आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 4, 2012

पाकातल्या पुऱ्या

पाकातल्यापुऱ्या : कणीक आपल्याला हवी तेवढी घ्यावी. कणीक मध्ये तेल मीठ व दही घालावे. आंबटपणा यावयाला हवां. पाण्या मध्ये कणीक घट्ट मिळावी. थोड्यावेळ अर्धातास कणीक याचा गोळा तसाच ठेवावा.

तुपात कणीक याचा छोटा गोळा घेऊन छोट्या पुऱ्या कराव्यात. व तुपात तळून काढाव्यात.

साखर व थोड पाणी घेऊन पाक करावा. पाकामध्ये केशर टाकावे.कणीक याचा तळलेल्या पुऱ्या पाकातून एक एक काढून डिश मध्ये ठेवावी. पाकातील पुऱ्या वर परत राहिलेला साखर याचा पाक टाकावा.

परत वाटल्यास केशर टाकावे. बदाम याचे काप किंवा बारीक केलेले बदाम टाकावेत. छान पाकातील पुऱ्यातील डिश तयार झाल्यावर काण्यास द्यावी.आंबट गोड चव पाकातील पुऱ्यातील चव लागते.

कोणी कोणी साध्या पुऱ्या करतात. लिंबाचा पाक करून पण पाकातल्या पुऱ्या करतात.

घरोघरी पाकातल्या पुऱ्या करता.

DSCF2245

%d bloggers like this: