आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 1, 2012

मुगडाळ व शेंगदाणे परतलेले

मुगडाळ व शेंगदाणे परतलेले: आपल्याला हवी तेवढी मुग डाळ घ्यावी.शेंगदाणे थोडे घ्यावेत. मुगडाळ व शेंगदाणे एकत्र करून धुवावेत. मुगडाळ व शेंगदाणे पाण्यात पाणी थोड जास्त ठेवून भिजत ठेवावे. सहा सात तास भिजल्यावर मुगडाळ व शेंगदाणे याचे पाणी सर्व काढून टाकावे.

पेटलेल्या ग्यासवर पातेले घमेले कढई कांही ही ठेवावे. तेल मोहरी याची फोडणी करावी.फोडणी मध्ये मुगडाळ व शेंगदाणे घालावे. मुगडाळ व शेंगदाणे ह्यातील पाणी संपेपर्यंत मुगडाळ व शेंगदाणे हलवावे. मोकळी झाल्यावर मुगडाळ व शेगदाणे
ह्यात हळद हिंग लाल तिखट मीठ घालून परतावे. पातेल्याला लागू नाही याची खबरदारी घ्यावी.

परत एक वाफ आणावी.

लिंबू पिळून डिश मध्ये काढून खाण्यास द्यावी.नुसती खाण्यास पण गोड चव येते.दही घालून पोळी भाकरी बरोबर खातात.

मुगडाळ व शेंगदाणे बारीक करून घेऊ नये वाटून घेऊ नये मुगडाळ बारीक असल्यामुळे
व शेंगदाणे भिजलेले असल्यामुळे परतलेली चव चांगली लागते. सर्व मुगडाळ व शेंगदाणे हळद हिंग तिखट मीठ फोडणी परतलेली मुगडाळ व शेंगदाणे तयार झाल्यावर डिश मध्ये घालून सूक खोबर किसून घालावे.

खोबरा याची गोड चव येते शेंगदाणे भिजलेले वाफवलेले असल्यामुळे मुगडाळ चविष्ट लागते.

घरोघरी मुगडाळ व शेंगदाणे घालून मसाला घालून करतात.

घरोघरी मुगडाळ करतात.

DSCF2242

%d bloggers like this: