळ भरून जात. घरोघरी घंटा असते.

 

नवलकोल भाजी

                                               ॐ
नवलकोल  भाजी : हरबराडाळ पाण्यात सात आठ भिजत ठेवावी.
नवलकोल् साल काढून चिरून घ्यावा.पेटत्या ग्यास वर पातेल्यात
तेल मोहरी ची फोडणी करावी.फोडणी मध्ये प्रथम भिजलेली हरबरा
डाळ टाकावी.नंतर चिरलेले नवलकोल टाकावे.हरबरा डाळ व नवलकोल
शिजण्या करता पाणी भरपूर घालावे.पाणी नवलकोल व हरबरा डाळीचे
पाणी कमी झाल्यावर भाजीत हळद हिंग लाल तिखट मीठ टाकावे.
कडीपत्ता भाजी शिजतांना टाकावा.परत नवलकोल हरबरा डाळ पाणी
मसाला घातलेले परत शिजवावे.थोडे नवलकोल व हरबरा डाळ मध्ये पाणी
ठेवावे नवलकोल व हरबरा डाळ असल्यामुळे ह्यात खोबर तिळ कूट शेंगदाणे कूट
वापरू नाही नये.हरबरा डाळीची चव व नवलकोल चव चांगली लागते.अशा प्रकारे
नवलकोल व हरबरा डाळ याची भाजी करतात.
हरबरा डाळ जास्त भिजत टाकली की राहिलेली हरबरा डाळ हिरवी मिरची मीठ हळद हिंग
एकत्र करून मिस्कर मधून काढून तेलाची वरून फोडणी करून हरबरा डाळीच्या चटणीत टाकावी.
चटणी पण अशी चांगली लागते.
घरोघरी नवलकोल व हरबरा डाळ याची भाजी व भिजलेल्या हरबरा डाळीची चटणी करतात.
लिंबू टाकू नये.वाटल्यास लिंबाचा रस टाकावा प्रत्येक याचात लिंबू टाकू नये मूळ हरबरा डाळी ची
चव चांगली लागते.
घरोघरी भिजलेल्या हरबरा डाळीची चटणी करतात.

                                                DSCF2261

                                                DSCF2260

गाजराचा हलवा

                                   

                                        ॐ
गाजराचा हलवा : पांढरा भोपळा चा दुधी हलवा दाखविला होता.
आता गाजर हलवा दाखवीत आहे.गाजर धुवून घ्यावेत.किसून
घ्यावेत.पातेल्यात दूध साखर किसलेले गाजर घालावे.पातेले
पेटत्या ग्यासवर ठेवून दूध सर्व आटेल तोपर्यंत गाजर साखर दूध
हलवत राहावे.अगदी घट्ट करू नये थोडस पातळ गाजर दूध साखर
ठेवावे.तयार झाल्यावर बदाम बारीक करून किंवा दिसण्यासाठी
अख्खे ठेवावेत. छान नुसता पण खाण्यास द्यावा.पोळी बरोबर
पण खाल्ला तरी चालतो.वेलदोडे पूड टाकली तरी चालते.
घरोघरी गाजर हलवा करतात.

                                 DSCF2259

माघ पौर्णिमा


स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर उत्तरायण शिशिरऋतु नक्षत्र पुष्प रास कर्क मंगळवार माघ शुक्लपक्ष तसेच ७ फेब्रुवारी(२) २०१२ तारीख

दिनांक ला माघ पौर्णिमा आहे.

माघस्नान समाप्ति पौर्णिमा च्या शुभेच्छा !

DSCF1362  DSCF1361

बिट

                                                               ॐ
बिट : बिट याचे किसून दही घालून हिरवी मिरची मीठ शेंगदाणे याचा कूट घालून
कोशींबिर करतात. मिक्सर मधून काढून जांब साखर घालून करतात.बिट चिरून शिजवून
भाजी करतात.मी बिट धुवून मोठ्या फोडी करून उकडून घेतले. कुकर मध्ये पाणी घातले.
पाण्यात चिरलेले बिट घातले. चार पाच शिट्ट्या दिल्या. कुकर गार घाल्यावर चिरलेले बिट
पातेल्यात काढले. बिट गार झाल्यावर सालासगट बारीक बारीक चिरले. मी विळीने चिरायचे
काम करते.अजून ही मला विळी ने चिरायची सवय आहे. सुरी चाकू पेक्षा विळी ने चिरणे आवडते.
चिरलेल्या बिट मध्ये हळद हिंग लाल तिखट मीठ लिंबाचा रस शेंगदाने याचा कूट घातला.
कच्चं तेल घातले. प्रत्येक वेळेला फोडणी पेक्षा कच्च तेल वापरावे.कच्च तेलाची चव वेगळी लागते.
कोशिंबीर किंवा भाजी तयार झाली.कुकर मध्ये बिट याचे लाल पाणी राहते. त्या पाण्यात थोडे तांदूळ
हिरवे मुग सडलेले फोडलेले पाण्यात टाकून हिंग हळद लाल मिरची पावडर मीठ घालून छान बिट तांदूळ
हिरवे मुग याची खिचडी तयार करावी. कुकर गार झाल्यावर तेलाची मोहरीची फोडणी करून बिट तांदूळ हिरवे मुग
खिचडी वर टाकावी.पचण्यास हलक पोट भर होतं.बिट याचा वापर पण पूर्ण होतो.
घरोघरी बिट याचा वापर भाजी करण्यात वापरतात.

                                     DSCF2253

                                   DSCF2257

भेंडीची भाजी

                                         ॐ
भेंडीची भाजी : भेंडी प्रथम धुवून घ्यावी.नंतर पुसून घ्यावी.
बारीक चिरावी.पातेल्यात तेलाची मोहरी घालून फोडणी करावी.
फोडणीमध्ये चिरलेली भेंडी टाकावी चांगली परतून वाफ आणावी.
नंतर हळद हिंग लाल तिखट मीठ टाकावे.परत वाफ आणावी.
सुक खोबर भेंडीच्या भाजीत घालावे.परत वाफ आणावी.
पोळी बरोबर खाण्यास द्यावी.परतलेली खोबर घालून केलेली
भेंडीची भाजी खाण्यास चांगली लागते.
घरोघरी भेंडीची भाजी करतात.

                                   DSCF2250

पालक व बटाटा भाजी

                                                 ॐ
पालक व बटाटा भाजी :पालक देठा काड्यासगट पालकाची पानं निवडून घ्यावीत.
बटाटा एक घ्यावा बटाटा व पालक निवडलेले धुवून घ्यावे.पालक चिरुन घ्यावा.
बटाटा सालासगट चिरावा.बारीक चिरावा.तेलाच्या फोडणी मध्ये मोहरी टाकून
फोडणी करावी.प्रथम फोडणी मध्ये बटाटा घालावा.कळत नकळत पाणी घालावे.
बटाटा शिजवून घ्यावा.पालक चिरलेला बटाटा मध्ये घालावा.परत थोड पाणी घालून
बटाटा व पालक शिजवून घ्यावे.पालक व बटाटा मध्ये हळद हिंग तिखट मीठ घालावे.
परत बटाटा पालक याला वाफं आणावी.भाजीतले पाणी अगदी संपवू नाही पण कोरडी करावी.
कोणती ही पालेभाजी तुरट असते.म्हणून पालेभाजीला कांदा बटाटा हरबरा डाळीचे पीठ लावतात.
चव पण गोड लागते.
घरोघरी पालक बटाटा पालेभाजी करतात.

                                               DSCF2247 

                                              DSCF2248

पाकातल्या पुऱ्या

पाकातल्यापुऱ्या : कणीक आपल्याला हवी तेवढी घ्यावी. कणीक मध्ये तेल मीठ व दही घालावे. आंबटपणा यावयाला हवां. पाण्या मध्ये कणीक घट्ट मिळावी. थोड्यावेळ अर्धातास कणीक याचा गोळा तसाच ठेवावा.

तुपात कणीक याचा छोटा गोळा घेऊन छोट्या पुऱ्या कराव्यात. व तुपात तळून काढाव्यात.

साखर व थोड पाणी घेऊन पाक करावा. पाकामध्ये केशर टाकावे.कणीक याचा तळलेल्या पुऱ्या पाकातून एक एक काढून डिश मध्ये ठेवावी. पाकातील पुऱ्या वर परत राहिलेला साखर याचा पाक टाकावा.

परत वाटल्यास केशर टाकावे. बदाम याचे काप किंवा बारीक केलेले बदाम टाकावेत. छान पाकातील पुऱ्यातील डिश तयार झाल्यावर काण्यास द्यावी.आंबट गोड चव पाकातील पुऱ्यातील चव लागते.

कोणी कोणी साध्या पुऱ्या करतात. लिंबाचा पाक करून पण पाकातल्या पुऱ्या करतात.

घरोघरी पाकातल्या पुऱ्या करता.

DSCF2245

ज्वारीच्या पिठाची धीरडी

ज्वारीच्या पिठाची धीरडी : आपल्याला हव तेवढ ज्वारीच पीठ घ्याव. ज्वारीच्या पिठात हरबराडाळीचे पाव पीठ पीठ घालावे.ज्वारीचपीठ व चनाडाळी च्या पीठात हळद हिंग मीठ ओवा कच्च तेल घालावे.पातळ पीठ करावे एका पातेल्यात पाणी ठेवावे.

एका पातेल्यात कच्च तेल ठेवावे.पेटलेल्या ग्यासवर तवा ठेवावा. तवा तापल्यावर उलथन्यांनी च तव्याला पाणी लावावे. परत उलथन्यांनी च तव्याला तेल लावावे. ज्वारी व चनाडाळी चे सर्व मिश्रण डावाने तव्यावर घालून उलथन्यांने पसरावे. परत उलथन्यांनी दुसरी बाजूवर टाकावे.म्हणजे धिरड तयार होते.

दुसरे धिरड करतांना पण तव्याला उलथन्यांनी पाणी व तेल लावावे.

धिरड याला छान जाळी पडते.खावयास पण मऊ व चविष्ट लागते.तांदूळ व उडद डाळी चे डोसे नेहमी करतात.

पण ज्वारीचे पीठ व हरबरा डाळी चे पीठ याचे धिरडे पण करतात.चांगले लागतात.
घरोघरी ज्वारीचे पीठ व चनाडाळी चे पीठ याचे धिरड धिरडे घरोघरी करतात.

DSCF2244

कांदेपोहे

कांदेपोहे : जाडसर पोहे आपल्याला हवे तवढे घ्यावेत.चाळनीत घेऊन चाळून घ्यावेत. पाण्यात धुवून घ्यावेत. पोह्यातील पाणी निथळून टाकावे.कांदा बारीक चिरावा. हिरवी मिरची मध्ये फोडून बारीक चिरावी. पोहे मध्ये हळद मीठ लिंबू पिळून टाकावे. कढई मध्ये तेलाची मोहरीची फोडणी करावी. फोडणी मध्ये चिरलेला कांदा घालून लालसर करावा. कांदा लालसर झाल्यावर पोहे कांदा मध्ये घालून वाफ आणावी परत कांदा पोहे हलवून दुसरी छान वाफ आणावी.

कोणी कोणी पोहे मध्ये शेंगदाणे टाकतात.प्रत्येक याचात शेंगदाने नकोत.

पोहे व कांदा याला वाफ आल्यावर डिश मध्ये काढून सुक खोबर घालावे.लिंबू परत वाटल्यास ठेवावे. कांदे पोहे बरोबर पापड भाजलेला द्यावा.

घरोघरी कांदेपोहे करतात.

DSCF2243

मुगडाळ व शेंगदाणे परतलेले

मुगडाळ व शेंगदाणे परतलेले: आपल्याला हवी तेवढी मुग डाळ घ्यावी.शेंगदाणे थोडे घ्यावेत. मुगडाळ व शेंगदाणे एकत्र करून धुवावेत. मुगडाळ व शेंगदाणे पाण्यात पाणी थोड जास्त ठेवून भिजत ठेवावे. सहा सात तास भिजल्यावर मुगडाळ व शेंगदाणे याचे पाणी सर्व काढून टाकावे.

पेटलेल्या ग्यासवर पातेले घमेले कढई कांही ही ठेवावे. तेल मोहरी याची फोडणी करावी.फोडणी मध्ये मुगडाळ व शेंगदाणे घालावे. मुगडाळ व शेंगदाणे ह्यातील पाणी संपेपर्यंत मुगडाळ व शेंगदाणे हलवावे. मोकळी झाल्यावर मुगडाळ व शेगदाणे
ह्यात हळद हिंग लाल तिखट मीठ घालून परतावे. पातेल्याला लागू नाही याची खबरदारी घ्यावी.

परत एक वाफ आणावी.

लिंबू पिळून डिश मध्ये काढून खाण्यास द्यावी.नुसती खाण्यास पण गोड चव येते.दही घालून पोळी भाकरी बरोबर खातात.

मुगडाळ व शेंगदाणे बारीक करून घेऊ नये वाटून घेऊ नये मुगडाळ बारीक असल्यामुळे
व शेंगदाणे भिजलेले असल्यामुळे परतलेली चव चांगली लागते. सर्व मुगडाळ व शेंगदाणे हळद हिंग तिखट मीठ फोडणी परतलेली मुगडाळ व शेंगदाणे तयार झाल्यावर डिश मध्ये घालून सूक खोबर किसून घालावे.

खोबरा याची गोड चव येते शेंगदाणे भिजलेले वाफवलेले असल्यामुळे मुगडाळ चविष्ट लागते.

घरोघरी मुगडाळ व शेंगदाणे घालून मसाला घालून करतात.

घरोघरी मुगडाळ करतात.

DSCF2242

%d bloggers like this: